डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षक बदली नविन धोरण | teachers-transfer-online-transfer|

 जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन वाचा क्र.१ येथील दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबतचे सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे.





 त्यानुसार सन २०२२ ची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर काही शिक्षक संघटनांकडून सूचना/निवदने शासनास प्राप्त झाली आहेत. तसेच शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील काही तरतूदी आव्हानित करणाऱ्या रिट याचिका मा. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भातील गांभीर्य विचारात घेवून रिट याचिका क्र. ६७७/२०२३ मध्ये संदर्भ क्र. २ येथील दि.१३.०१.२०२३ रोजीच्या पत्रान्वये मा. उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरुन, जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील तरतूदी व त्याअनुषंगाने प्राप्त सूचना/निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी वाचा क्र. ३ येथील दि. १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट नेमण्यात आला. सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :

उपरोक्त बाबींचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय

अधिक्रमित करुन आता जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारीत धोरण निश्चित करण्यात येत आहे.


व्याख्या :-


१.१ अवघड क्षेत्र: परिशिष्ट १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.


१.२ सर्वसाधारण क्षेत्र: वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.


१.३ बदली वर्ष: ज्या कैलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.


१.४ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा.


१.५ शिक्षक :- या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक.


१.६ सक्षम प्राधिकारी शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे


सक्षम प्राधिकारी असतील.


१.७ बदली अधिकार प्राप्त शिक्षक :-


१.७.१ बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.


१.७.२ अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिध्द केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणुन घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा ३ वर्ष झालेली असेल तर, त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राहय धरण्यात येईल.


१.७.३. बदली प्रक्रीयेमधून वगळण्यात येणारे शिक्षकः-


१) पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक.


२) बदली प्रक्रीया सुरु असताना निलंबित / सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक.


१.८ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१: खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जातील.


१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)

१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक


१.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक


१.८.४ एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले / मुत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस शिक्षक


१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक


१.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक


१.८.७ मेंदुचा आजार झालेले शिक्षक


१.८.८ बॅलेसेमिया / कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase deficiency व इतर आजार) (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांचेवर उपचार सुरू आहेत असे शिक्षक १.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा


१.८.१० विधवा शिक्षक


१.८.११ कुमारिका शिक्षक


१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक


१.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक


१.८.१४ स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)


खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :


१.८.१५ हृदय शस्त्रक्रिया झालेले


१.८.१६ एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले


१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले


१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले


१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.


१.८.२० चॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले


१.९ विशेष संवर्ग शिक्षक भाग २: पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)


१.९.१ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर.


१.९.२ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर,


१.९.३ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर,


१.९.४ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/नगरपालिका


१.९.५ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी


१.९.६ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक / कर्मचारी असेल तर,


१.९.७ पती-पत्नी दोघांपैकी एक / दोघेही शिक्षणसेवक / तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक म्हणून


कार्यरत असेल तर,


१.१० बदलीस पात्र शिक्षक :-


बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित घरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक, तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल...


प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यवाही बाबत.|mdm scheme|

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ अंतर्गत करावयाच्या कार्यवाही बाबत.


राज्यामध्ये विदर्भ वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेची नवीन शैक्षणिक वर्षामध्ये अंमलबजावणी करतांना खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तसेच जिल्हा स्तरावरुन याविषयी नियमितपणे संनियंत्रण करण्यात येईल याची दक्षता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी स्वतः घ्यावयाची आहे.

१. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमधून मिष्ठान्न भोजन अथवा पदार्थ सर्व पात्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावेत.


२. शाळेच्या पहिल्या दिवसापासून योजनेस पात्र सर्व विद्यार्थ्यांना निश्चित करण्यात आलेल्या पाककृतीनुसार पोषण आहार उपलब्ध करुन देण्यात यावा. काही कारणामुळे आहार शिजविण्यास अडचणी असल्यास, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सदरची अडचण त्वरीत दूर करुन संबंधित शाळेत आहार शिजविला जाईल याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे.


३. जिल्ह्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमधून सर्व कार्यदिवसांमध्ये पोषण आहार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जाईल याची दक्षता घ्यावी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घ्यावयाची आहे.


