डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा 2023 चा अहवाल

 

भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा 2023 चा अहवाल केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी जाहीर केला.


शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण 13 श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट 850 संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय संस्थात्मक रॅकिंगमध्ये महाराष्ट्रातील 67 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.


सर्वोत्कृष्ट समग्र संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या 11 संस्था

संस्थात्मक रँकिंगच्या यादीत देशातील 100 शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 11 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे, तर होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई 30 व्या स्थानावर आहे. पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन या संस्थेस 34 वे स्थान मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (35), रासायनिक तंत्रज्ञान संस्था - मुंबई (41), सिम्बायोसिस इंटरनॅशनल - पुणे (59), डॉ. दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था - वर्धा (75), डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ - पुणे (81), विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - नागपूर (82), नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (88), मुंबई विद्यापीठ - मुंबई (96)

विद्यापीठ रँकिंगमध्ये राज्यातील 10 विद्यापीठे

देशातल्या 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 10 विद्यापीठांचा समावेश आहे. होमी भाभा राष्ट्रीय संस्था - मुंबई हे विद्यापीठ रँकिंगमध्ये 17 व्या स्थानावर आहे. पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठास 19 वे स्थान मिळाले आहे, तर रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई ला 23 वी रँकिंग देण्यात आली आहे. सिम्बायोसिस इंटरनॅशनल - पुणे (32), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था - वर्धा (39), डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील - पुणे (46), एस.व्ही.के.एम नरसी मॉन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज - मुंबई (47), मुंबई विद्यापीठ - मुंबई (56), भारती विद्यापीठ - पुणे (91), आणि मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस 98 व्या क्रमांकावर आहे.

केंद्रप्रमुख पदभरती विभागीय परीक्षा

उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये राज्यातील 9 व्यवस्थापन संस्था

देशातील 100 उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 9 संस्थांचा समावेश आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मुंबई ही संस्था 7 व्या स्थानावर तर मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 10 व्या स्थानावर आहे. सिंबायोसीस इस्टिटयूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट-पुणे (17), आणि एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज - मुंबई (20), SVKM नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज - मुंबई (21) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट - नागपूर (43), के.जे.सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्च - मुंबई(45), प्राचार्य एल एन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्च - मुंबई (73) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट - पुणे (76).


अभियांत्रिकी संस्थांच्या रँकिंगमध्ये राज्यातील 8 संस्था

अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंगमध्ये देशातील 100 अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 8 संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई स्थित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेला 37 वे स्थान मिळाले आहे. नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला 41 वी रँकिंग प्राप्त झाली आहे. डिफेंस इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी - पुणे (57), तर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग - पुणे (73) क्रमांकावर आहे,


वैद्यकीय महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये 2 महाविद्यालय

वैद्यकीय महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील दोन महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ 15व्या स्थानावर आहेत तर दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था, वर्धा 25व्या स्थानावर आहे.


शिक्षण आयुक्तांच्या या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

 

राज्यातील 36 शिक्षण अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी, असे पत्र  शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा अर्थात् एसीबीला लिहिले आहे. 



शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचे आयुक्तांनी पत्रात लिहिले आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी लाच घेताना पकडले जातात. मात्र, पुन्हा सेवेत येतात आणि पुन्हा भ्रष्टाचार करतात. कारवाई होत नाही. त्यामुळे आयुक्त सुरज मांढरे यांनी एसीबीला पत्र लिहिल्याची माहिती आहे. ज्या शिक्षकांवर छापे पडले, त्यांची खुली चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात मागील काही काळापासून भ्रष्ट कारभाराची कीड लागली आहे. शिक्षक बदल्यांसाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शिक्षक बदलीच्या फायलीवर आर्थिक वजन ठेवल्यानंतर शिक्षकांना सोयीच्या जिल्ह्यात बदली झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांत आपण पाहिली आहेत.


केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा संपूर्ण माहिती

केंद्रप्रमुख भरती संपुर्ण जाहिरात पहा...

 

केंद्रप्रमुख 2384 पदांची जाहिरात प्रसिद्ध, शिक्षकांना 15 जून 2023  पर्यंत अर्ज करता येणार ; परीक्षा ऑनलाइन व नवीन अभ्यासक्रमानुसार होणार... 

जाहिरात पहाण्यासाठी खालील टॕबवर क्लिक करा...

केंद्रप्रमुख विभागीय भरती अर्ज भरणे सुरू

 केंद्रप्रमुख विभागीय भरती 2023

           केंद्रप्रमुख 2384 पदांची जाहिरात प्रसिद्ध, शिक्षकांना 15 जून 2023  पर्यंत अर्ज करता येणार ; परीक्षा ऑनलाइन व नवीन अभ्यासक्रमानुसार होणार* 

           महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना 2384 रिक्त केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धापरीद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३" या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयात आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात पहाण्यासाठी...




    *अर्ज करण्याची मुदत*     ऑनलाईन प्रणालीव्दारे दि. 6 जून 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत अर्ज करता येतील. 

      *केंद्रप्रमुख परीक्षा माहितीची लिंक* www.mscepune.in 

      *केंद्रप्रमुख अर्ज लिंक*

https://ibpsonline.ibps.in/mscepapr23

       *परीक्षा शुल्क*

1.सर्व संवर्गातील उमेदवार - 950 रुपये

2.दिव्यांग उमेदवार - 850 रुपये

     *केंद्रप्रमुख पदासाठी अर्हता*

     विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची

बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. 

           *किंवा*

प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरीलप्रमाणे पदवी

धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा

(शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. "

*केंद्रप्रमुख वेतनश्रेणी : 9300 - 34800 ग्रेड पे वेतन - 4400*

           *केंद्र प्रमुख विभागीय परीक्षेच्या नवीन 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी*

     केंद्रप्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.

        *पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.*

         पेपर क्रमांक एकमध्ये  बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.

         केंद्र प्रमुख परीक्षेच्या दोन्ही पेपरचे नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.

     *पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*

        बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.

*केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*

1. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक व शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (दुसरी आवृत्ती) 

2. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर (चौथी आवृत्ती)

3.संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)

4. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती)

5.शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते

             *पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह* 

1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण

2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण

3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण

4 अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण

5 माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण

6 वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण

7 संप्रेषण कौशल्य  - 15 गुण

              *एकूण - 100 गुण* 

           *केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*

१.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (तिसरी आवृत्ती)

         सदर पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.

       तसेच केंद्र प्रमुख परीक्षा पेपर दोनच्या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.

1.केंद्रप्रमुख पेपर 2 व शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षणशास्त्र तांत्रिक ज्ञान घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्न - स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स

2.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)

3.संपुर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संपुर्ण विवेचन व वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते(नववी आवृत्ती)

5 .शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह- डॉ.ह.ना.जगताप

6.शिक्षणातील नवविचारप्रवाह - डॉ.नीलिमा सप्रे, फडके प्रकाशन

7.शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.

         

(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)



स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राज्यामध्ये राबविण्याबाबत

 राज्यात रस्ते अपघातग्रस्त रुग्णांना तत्पर (Golden Hour मध्ये) वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेचे स्वरुप व कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहील :-





१) योजनेचे उद्दिष्ट :- अपघातानंतर पहिल्या ७२ तासात रस्ते अपघात झालेल्या व्यक्तीस तत्पर

वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे.


२) योजनेचे लाभार्थी महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमेतील कोणत्याही रस्त्यांवर अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या व वैद्यकीय उपचाराची तात्काळ आवश्यकता असलेल्या व्यक्ती (अधिवासाच्या अटीशिवाय या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील, औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताने जखमी होणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच द्विरुक्ती टाळण्यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यास शासनाच्या / शासन अंगिकृत उपक्रमाच्या अपघात प्रतीपूर्तीच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.


३) योजनेंतर्गत देण्यात येणारे लाभ:- रस्ते अपघातातील जखमी झालेल्या रुग्णांची परिस्थिती स्थिर करण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सेवा पहिल्या ७२ तासासाठी नजीकच्या अंगीकृत रुग्णालयामधून ७४ उपचार पद्धतींच्या (परिशिष्ट-अ) माध्यमातून देण्यात येतील. योजनेंतर्गत अपघातग्रस्त रुग्णास पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ देण्यात येईल. प्रति रुग्ण प्रति अपघात रुपये ३०,०००/- (रू. तीस हजार) पर्यंतचा खर्च अंतिम केलेल्या package च्या दरानुसार या योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयास विमा कंपनीकडून अदा करण्यात येईल. स्थलांतरित करण्यात आलेल्या रुग्णालयात पुढील उपचाराच्या सेवा उपलब्ध नसल्यास अशा सेवा उपलब्ध असणाऱ्या जवळच्या रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेने ती उपलब्ध नसल्यास पर्यायी रुग्णवाहिकेने रुग्ण स्थलांतरित केला जाईल. अशा परीस्थितीत package च्या दराव्यतिरिक्त रुपये १००० पर्यंत रुग्ण वाहिकेचे भाडे विमा कंपनी मार्फत अंगीकृत रुग्णालयास देण्यात येईल. रुग्णालय जर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत मान्यताप्राप्त असेल व रुग्ण सदर योजनेचा लाभार्थी असेल व होणारे उपचार योजनेपैकी असून त्याची पूर्व मंजुरी मिळाली असेल तर त्या उपचारासंबंधी या योजनेची रक्कम रुग्णालयास मिळणार नाही. अशा परिस्थितीत रुग्णालयास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या / प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पॅकेज ची आर्थिक तरतूद रुग्णालयास मिळेल.


४) रस्ते अपघात प्रतिसाद:- अपघात स्थळाच्या जवळ असलेली कुठलीही व्यक्ती १०८ या क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावेल. आपात्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS- Maharashtra Emergency Medical Services) विभागातर्फे घटनास्थळी रुग्णवाहिका पाठविली जाईल. १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास जवळची शासकीय रुग्णवाहिका, ती उपलब्ध नसल्यास खासगी रुग्णवाहिकेने रुग्णास जवळच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये नेण्याची परवानगी असेल. अपघातग्रस्त रुग्णास रुग्णालयामध्ये निःशुल्क वैद्यकीय सेवा व उपचार दिले जातील. व्यक्ती रुग्णालयात भरती झाल्यापासून पहिल्या ७२ तासांमध्ये दिलेल्या उपचारांच्या खर्चापोटी विमा कंपनी मार्फत रुग्णालयांचे दावे अदा करण्यात येतील.


५) योजनेंतर्गत रुग्णालयात दाखल झाल्यापासून ७२ तासापर्यंत निशुल्क अनुज्ञेय सेवा:- रुग्णालयात


दाखल झाल्यापासून ७२ तासापर्यंत खालील निशुल्क वैद्यकीय सेवा अनुज्ञेय राहतील. १. जखमेतून होणारा रक्त प्रवाह थाबविणे, जखमेस टाके घालणे तसेच ड्रेसिंग करणे असे प्राथमिक


उपचार करणे,


२. अति दक्षता विभाग व वार्डमधील उपचार.


३ अस्थिभंग हेड इंज्युरी, पाठीच्या मणक्याला झालेली दुखापत, जळाल्यामुळे झालेली दुखापत


यावरील उपचार.


४. अस्थिभंग रुग्णासाठी आकस्मिक परीस्थितीत लागणारे इम्प्लांट्स देणे ,

५. रुग्णास साधारण रक्तस्राव झाला असेल तर रक्त (Whole blood) देणे, अतिरक्तस्त्राव झाला असल्यास रक्त घटक पी.सी.व्ही. (Packed cell volume) देणे, अपघातामुळे जळालेला रुग्ण आल्यास आवश्यकते प्रमाणे रक्त घटक प्लाझ्मा (Plasma) देणे, अपघातामुळे अतिरक्तस्राव झाल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे ताजे रक्त किंवा रक्त घटक बिम्बिका (Platelets) देणे. 

६. तज्ञांनी सुचविलेल्या ७४ प्रोसिजर्स मधील विविध तपासण्या व औषधोपचार (परिशिष्ट-अ नुसार).


) अंगीकृत रुग्णालये:- Emergency आणि Polytrauma sevices देण्याची सोय असणारी सर्व


शासकीय आणि इच्छुक खाजगी रुग्णालये तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधील Emergency आणि Polytrauma sevices साठी इच्छुक अंगीकृत रुग्णालयांना या योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात येईल. १०८ रुग्णवाहिकेद्वारे किंवा ती उपलब्ध नसल्यास इतर पर्यायाने अपघातग्रस्त रुग्णास अंगीकृत रुग्णालयात स्थलांतरित केले जाईल. अंगीकृत रुग्णालयांची GPS द्वारे mapping केली जाईल. उपलब्ध उपचार सुविधेच्या आधारे रुग्णालयाची Level १ (Super Specialty Care), Level २ (Secondary care) and Level ३ (First referral care) अशी वर्गवारी करण्यात येईल. ही योजना विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार असून निविदा पद्धतीने निवडण्यात आलेली विमा कंपनी व राज्य आरोग्य हमी सोसायटी तसेच विमा कंपनी व इच्छुक रुग्णालये यांमध्ये करार करण्यात येईल.

७) स्वतंत्र संगणक प्रणाली ही योजना विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार असून विमा कंपनीस


थर्डपार्टी प्रशासक (TPA) नेमण्याची मुभा असेल. रुग्ण नोंदणी, रुग्णालय अंगीकरण, उपचारपूर्व मान्यता दाव्यांचे प्रदान यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात येईल. विमा कंपनीकडून अंगीकृत रुग्णालयास उपचारासाठी मान्यता (Preauthorization) ६ (सहा) तासात दिली जाईल. तथापि अपधातग्रस्त रुग्णावर रुग्णालयाने उपचार सुरु करावेत त्यानंतर संगणकीय प्रणालीवर उपचारास मान्यता घ्यावी असे अपेक्षित आहे. अंगीकृत रुग्णालयाने सादर केलेल्या दाव्यांचे प्रदान विमा कंपनीकडून १५ दिवसांमध्ये केले जाईल.


८) विमा कंपनीने सादर करावयाच्या प्रीमिअम बाबत अटी:- विमा कंपनीने प्रती व्यक्ती प्रती वर्ष असा प्रीमिअम सादर करणे आवश्यक राहील. दाखल होणारा रुग्ण संदर्भाधीन क्रमांक ५ येथील दिनांक २६.०२.२०१९ शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा / प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभार्थी असेल, रुग्णावरील उपचार योजनेच्या उपचारापैकी असेल व रुग्णालय योजनेंतर्गत अंगीकृत असेल तर रुग्णालयास या योजने अंतर्गत पॅकेज रक्कम देय नाही, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील / प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील उपचारात समावेश, रुग्णालय अंगीकृत असणे, लाभार्थी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील / प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेतील असणे या तिन्ही बाबी विचारात घेऊन खालील तक्त्याप्रमाणे सहा शक्यता असू शकतात. त्यानुसार शक्यता क्रमांक १ ते ५ मधील बाबी विचारात घेऊन विमा कंपनीस प्रीमिअमची रक्कम नमूद करणे आवश्यक राहील.

संपूर्ण जीआर. पहा...




जिल्हातंर्गत बदली अपडेट



 जिल्हाअंतर्गत बदलीबाबत...

            _जिल्हा अंतर्गत बदल्या संदर्भात शासन निर्णय तयार झाला असून उद्या किंवा समोरच्या आठवड्यात निघण्याची दाट शक्यता आहे...._

 *आंतरजिल्हा बदलीबाबत...*

               _आंतरजिल्हा बदली संदर्भात वेळापत्रक सुद्धा लवकर निर्गमित होऊन बदल्या कार्यान्वित होणार आहेत..._



 माहिती सौजन्य


                       

                *संतोष पिट्टलावाड*

                      राज्यध्यक्ष

      शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य


                  रवी अम्बुले

               विभागीय अध्यक्ष

शिक्षक सहकार संघटना नागपूर विभाग

१० वी निकाल पहाण्यासाठी ssc result

   माध्यमिक प्रमाणपत्र ssc  ( इ. १0 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या निकालाबाबत

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक  प्रमाणपत्र

(इ. १0 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील



पुढीलप्रमाणे आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १0 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.


१. mahresult.nic.in


२. https://hsc.mahresults.org.in



परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.

 शैक्षणिक क्षेत्रात रहा अपडेट सबस्क्राईब करा ... डिजिटल महाराष्ट्र चॕनल  

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.


तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.