डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते - सन २०२४.

 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते - सन २०२४.


शासन निर्णयानुसार १ जानेवारी, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत

निधीचे लाभ प्रदान करण्याचे तक्ते निर्गमित करण्यात आले होते.

. संदर्भाधीन अनुक्रमांक ५ येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाने राज्य शासकीय कर्मचारी गट २ विमा योजना-१९८२ अंतर्गत दिनांक १ जानेवारी, २०२४ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२४ या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय तक्ते निर्गमित केलेले आहेत. त्यास अनुसरुन सन २०२४ या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या / आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय तक्ते निर्गमित करणे आवश्यक आहे. त्यानुसार यासोबत जोडलेल्या परिगणितीय तक्त्यानुसार २०२४ या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या/आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना या परिगणितीय तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे, प्रति युनिटकरीता बचत निधीचे संचित रकमेचे लाभ प्रदान करण्यात यावेत.

३. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक १ जानेवारी, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ या कालावधीत राजीनामा/सेवानिवृत्त/सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर अन्य काही कारणाने ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येईल त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वारसांना या सोबतच्या परिगणितीय तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

४. शासन पुढे असेही आदेश देत आहे की, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या गट विमा योजनेतील तरतुदीनुसार बचत निधीमधील रकमेवर दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून दरसाल दरशेकडा ७.१ टक्के दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज आकारण्यात आले आहे. जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना-१९९० च्या विमा निधीमधील संचित रक्कमांवर दरसाल दर शेकडा ४ टक्के या दरात कोणताही बदल झाला नसल्याने याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी.

५. हा शासन निर्णय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या २४८ च्या परंतुकानुसार तसेच शासनाला समर्थन करणाऱ्या अन्य अधिकाराचा वापर करुन सोबतचा परिगणितीय तक्ता सहायक संचालक (गवियो), लेखा व कोषागारे, मुंबई यांचे चे पत्र क्र.गवियो/२०२४/ जि.प.क.ग.वि.यो./परिगणितीय तक्ते /सन २०२४/२८/१९/१०७२, दि.२८ फेब्रुवारी, २०२४ अन्वये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या परिगणनेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०६२११६०४५४२१२० असा आहे.

संपूर्ण आदेश पहा...👇