डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बालदिन उत्साहात साजरा

 *आज दि १४ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी  येथे निपुण उत्सवाची सुरूवात व  बालदिन साजरा करण्यात आला.*

यावेळी विद्यार्थ्यांचे  फुल देऊन  स्वागत करण्यात  आले. विद्यार्थ्यांना गोड भात देण्यात आला, *आजच्या दिवसातील आनंददायी 😊बाब म्हणजे त्यांचे घेण्यात आलेले मनोरंजक खेळ यात मुलांनी संगीत खुर्ची खेळात मनसोक्त आनंद घेतला.*







जिल्हातंर्गत बदली अर्ज भरण्यासाठी

 जिल्हा अंतर्गत बदलीतील टप्पा क्रमांक एक संवर्ग एक व दोन चे अर्ज कसे भरायचे याविषयी मार्गदर्शक व्हिडिओ विन्सेस कंपनीतर्फे देण्यात आलेला आहे.

 काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहणे सर्वांसाठी आवश्यक झाले  आहे .

आपणास आणखी यासारखे महत्त्वाचे व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावे.


https://youtube.com/c/DigitalSchoolGroup




पवित्र प्रणाली तील भरती संदर्भात महत्त्वाचे

 राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच, शासकीय व अनुदानित अध्यापक विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती "अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी" यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये पारदर्शक पध्दती विहीत करण्यात आली आहे.

दरम्यानच्या काळात पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदर कार्यपध्दतीमध्ये बदल/सुधारणा करणे व काही तरतूदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता •असल्याचे निदर्शनास आले. यासाठी विविध स्तरावर घेण्यात आलेल्या बैठका व आयुक्त, शिक्षण यांच्या दिनांक १२.१०.२०२२ रोजी प्राप्त प्रस्तावाच्या आधारे शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५/ प्र.क्र. १४९/ टिएनटि-१, दि.०७.०२.२०१९ यामधील काही तरतूदी वगळणे / सुधारणा करणेबाबतचा निर्णय घेण्याची व नव्याने तरतूदी समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे.

शासन आदेश पहा...👇









बदली संवर्ग १ होकार / नकार कोणी देणे?

 *संवर्ग ०१*

*होकार / नकार*


१) जो शिक्षक बदलीस  पात्र नाही आणि त्या शिक्षकास बदली करुन घ्यायची  नाही त्यानी होकार / नकार देण्याची आवश्यकता नाही .



२) जो शिक्षक बदलीस पात्र नाही परंतु बदली करुन घ्यायची आहे त्यानी होकार द्यावा .


३) जो शिक्षक बदलीस पात्र आहे परंतु बदली नको आहे त्यानी बदलीस नकार द्यावा .


४) जो शिक्षक बदलीस पात्र आहे आणि त्याना बदली करुन घ्यायची आहे त्यानी होकार द्यावा .

बदली संदर्भात महत्त्वाचा आदेश...

  *होकार / नकार ची सुविधा अद्याप सुरु झाली नाही.ही सुविधा सुरु व्हायला आणखी अंदाजे ३ दिवस तरी लागतील*

🙏🏻

*पोर्टल सुरु होताच कळविण्यात येईल*  

*सस्नेह धन्यवाद.*

- संतोष ताठे

शिक्षकभारती

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण

 

शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे शालेय पोषण आहार योजना सुरू केली होती. 

 आता या योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असे करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.



या संदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे.

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना 15 ऑगस्ट 1995 पासून राज्यात सुरू करण्यात आली होती. केंद्र सरकारने या योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असे करुन 2021-22 ते 2025-26 या पंचवार्षिक आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने योजनेच्या नावात बदल केला आहे. यापुढे राज्यात शालेय पोषण आहार ही योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणून ओळखली जाणार आहे.



देशातील बालकांना मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशातील कोट्यवधी बालकांना मोफत आहार दिला जाणार आहे. केंद्र सरकारची ही योजना सुरू करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की शाळांमध्ये मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असणे आणि त्यांना चांगले शिक्षण आणि पोषण विकसित करणे. या योजनेच्या माध्यमातून शाळेत शिकणारे विद्यार्थीही स्वावलंबी होणार असून त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. या योजनेंतर्गत शाळांमध्ये प्राथमिक वर्गात शिकणार्‍या मुलांना केंद्र सरकारकडून पोषण आहार दिला जाणार आहे.

नेमके  योजनेचे स्वरूप कसे असणार  ?


गरीब कुटुंबातून आलेल्या मुलांच्या मध्यान्नसाठी केंद्र सरकारनं अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे लाखो गरीब मुलांना फायदा होणार आहे. या योजनेला केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे नाव देण्यात आले. केंद्र सरकारच्या मते, देशातील जवळपास 11 लाख कोटींपेक्षा जास्त विद्यार्थांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार एक लाख 71 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.