डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

मुरुमखेडावाडी शाळेत पाखरं आनंदाने झेपावलीत....#back to school

 मुरुमखेडावाडी शाळेत पाखरं आनंदाने झेपावलीत....


मार्च २०२० नंतर  जवळजवळ २० महिन्यानंतर  १ ली ते ४ थी वर्ग सुरु झाले. 




      पहिला दिवस मुलांचा उत्साह गगन भरारी घेणाराच जणू...... हक्काची सुंदर  शाळा व येथे पाऊल पडले ते वेगळया विश्वात रमले...... 





        २४ पैकी  २२ विद्यार्थी उपस्थित होत. आज त्यांच्या हस्ते नविन संगणक उदघाटन ही झाले व डोंगराळ भागात गुगल सर्च इंजिन आता सज्ज झाला असून आता संपुर्ण जग हे वर्गात आल्याचे वाटू लागले. Skype चे ही दिमाखात खाते सुरुवात होत आता लवकरच जगवारी..... नवी गगन भरारी ही होणारच..... 

        



 *दिवसभराचा आनंद वेचल्यानंतर शाळा सुटल्यावर आमचा ग्रूप फोटो व त्यातील मुलांची प्रसन्नता मनाला भुरळ पाडणारीच आहे.....*

*थांबलो जरा आणखी  हरलो नाही,*
*उत्साह नवा दाटला मंत्र नवा जपला,*
*घेऊ तीच भरारी पंख हे पुन्हा पसरले,*
*सामना या भवितव्याचा नव्याने सजला....*



*प्रकाशसिंग राजपूत  व दिलीप आढे*

         सहशिक्षक 

  जि.प.प्रा.शा. मुरुमखेडावाडी ,

   केंद्र  करमाड, ता/जि औरंगाबाद

अक्षरगट निहाय डिजिटल शैक्षणिक साहित्य...#अक्षरगट

अक्षरगट निहाय डिजिटल शैक्षणिक साहित्य...


इयत्ता पहिली 

विषय- मराठी


अक्षरगट निहाय निर्मित शैक्षणिक साहित्य विषयीं थोडसं ...


मित्रांनो, अक्षरगट का असावी याची माहिती देण्यापूर्वी थोडं माहिती करून घेऊया. पुर्वी शिक्षक वर्णमालेतील वर्णाच्या क्रमाने मुलांना शिकवित असत. काहीतर वर्णमालेचं तक्ता भिंतीला टांगून ठेवायची आणि मुलांना अ अननस आ-आगगाडीचा या पद्धतीने शिकवायची. याप्रमाणे संपूर्ण वर्णमालेतील अक्षरे शिकवून झाल्यावर स्वरचिन्ह लावून अक्षरं शिकविली जात असे. तेव्हा बाराखडी. त्यामुळे मुले उशिरा शब्द वाक्य वाचायला शिकायची.




अक्षरगट का असावी याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजनानुसार अक्षरगटातील काही अक्षरे व काही स्वरचिन्ह परिचय करून मुलांना प्रारंभिक स्तरावरच स्वरचिन्हविरहित शब्द, वाक्ये व स्वरचिन्हयुक्त शब्द, वाक्य वाचनाचा सराव व्हावा यासाठी अक्षरगट असावे लागते. एका दृष्टीक्षेपात शब्द वाचन करता येणं हे खूप महत्त्वाचे असते. तसेच वाक्यांचा सुद्धा आहे. मुले वाक्य वाचन करताना एका दृष्टीक्षेपात वाक्य वाचायला हवं, असं जर होत नसेल तर वाक्य वाचन करताना त्या वाक्याचा अर्थ निसटून जाण्याची शक्यता असते त्यामुळे समजपुर्वक वाचनात अडथळा निर्माण होत असते. एक दोन अक्षरगट झाली की, त्यावर तयार होणारे वाचन पाठ वाचता यावे हेसुद्धा अपेक्षित आहे त्यानुसार पाठ्यपुस्तकात वाचनपाठाचा समावेश केलेला आहे.

इयत्ता पहिलीत ४ वाचनपाठात एकूण ९ अक्षरगट आहेत. जसजसे पुढे जाऊ तसतसे मुलांचे शब्द ज्ञान वाढत असते. त्या त्या अक्षरगटातील अक्षरे व स्वरचिन्ह व पुर्वीच्या अक्षरगटातील अक्षरे व स्वरचिन्ह घेऊन शब्द वाक्य तयार करून मुलांना वाचन व लेखन सराव करावा हे अपेक्षित आहे. पाठ्यपुस्तकात वाचन लेखनासाठी प्रातिनिधिक स्वरूपात मोजके शब्द वाक्यांचा समावेश असतो. पण शिक्षकांना भरपूर शब्द व वाक्यांचा वाचन लेखन सराव द्यावे लागते.

आपण यासाठी गडचिरोलीसह महाराष्ट्रातील पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या नवोपक्रमाने दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्मिती करून शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांचे वाचन लेखन विकास व्हावा यासाठी अक्षरगट निहाय शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यात आली. सदर साहित्य शिक्षक लॅपटॉप, प्रोजेक्टर, संगणक, टॅब, स्मार्ट मोबाईल व मुद्रित साहित्य वापरता येईल.

शैक्षणिक साहित्य निर्मिती
 
श्री. वाल्मीक वन्नेवार
जि.प.प्रा. शाळा, कसुरवाही पं.स.- जि. गडचिरोली



 इयत्ता १ ली अक्षरगट डाऊनलोड करा....


अ.क्र.अक्षरगट क्रमांक डाऊनलोड 

1

अक्षरगट १   

Download  


2

अक्षरगट २  

Download


3

अक्षरगट ३  

Download


4

अक्षरगट ४  

Download


5

अक्षरगट ५ 

Download


6

अक्षरगट ६ 

Download


7

अक्षरगट ७  

Download










इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे....#school open



आता इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.


शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण: २०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६




२. या विभागाच्या दिनांक ०७ जुलै २०२१ च्या परिपत्रकामध्ये ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर दि. १० ऑगस्ट २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका/नगरपंचायत/ ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.


२.१ सदर समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी असे आदेश काढण्यात आले. 



(i)  शाळा सुरु करण्यापूर्वी संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.


ii) सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन १००% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. 


iii) विद्यार्थ्याच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.


(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.


(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे  विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत तसेच कोविंडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुध्दा कोरोना चाचणी करुन घ्यावी.


२.२) शाळा सुरू करताना मुलांना टप्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गाना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ.यासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.


२.३) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. 


२.४) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.


३. शासन परिपत्रक, दिनांक ७ जुलै, २०२१, दिनांक १० ऑगस्ट २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह दिनांक २४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकातील •अतिरिक्त मार्गदर्शक सूचना एकत्रित करून वरील प्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे.


४. दि. १ डिसेंबर २०२१ पासून ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा अशा सुचना देण्यात आल्या  आहे.


५. दि. १ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करण्याच्चे सुचविले आहे. भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावयाचा आहे. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा लागणार आहे. वरील मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त शासनाने कोविड १९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करावयाचे आहे. 


शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६



HammerHead अमर असलेल्या ह्या जीवा बद्दल तुम्हाला माहित आहे का.....

 अमर असलेल्या ह्या जीवा बद्दल तुम्हाला माहित  आहे का..... 


हॕमरहेड  Hammerhead worm हा एक विषारी प्राणी आहे परंतु याचा मानवाला थेट धोका नाही,


पृथ्वीवर करोडो जीव आहेत असे काही जीव आहेत त्यांना आपण कधीच पाहिलेले नसते  किंबहुना अचानक पहिल्यांदा नजरी पडल्यास आपण त्याबद्दल माहित करून घेण्यासाठी फार उत्सुक होऊन जातो. 
तर आज आपली उत्सुकता व माहिती वाढवणारी पोस्ट घेऊन आलो आहोत.




 Earthworm ची मोठ्या प्रमाणात शिकार करत असल्यामुळे  Earthworm हे वनस्पती साठी उपयुक्त आहे.


 आणि त्यांची संख्या hammerhead worm मूळ जर कमी झाली तर पर्यावरण संकटात येऊ शकते .


तसेच हा प्राणी संभाव्य अमर आहे. 


           याबद्दल व्हिडीओत अधिक माहिती पहा...

            

हा मला दोन चार दिवसापूर्वी सिल्लोड परिसरात आढळला होता. मला सुरुवातीला त्याची ओळख नव्हती नंतर त्याची ओळख झाली आणि त्याविषयी थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे सविस्तर माहिती आपण गुगलवर सर्च करून पाहू शकता.


       लेखन व व्हिडीओ निर्मिती 

                श्रीकृष्ण बडकसर 

ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन शिक्षण कर्ज व्याज परतावा योजना...#Obc student #education

 ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन शिक्षण कर्ज व्याज परतावा योजना


ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ "शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना" सुरू होणार आहे.



   ज्याचा फायदा ४०० विद्यार्थ्यांना होणार


 असून यासाठी  जवळपास ६ कोटीचा निधी तरतुद करण्यात आला आहे. याबाबत माहिती इ.मा.बहूजन कल्याण मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

   या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना राज्य अंतर्गत , देशातील तथा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम यावरील शिक्षण करीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.


या योजनेची राज्य व देश अंतर्गत शिक्षण घेण्याची कर्ज मर्यादा ही  महत्त्तम १० लाख तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम शिक्षण कर्ज मर्यादा २० लाख इतकी असणार आहे.


      या योजनेत बॕकेचा जास्तीत जास्त १२ % व्याज परतावा नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना होणार आहे.

१ ली च्या अभ्यासक्रमात होणार असा महत्वाचा बदल जाणून घ्या...... #द्विभाषिक पुस्तक

राज्यात मराठी भाषेतून शिक्षण सक्तीचे आहे.  मात्र, शालेय मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी व्हावे आणि लहानपणापासूनच इंग्रजी तसेच इंग्रजीची संकल्पना मुलांना समजावी, यासाठी राज्यातील सर्व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये येत्या शैक्षणिक 
वर्षापासून  एकात्मिक आणि द्विभाषिक अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. इयत्ता १ ली च्या अभ्यासक्रमात महत्त्वाचा बदल होणार आहे. 





      मा. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी  विद्यार्थ्यांना इंग्रजी तसेच मराठीचे शब्द आणि संकल्पना स्पष्ट करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  
या बैठकीत श्री  विवेक गोसावी,  शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर ऑनलाइन उपस्थित होते.
   मा. शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या की, हा प्रयोग प्रथम ४८८ आदर्श विद्यालयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकांचा पहिल्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.  या पथदर्शी प्रकल्पाचे यश पाहून तो मराठी शाळांमध्ये राबविला जाणार आहे.  त्याचप्रमाणे राज्य पाठ्यपुस्तक विकास आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाला इतर शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि इंग्रजी भाषेतील शब्द, दैनंदिन शब्द, संकल्पना, मराठी शब्दांव्यतिरिक्त सोपे इंग्रजी शब्द आणि वाक्ये शिकता येतील. स्पष्टपणे समजून घ्या.  पाठ्यपुस्तके आकर्षक, जागतिक दर्जाची असावीत, असे ते म्हणाले

२६/११ शहीदांना काव्यमय मानवंदना....#police #brave

मुंबई वर झालेला अतिरेकी हल्ला आपल्या वीर जवानांनी जिवाची बाजी लावून अतिरेक्यांना यमसदनी पाठवले.... त्यांच्या या अफाट शौर्यास माझी काव्यमय मानवंदना.....





 🚨 🚓सदरक्षणाय...🚓🚨


सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,

या जन्मी होत अशी जनसेवा ,

लावुनी जीवाची बाजी करे देशसेवा...


दिवस रात्र  सदैव उभे राहती ,

शांती समाजास तेव्हाच लाभती,

येता संकट कसलेही जेव्हा,

खाकीत शोभूनी वीर हे लढती...

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


सक्त घडत यांचा असा पहारा,

वाटत कठोर जरी यांचा दरारा,

मन आतुन असतेच कोमल,

मानवी सेवेत स्वतःस ठेवे जहाल,

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


अतिरेक्यांशी लढला उभ्या छातीने,

दिसे फक्त जनकल्याण खाकीने,

धावूनी  देत जीव  ओवाळून,

प्रेम असे मायभुचे मृत्यूस कवटाळून...

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


      *🪶प्रकाशसिंग राजपूत🪶*

            औरंगाबाद 

       9960878457