डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

तळपता ज्वाला.... वीर शंभो.... शुर शंभो....




 *🚩 शुरवीर, महापराक्रमी ,बाहुबली शुर योद्धा छत्रपती  संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या तमाम शिवभक्तांना शुभेच्छा🚩🚩🚩* 

गीतगायन - श्री सुभाष शिंदे

गीतलेखन -  प्रकाशसिंग राजपूत 


https://youtu.be/_ceLAgaGbkE

तळपता ज्वाला गीत पहाण्यासाठी......



*🚩वीर शंभो ,शुर शंभो....🚩* 


*तळपता ज्वाला उठला,*

*जेव्हा शंभुराजा छत्रपती जाहला,*

*वणवा शौर्याचा सर्वत्र भडकला,*

*प्रजेच्या मनी सिंह वसला,*

*वीर शंभो ,शुर शंभो ....*

*आवाज  सह्याद्रीत घुमला,* 


*विजेचा  कडकडाट  असा,*

*तेज नवा स्वराज्यास मिळाला,*

*गौरव या मराठी मुलखाचा,*

*अभिमान या मातीचा राखला,*

*वीर शंभो ,शुर शंभो ....*

*आवाज  सह्याद्रीत घुमला,* 



*पराक्रम असा दिगला,*

*मावळे लढूनी चौफेर शत्रूला,*

*चमचमता तारा या उंच ,  नभात,*

*राजा शक्तीशाली या विश्वात ,*

*वीर शंभो,शुर शंभो ....*

*आवाज  सह्याद्रीत घुमला,* 



*अंखड दीप हा या राष्ट्राचा*

*इतिहास शौर्याचा रचला,*

*अन्याय  कुणावर नव्हता  मान्य ,*

*बाहुत बळ असे आणला,*

*वीर शंभो ,शुर शंभो ....*

*आवाज  सह्याद्रीत घुमला,* 



  🖋 *प्रकाशसिंग राजपूत*🖋

          *औरंगाबाद*

       9960878457


  हे गीत जर स्टुडिओत बनावे आपली इच्छा असल्यास कृपया आपले योगदान 9960878457 यावर संदेश पाठवू शकता.


जिल्हा परिषेद आरोग्य खात्यात मेगाभरती

 राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.




जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे. पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार आलेल्या अर्जातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पाच संवर्गासाठी एकूण चार लाख अर्ज प्राप्त झाले असून या अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुधारित आकृतीबंधास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार 


प्रेरणादायी अधिकारी ...

 *प्रेरणादायी अधिकारी ..श्रीमती जयश्री चव्हाण मॕडम शिक्षणाधिकारी  (प्राथमिक ) औरंगाबाद 






 दुर्गम डोंगर भागातील शाळेवर काम करतांना त्यावेळी तालुक्याच्या सर्वाच्च अधिकारी गटशिक्षणाधिकारी आदरणीय चव्हाण मॕडम यांनी  मुरुमखेडावाडी शाळेची प्रगती पहाण्यासाठी शाळेला भेट द्यायची  आहे, "रस्ता जरी कठीण असेल तर कार जिथ पर्यंत जाईल तिथ पर्यंत कारने व पुढे मी पायी चालून येईल ...."

     इतकी प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या सामान्य राहणी पण उच्च विचारसरणीचे त्याचे व्यक्तीमत्व निश्चितच प्रेरणादायी असेच म्हणावे लागेल.


 *हौसलो से सब हासील नही होता है,*

*कुछ लब्ज तारिफोके अंजाम तक ले जाते है ....*

१८ डिसेंबर २०१९ ला आदरणीय मॕडम यांनी शाळेला भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासून शाळेच्या भौतिक सुविधा, सोलार डिजिटल क्लास तसेच आमच्या शाळेची परसबाग ही पाहिली. कठीण परिस्थितीत त्या शाळेवर येऊन आमचे पाठबळ वाढविणारे ठरले.


          अवघ्या वर्षभरात दुसरी शाळेवर भेट  झाली ती घनवन उदघाटन प्रसंगी निश्चितच मुरुमखेडावाडीच्या विकासामध्ये आदरणीय चव्हाण मॕडम यांचा मौल्यवान हातभार आहे. कारण


"A Decent Leader think about the outcome, and Result of an idea before implementing it...."





    हे सत्यात नक्कीच उतरले. 

Design for change  अंतर्गत मुरुमखेडावाडी शाळेने भाग घ्यावा हे शब्द आदरणीय चव्हाणमॕडम यांचे विद्यार्थी व आम्ही  पाळत सहभागी होत दोन वर्ष सर्वात्तम अशा स्टोरीज घडल्या " *आमचा अभ्यासकट्टा* २०१९  व २०२० जागतिक करोना महामारी आलेली  असतांना  *" हातपाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू.."*

   यानेच वाडीत करोनाने एकही   आजारी  पडलेला नाही व भाग्यवान लेकरांच्या प्रयत्नाने एक ही मृत्यू झालेला नाही.

       इतके प्रभावी उपक्रमांना आदरणीय मॕडमची दाद आणखी प्रेरक ठरत आम्हाला  २०२१ मध्ये *जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा पुरस्कार*  पटकावता आलेला आहे.




"🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂


*कर्तव्य जागवती आपली वाणी,*

*ध्येर्य नवे देती आपली थाप,*

*भविष्य उज्वल करते दूरदृष्टी ,*

*आत्मविश्वास जागवते आपली साथ....*




 *सदैव नवा तेज ओसरीत आपल्या छायेत नवीन शिक्षणाच्या प्रयोगाने छाप निर्माण झाली.*

      *आदरणीय शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण मॕडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*💐💐💐🌹🌹🌹🎂🎂🎂


              *शुभेच्छुक*


     *प्रकाशसिंग राजपूत*

सहशिक्षक ( मुरुमखेडावाडी )

समूहनिर्माता ( डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र )

निष्ठा प्रशिक्षण शेवटची संधी उपलब्ध....

💻डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र📺


निष्ठा प्रशिक्षण शेवटची संधी उपलब्ध....

निष्ठा प्रशिक्षण ३.० (FLN)प्रशिक्षण



पहिल्या टप्यात ज्यांचे निष्ठा प्रशिक्षणचे काही भाग अपुर्ण राहिले होते त्या सर्वांसाठी आता परत कोर्स पुर्ण करण्याची संधी मिळणार आहे. 


अंतिम दिनांक  -30 जून पर्यंत पूर्ण करायचे आहे


 कोर्स क्रमांक 1 व 12 मोड्यूलची लिंक खाली उपलब्ध 


निष्ठा कोर्स क्र -१

 कोर्स ज्वाईन करा...


 निष्ठा कोर्स क्र -2

 कोर्स ज्वाईन करा...

निष्ठा कोर्स क्र -3

 कोर्स ज्वाईन करा...


निष्ठा कोर्स क्र -4

 कोर्स ज्वाईन करा... 


निष्ठा कोर्स क्र -5


कोर्स ज्वाईन करा...



निष्ठा कोर्स क्र -6


कोर्स ज्वाईन करा...



निष्ठा कोर्स क्र -7

कोर्स ज्वाईन करा...


निष्ठा कोर्स क्र -8


कोर्स ज्वाईन करा...


निष्ठा कोर्स क्र-9

कोर्स ज्वाईन करा...


         पुढील पानावर पहा...click here

राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना परत सेवेत घेणेबाबत महत्त्वाचा शासन निर्णय

 राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना परत सेवेत घेणेबाबत महत्त्वाचा शासन निर्णय    







शासन निर्णय डाऊनलोड करा.....








शिर्डी संस्थानचा शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय...

 शिक्षण संस्थांच्या मक्तेदारीला आता आव्हान मिळण्याची शक्यता आहे. 


देशातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या माध्यमातून विविध प्रकारचे उच्च शिक्षण देणारी महाविदयालये सुरू करण्यात येणार आहे. संस्थानचे अद्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनीच एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे.





परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी शैक्षणिक संस्था सुरू करण्यात येणार असून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी अध्यक्ष आमदार काळे यांनी दिली.

'संस्थानतर्फे एमबीबीएस, बी.एस्सी., नर्सिंग, विधीशाखा, अध्यापन शास्त्र याप्रकारचे शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. परिसरातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात चांगले शिक्षण मिळावे, यासाठी हा प्रयत्न आहे', असे काळे यांनी सांगितले.

शिर्डी संस्थानला अशी शिक्षण संस्था सुरू करण्यास परवानगी मिळाल्यास या भागातील कोपरगाव, प्रवरानगर, संगमनेर येथील सध्या सुरू असलेल्या विविध नेत्यांच्या शिक्षण संस्थांसाठी मोठा स्पर्धक निर्माण होण्याची शक्यता आहे.

शालेय शिक्षणाचे आता हायब्रीड माॕडेल विकसित व्हावे.. पंतप्रधान यांचे मत.

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होऊन दोन वर्षे झालेली  आहेत.




 संधी, समानता, समावेशकता आणि दर्जा ही उद्दिष्टे ठेवून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राबविण्यात येत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.


  उच्च शिक्षण संस्थांना संपूर्ण क्षमतेने ऑनलाइन अभ्यासक्रम चालविण्यास परवानगी दिल्यामुळे आणि ऑनलाइन शिक्षण साहित्याची मर्यादा 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाला मोठे प्रोत्साहन मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण च्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेतला.


 शालेय विद्यार्थ्यांमधील तंत्रज्ञानाचा अतिवापर टाळण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशी शिक्षणाची संमिश्र पद्धत विकसित करायला हवी, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केल्या.