जोरदार गोंधळानंतर शिक्षक पतसंस्थेची आमसभा निर्णय विना गुंडाळली...
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण आमसभा रविवारी दि. १० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, गोंधळामुळे एकही ठराव मंजूर न करता ही सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे अनेक सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा टीव्ही सेंटर येथील गुलाब विश्व हॉलमध्ये ठेवण्यात आली होती. सभेच्या पहिल्या सत्रात विभागीय सहायक संचालक रवींद्र वाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या सत्रात संचालक मंडळाने तीन ठराव ठेवले...
१) पतसंस्थेतील ठेव एक हजार रुपयांवरून १२०० रुपये करण्यात यावी,
२)कल्याण निधी २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात यावा आणि
३) पतसंस्थेतील संचालक १३ वरून १७ करण्यात यावे या ठरावांचा समावेश होता.
त्याचवेळी सभासदांच्यावतीने दोन ठराव मांडले.
व्याजदर आठ टक्के करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, संचालक मंडळाने साळकर यांनी मांडलेल्या ठरावांना विरोध केला. त्यामुळे सभासदांनी संचालक मंडळाच्या ठरावांनाही जोरदार विरोध दर्शविला. दोन्ही बाजूंनी गोंधळ सुरू झाल्यानंतर ही सभा गुंडाळण्यात आली.
एकही ठराव मान्य न होता आमसभा आटोपली याची खंत सर्वच सदस्य व मागणीकर्ते श्री विजय साळकर श्री गणेश सोनवणे आर.आर.पाटील यांनी व्यक्त केली.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.