४. जिल्हा / तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी खालील लिंक वर भेट देऊन दररोज दुपारनंतर आपल्या जिल्हा/तालुक्यातील शाळांनी लाभ दिलेबाबत खात्री करावयाची आहे. काही शाळा माहिती भरण्याकरीता प्रलंबित असल्यास योजनेचा लाभ दिलेबाबत संबंधित शाळांची माहिती त्याच दिवशी एमडीएम पोर्टलवर नोंदविली जाईल याची दक्षता घ्यावयाची आहे.


https://pmposhan-ams.education.gov.in/School_Reported_today_total_view.aspx


५. वरील लिंक वर आपल्या तालुका तथा जिल्ह्यातील शाळांची सद्यस्थिती आपणास पाहण्यास उपलब्ध आहे. दररोज जिल्ह्यातील योजनेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांनी आहार दिलेबाबतची नोंद एमडीएम पोर्टलवर करणे अनिवार्य आहे.

६. तालुका तथा जिल्ह्यातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करुन देखील एम.डी.एम पोर्टलवर माहितीची नोंद न केल्यास त्याकरीता संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आणि जिल्ह्याकरीता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना व्यक्तिशः जबाबदार समजण्यात येऊन पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्राकरीता संबंधित प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग हे याकरीता जबाबदार राहतील याची गांभीर्याने नोंद घ्यावयाची आहे.


७. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांनी राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमितपणे आहार देण्यात येऊन, दिलेल्या आहाराची नोंद एमडीएम पोर्टलवर त्याच दिवशी होईल याकरीता विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिलेले आहेत.


८. शाळास्तरावर अथवा तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही तांत्रिक अडचणी असल्यास त्वरीत त्याचे निराकरण जिल्हा कार्यालयाने करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावरुन संबंधित अडचणींचे निराकरण शक्य नसल्यास त्वरीत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा.


९. उन्हाळी सुट्टीनंतर शाळांचे कामकाज सुरु होत असल्याने सर्व शाळांमधील स्वयंपायगृहे, भाडी, तांदुळ व धान्यादी माल स्वच्छ असल्याची खात्री करुन घेण्यात यावी. मुलांना आहार स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण वातावरणामध्ये उपलब्ध होईल याची दक्षता घेणेत यावी.


१०. केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना वरील नमूद सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने आवश्यक ते निर्देश आपलेस्तरावरुन देण्यात यावेत.


११. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये योजनेस पात्र सर्व शाळांमधून परसबाग निर्मितीचे उद्दिष्ठ ठेवण्यात आलेले आहे. याकरीता स्थानिक प्रगतीशील शेतकरी, पालक, विद्यार्थी, स्वयंपाकी तथा मदतनीस आणि शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांची मदत घेण्यात यावी व शाळेमध्ये उत्कृष्ठ परसबाग विकसित होईल याचे नियोजन करण्यात यावे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी परसबाग निर्मितीबाबत प्रत्येक महिन्याला तालुक्यांकडून प्रगती अहवाल घेऊन संचालनालयास कळवावे.


१२. प्रत्येक तिमाही नंतर योजनेस पात्र सर्व मुलांच्या वजन व उंचीची नोंद नोंदवही मध्ये घेण्यात यावी. लवकरच सर्व शाळांना नोंदवह्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होईल याची नियोजन करण्यात यावे. जंतनाशक गोळ्या आणि आयर्न आणि फोलिक अॅसिड गोळ्यांचा लाभ आरोग्य विभागामार्फत योजनेस पात्र सर्व शाळांमधून दिला जाईल याकरीता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी आवश्यक तो संपर्क करण्यात यावा.


प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेच्या प्रत्येक दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चांगला, दर्जेदाज आहार उपलब्ध होईल याची आवश्यक ती दक्षता घ्यावी.






प्रवेशोत्सव फलकलेखन

 प्रवेशोत्सव फलक लेखन 


नविन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !







सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत

 राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे / सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत.

शुध्दीपत्रक :-


वाचा येथील क्र.२ येथील दिनांक २२ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या परिपत्रकातील क्र.२ च्या पृष्ठावर तिसऱ्या ओळीत "१.१.२०१६ रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर या वाक्याऐवजी १.१.२०१६ रोजी व तद्नंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर असे वाक्य वाचण्यात यावे.

11111

क्र.२ च्या पृष्ठावर पाचव्या ओळीत दि.१.१.२०१६ रोजी च्या पुढे किंवा तद्नंतर " या शब्दांचा समावेश करण्यात यावा.


सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०६१२१६१४५७७८०५ असा आहे.







विद्यार्थी अभावी सरकारी शाळेवर संकट|school close admission zpschool|

 राज्यातील १५ हजार शाळा बंद होण्याचा धोका  ?

जीवन शिक्षण मासिकासाठी लेख/साहित्य पाठविण्याबाबत

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे सर्व शिक्षणाधिकारी यांना आदेश

विषय : 'जीवन शिक्षण' मासिकाच्या पुनर्रचनेनुसार साहित्य पाठविण्यास सर्व शिक्षक, अधिकारी यांना कळविण्याबाबत...


उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यास येते की, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे ३०. यांच्या मार्फत जीवन शिक्षण हे मासिक दरमहा प्रकाशित केले जाते. या मासिकाला १५० वर्षाहून अधिक वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. प्राथमिक/माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावणारे हे मासिक शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र म्हणून वितरीत करण्यात येते.


जीवन शिक्षण मासिकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वदूर प्राथमिक शाळांतील शिक्षण विषयक नवे विचार, नव्या जाणिवा, शैक्षणिक संशोधन व नवीन शैक्षणिक तंत्रे शिक्षकांपर्यंत पोहचविले जातात. शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापनातील गरजा व अडचणी विचारात घेवून वेळोवेळी नवीन अभ्यासक्रमसंदर्भात तज्ज्ञांचे लेख, शिक्षण विषयक विचार आणि मार्गदर्शन शिक्षकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले जाते.


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विषयीची माहिती, शिक्षकांची प्रज्ञा, प्रतिभा यांच्या संपूर्ण विकासासाठी विविध लेख, मुलाखती, अनुभव आदी अंतर्भूत करण्यात आलेले असतात विद्यार्थ्यांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रभक्ती या मूल्यांच्या संस्कारासाठी सोप्या सुगम भाषेत लेख दिलेले असतात. शिक्षण क्षेत्रातील नवोपक्रम, प्रकल्प, नवसंशोधन, शिक्षण क्षेत्रातील घडामोडी अशा लेखांचा अंतर्भात असतो. शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना यांचा अंतर्भाव असतो. शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, अधिकारी, संस्था अदययावत राहण्यासाठी या अंकातील ज्ञान, माहिती अत्यंत उपयुक्त असते. ज्यामुळे शिक्षकांची, शाळांची गुणवत्ता वृध्दिगत होण्यास मदत होते.


तरी आपल्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विषय साधनव्यक्ती, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अध्यापक विदयालयातील अध्यापकाचार्य, छात्राध्यापक इत्यादीनी खाली दिलेल्या मुद्दयांप्रमाणे जीवन शिक्षण मासिकासाठी लेख/साहित्य पाठविण्याबाबत आपणामार्फत कळविण्यात यावे.


• संशोधनात्मक लेख यामध्ये संशोधन उद्दिष्टे, कार्यवाही, फलनिष्पती, निष्कर्षाचे सार्वत्रिकीकरण व आवश्यक पुरावे असणारे लेख.


• नवोपक्रम अधिकारी, शिक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात राबविलेले नवोपक्रम याविषयी नवोपक्रमाची उद्दिष्टे, कार्यवाही, फलनिष्पती, आवश्यक पुरावे यानुसार मद्देसूद मांडणी असणारे लेख.


• स्थानिक शिक्षण तज्ज्ञ, अभ्यासक यांचे शिक्षणविषयक लेख पाठविण्याबाबत प्रोत्साहन दयावे.


• ज्या शिक्षकांची मागील २ महिन्यात शैक्षणिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी दोन प्रतीत पुस्तके व त्यांचा सारांश पाठविण्याचे आवाहन करण्यात यावे. जीवन शिक्षण अंकात प्रत्येक महिन्यात उचित निकषानुसार पुस्तकांचा सारांश व संबंधित लेखकांची माहिती प्रकाशित करण्यात येणार आहे.


• Ph.D व इतर राज्य, राष्ट्रीय पुरस्कार यांची माहिती व पुरावे घेऊन अशा अधिकारी, शिक्षक यांची माहिती जीवन शिक्षण मासिकात प्रसिध्दी करण्याबाबत पाठविण्यात यावी.

• अधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी वैशिष्ट्यपूर्ण शाळा, संस्था यांना दिलेल्या भेटी व त्यावर आधारित लेख.


• आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकारी, शिक्षक यांचे पुस्तक परीक्षण (Book Review) मागील दोन महिन्यात प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर आधारीत (नवीन पुस्तके) परीक्षणात्मक तथा पुस्तकांचे वाचन करून संबंधितांनी लिहिलेले लेख.


वरीलप्रमाणे उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण लेखन असणाऱ्या लेखांनाच 'जीवन शिक्षण' मासिकामधून प्रसिध्दी देण्यात येईल.





इयत्ता २ री चे वार्षिक नियोजन

 इयत्ता २ री चे वार्षिक नियोजन ....



डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

घेऊन आला आहे....

शिक्षक मित्र समूह निर्मिती असलेले खास अभ्यासक्रमाचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक नियोजन ....


पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा....