YCMOU BEd प्रवेश 2023-24: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बॅचलर ऑफ एज्युकेशन पदवी कार्यक्रमासाठी प्रवेश देते. हा कार्यक्रम शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असलेली आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत करतो.
हे तुम्हाला विविध अध्यापन तंत्रांबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांची वास्तविक जीवनात अंमलबजावणी करण्यास मदत करते. YCMOU B.ED प्रवेश 2023-24 ऑनलाइन नोंदणी सबमिट करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2023 होती. YCMOU B.ED पदवी कार्यक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध अर्ज होती.
शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी "शिक्षण सेवा पंधरवडा अभियान " राबविणेबाबत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मा. मंत्री (शालेय शिक्षण) महोदयांच्या संकल्पनेस अनुसरुन "शिक्षण सेवा पंधरवडा' आयोजित करावयाचा आहे.
शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वच स्तरातील जसे की विद्यार्थी, पालक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी यांचे अनेक प्रश्न तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रलंबित आहेत. या कारणासाठी त्यांना संबंधित कार्यालयात वारंवार भेटी द्याव्या लागत आहेत आणि या कारणामुळे त्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे. त्यांच्या वेळेची बचत व्हावी आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या सेवा विहित कालमर्यादेमध्ये उपलब्ध होणे आवश्यक आहे.
तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने "शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे, तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गतीमान व पारदर्शक पद्धतीने सेवा विहित कालमर्यादित देण्याच्या अनुषंगाने दि. ५ सप्टेंबर पासून पुढील १५ दिवस "शिक्षण सेवा पंधरवडा यापुढे दरवर्षी राबविण्यात येणार आहे. शासन आदेश पहा....
जोरदार गोंधळानंतर शिक्षक पतसंस्थेची आमसभा निर्णय विना गुंडाळली...
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण आमसभा रविवारी दि. १० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, गोंधळामुळे एकही ठराव मंजूर न करता ही सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे अनेक सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा टीव्ही सेंटर येथील गुलाब विश्व हॉलमध्ये ठेवण्यात आली होती. सभेच्या पहिल्या सत्रात विभागीय सहायक संचालक रवींद्र वाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या सत्रात संचालक मंडळाने तीन ठराव ठेवले...
१) पतसंस्थेतील ठेव एक हजार रुपयांवरून १२०० रुपये करण्यात यावी,
२)कल्याण निधी २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात यावा आणि
३) पतसंस्थेतील संचालक १३ वरून १७ करण्यात यावे या ठरावांचा समावेश होता.
त्याचवेळी सभासदांच्यावतीने दोन ठराव मांडले.
व्याजदर आठ टक्के करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, संचालक मंडळाने साळकर यांनी मांडलेल्या ठरावांना विरोध केला. त्यामुळे सभासदांनी संचालक मंडळाच्या ठरावांनाही जोरदार विरोध दर्शविला. दोन्ही बाजूंनी गोंधळ सुरू झाल्यानंतर ही सभा गुंडाळण्यात आली.
एकही ठराव मान्य न होता आमसभा आटोपली याची खंत सर्वच सदस्य व मागणीकर्ते श्री विजय साळकर श्री गणेश सोनवणे आर.आर.पाटील यांनी व्यक्त केली.
मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी,कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये
आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत.. शासन निर्णय पहा....
शिक्षकांना शिकवू द्या जिल्हा परिषद शाळा टिकू द्या शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षक दिनी लक्षवेधी आंदोलन teachersday
जिल्हा परिषद शिक्षकांना कायमच असणारी अशैक्षणिक कामे, विविध सर्व्हे, ऑनलाईन माहिती, परीक्षेचा भडिमार, बी एल ओ ची कामे अशी विविध अशैक्षणिक कामे बंद करून "शिक्षकांना शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकवू द्या!"असे लक्षवेधी बॅच लावून उद्या शिक्षक दिनी शिक्षकांनी काम करावे असे आवाहन शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
शिक्षक दिनानिमित्त देशभर शिक्षकांचा सन्मान होत असताना जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शाळा सध्या बदनाम करण्याचा विविध माध्यमातून प्रयत्न होत आहे ही बाब अतिशय गंभीर असून शिक्षकांना अशी अशैक्षणिक काम लादून ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा आरोप समन्वय समिती च्या वतीने करण्यात आला आहे. शिक्षकांना वेगवेगळी उपद्रवी उपक्रमामुळे व मागितल्या जाणाऱ्या माहितीमुळे संपूर्ण शिक्षक त्रस्त झाले आहे.
याचा निषेध म्हणून औरंगाबाद जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने एकत्र येऊन शासनापर्यंत रोष व्यक्त होण्यासाठी व आपल्या भावना पोहोचवण्यासाठी सर्वांनी शिक्षक दिनी "आम्हाला शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकू द्या" अशा आशयाचे घोषवाक्याचे टॅग लावून शिक्षक काम करणार असल्याचे शिक्षक समन्वय समिती तर्फे आवहान करण्यात आले आहे.
'आदर्श शिक्षक पुरस्कार' म्हणजे भीक लागली की खैरात?
श्याम नाडेकर यांच्या लेखणीतून
(लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर )
'तुम्हाला आम्ही पुरस्कार देतो, त्यासाठी तुम्हीच प्रस्ताव पाठवा', असे म्हणणे आणि प्रस्ताव पाठवल्यावरही 'छाटणी करून पुरस्कार देऊ', असा प्रकार करणे म्हणजे शिक्षकाचा आणि त्याच्या सेवेचा अपमानच नव्हे का? असाच काहीसा प्रकार 'आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या बाबतीत होत असल्याची चर्चा शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक वर्तुळात रंगायला लागली आहे.
शिक्षक दिनाच्या पर्वावर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना 'आदर्श शिक्षक पुरस्कारा'ने गौरविण्यात येते. मात्र, यासाठी स्वतः शिक्षकांना स्वतःच्या कार्याचा गवगवा करणारे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करावे लागते.
केलेले अथवा करत असलेले उल्लेखनीय कार्य प्रखरतेने दिसत असताना, त्या कार्याची दखल स्वतः घेण्याऐवजी शिक्षकालाच स्वत:विषयी प्रस्ताव पाठवण्यास सांगणे, योग्य ठरते का? हा प्रकार म्हणजे, पुरस्कार भिकेमध्ये देण्यासारखे किंवा शासनाकडून खैरात वाटण्यासारखाच असल्याची खंत जिल्ह्यातील अनेक स्वाभिमानी शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.