डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

घरभाडे कपाती विरोधात मुप्टा चे तीव्र निदर्शने

 *संवैधानिक इशारा व मुप्टा चे  तीव्र निदर्शने*

👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

💫💫💫💫💫💫💫💫💫


प्रति,

मा.मुख्य कार्यकारी साहेब,

मा.शिक्षणाधिकारी (माध्यमिक,प्राथमिक)

मा.गटशिक्षणाधिकारी (सर्व)

*विषय- कोणत्याही शिक्षकांचा घरभाडे भत्ता कपात न करता वेतन अदा करणेबाबत*

महोदय,

वरील विषयी आपणास निवेदन देण्यात येते की, माहे -सप्टेंबर 2022 ची बिले बनवताना कोणत्याही शिक्षकांचे घरभाडे भत्ता कपात करण्यात येऊ नये. सर्व शिक्षक शाळेवर वेळेत ये-जा करतात. प्रशासनाकडून मुख्यालयी राहण्याबाबत पुरावे गोळा केलेत.तरीही पुन्हा पुन्हा ग्रामसभेचा ठराव,स्वयंघोषित प्रमाणपत्र, भाडेकरारनामा इ. लेखी पुरावे मागवून शिक्षकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी सोबतच प्रशासनाकडूनही होत आहे. असे दिसतेय.आम्ही मुख्यालयी राहतच आहोत. तरीही आपण हे पुरावे वारंवार मागणी करून लोकप्रतिनिधीस मदत करत आहात की काय? असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. पण हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे.यात गंगापूर / खुल्ताबाद/वैजापूर/.....फक्त औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके येता कामा नये.राज्यातील इतर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात अशा माहितीच्या आधारे घरभाडे कपात केलेले नाही.त्यामुळे मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घरभाडे कपात करणे अनुचित ठरेल. एका लोकप्रतिनिधीमुळे आपण हा निर्णय घेत असाल तर हे आम्हाला मान्य होणार नाही.कोर्टाने निर्णय देऊनही आपण कपात करण्याचे आदेश काढले आहेत.मुद्दामहून शिक्षकांना या माध्यमातून भडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे कदापिही सहन केले जाणार नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात घरभाडे कपात केल्यास *शिक्षक असंतोषास* आपण जबाबदार असाल.दबावतंत्राचा वापर जर आपणाकडून होत असेल तर सर्व शिक्षकबंधुभगिनी प्रशासनाच्या विरोधात जाऊन निदर्शने करतील.असा विनयपूर्वक संवैधानिक इशारा याद्वारे देण्यात येत आहे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*मुप्टा ची जाहीर निदर्शने*

👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

जि.प.कार्यालय औरंगाबाद यांच्या वतीने प्रशासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षक बंधुभगिनींना घरभाडे बाबत पुरावे मागणी व पुरावे नसेल तर घरभाडे कपातीचे आदेश काढण्यात आले.अशा दबावतंत्राचा वापर करणा-या  प्रशासनाच्या विरोधात *मुप्टाच्या वतीने तीव्र निदर्शने उद्या सोमवार दि.26/09/2022 रोजी ठिक दुपारी 4:30 वाजता मा.प्रा.सुनिलजी मगरे सरांच्या नेतृत्वाखाली* करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व शिक्षकबंधूभगिनींनी या अस्तित्वाच्या लढाईत सामील व्हावे.असे आवाहन मुप्टाच्या वतीने करण्यात येत आहे.ही विनंती.

👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

*आवाहनकर्ते*

*प्रा.सुनिलजी मगरे*

*संस्थापक सचिव* 

*मुप्टा शिक्षक संघटना, मराठवाडा विभाग, औरंगाबाद*

*संपर्क*- 

*संपत साबळे - 9422350416*

*विलास त्रिभुवन*-

*9673568068*



लवकरच 30 % केंद्रप्रमुखाची पदे भरण्यात येणार


शिक्षकांची अशैक्षणिक कामे थांबणार....


जिल्हातंर्गत बदली संदर्भात महत्त्वाचे ....


डिजिटल समूहासोबत सदैव राहण्यासाठी सबस्क्राईब करा.... 


🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

लवकरच जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया

  शिक्षक ऑनलाईन बंदी प्रक्रिया गेल्या दोन वर्षापासून कोविड बंद झालेली होती,

 परंतु आता नवीन प्रणाली द्वारे यावर्षी जिल्हातंर्गत बदली लवकरच सुरू होणार आहे ,आंतरजिल्हा बदली  यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आता जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया काही दिवसातच सुरू होत आहे.

 बदली अभ्यास गटावरील प्रमुख असलेले माननीय श्री आयुष प्रसाद साहेब यांनी एका कार्यक्रमांमध्ये बदली प्रक्रिया संबंधित एक निश्चित कालावधी दरवर्षी साठी लागू करण्यात येणार असल्याचे म्हटलेले आहे.

 ज्यामुळे बदल्यांचे यापुढे नियमित अशा प्रकारे करता येणार आहे. त्यांनी कार्यक्रमात मांडलेल्या विचारांमध्ये आपण ऐकू शकतात की बदल्यांविषयी शासनाने ठरवलेली नेमके धोरण कसे असणार आहे.

 व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्राच्या अधिकृत चॅनेलला सबस्क्राईब करा...




१ ते २० पटसंख्या असलेल्या शाळेबाबत सरकार नव्याने धोरण आखत आहे.

  राज्यामध्ये १ ते 20 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत सरकार विचार करत आहे.



 20 पर्यंत विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद होणार का? कारण 20 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळां बाबत सरकारने एक नवं धोरण आखलेले आहे .

शिक्षण विभागाला या संदर्भातली माहिती मागवलेली आहे. शिक्षक आणि पालक या नव्या येऊ घातलेल्या योजनेला विरोध करणार का? असं सुद्धा प्रश्न विचारला जातोय. शिक्षण विभागाने २०१७ मध्ये असा  निर्णय घेतला होता. त्यामध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी या शाळेमध्ये असतील त्या बंद करण्याचा निर्णय घेतला.

 त्यामुळे या शाळा पुन्हा एकदा बंद केल्या जाणार का? कशाप्रकारची कार्यवाही शिक्षण विभाग घेत असेल तर याचा  ग्रामीण भागातील शिक्षणावर निश्चितच याचा फार मोठा फरक पडणार आहे.


लवकरच 30 % केंद्रप्रमुखाची पदे भरण्यात येणार


शिक्षकांची अशैक्षणिक कामे थांबणार....


जिल्हातंर्गत बदली संदर्भात महत्त्वाचे ....


डिजिटल समूहासोबत सदैव राहण्यासाठी सबस्क्राईब करा.... 

आकारिक ४ थी २२ -२३

 इयत्ता ४ थी आकारिक नमुना चाचणी येथे डाऊनलोड करा....




आकारिक चाचणी ३ री २२-२३

 येथे या वर्गाची नमुना चाचणी डाऊनलोड करा...



इयत्ता २ री आकारिक नमुना २२ -२३

 इयत्ता २ री आकारिक नमुना चाचणी प्रशनपत्रिका डाऊनलोड करा...




आकारिक चाचणी १ ली ते ४ थी नमुना

 डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र व शिक्षक मित्र समूह अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते चौथी ची आकारिक चाचणी क्र १ सन 2022 -23  आपणास पीडीएफ स्वरूपात नमुना प्रश्नपत्रिका देत आहोत.



 सदरील प्रश्नपत्रिका ह्या नमुना दाखल देण्यात येत आहे. या नमूना आधारे आपण  आपल्या वर्गाची प्रश्नपत्रिका आपण निर्मिती करू शकता....


इयत्ता  १ ली 




इयत्ता २  री



इयत्ता  ३ री



इयत्ता  ४ थी