जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन वाचा क्र.१ येथील दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबतचे सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुसार सन २०२२ ची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर काही शिक्षक संघटनांकडून सूचना/निवदने शासनास प्राप्त झाली आहेत. तसेच शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील काही तरतूदी आव्हानित करणाऱ्या रिट याचिका मा. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भातील गांभीर्य विचारात घेवून रिट याचिका क्र. ६७७/२०२३ मध्ये संदर्भ क्र. २ येथील दि.१३.०१.२०२३ रोजीच्या पत्रान्वये मा. उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरुन, जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील तरतूदी व त्याअनुषंगाने प्राप्त सूचना/निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी वाचा क्र. ३ येथील दि. १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट नेमण्यात आला. सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :
उपरोक्त बाबींचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय
अधिक्रमित करुन आता जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारीत धोरण निश्चित करण्यात येत आहे.
व्याख्या :-
१.१ अवघड क्षेत्र: परिशिष्ट १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.
१.२ सर्वसाधारण क्षेत्र: वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.
१.३ बदली वर्ष: ज्या कैलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.
१.४ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा.
१.५ शिक्षक :- या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक.
१.६ सक्षम प्राधिकारी शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे
सक्षम प्राधिकारी असतील.
१.७ बदली अधिकार प्राप्त शिक्षक :-
१.७.१ बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.
१.७.२ अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिध्द केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणुन घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा ३ वर्ष झालेली असेल तर, त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राहय धरण्यात येईल.
१.७.३. बदली प्रक्रीयेमधून वगळण्यात येणारे शिक्षकः-
१) पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक.
२) बदली प्रक्रीया सुरु असताना निलंबित / सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक.
१.८ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१: खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जातील.
१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)
१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक
१.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक
१.८.४ एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले / मुत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस शिक्षक
१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक
१.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक
१.८.७ मेंदुचा आजार झालेले शिक्षक
१.८.८ बॅलेसेमिया / कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase deficiency व इतर आजार) (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांचेवर उपचार सुरू आहेत असे शिक्षक १.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा
१.८.१० विधवा शिक्षक
१.८.११ कुमारिका शिक्षक
१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक
१.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक
१.८.१४ स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)
खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :
१.८.१५ हृदय शस्त्रक्रिया झालेले
१.८.१६ एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले
१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले
१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले
१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.
१.८.२० चॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले
१.९ विशेष संवर्ग शिक्षक भाग २: पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)
१.९.१ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर.
१.९.२ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर,
१.९.३ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर,
१.९.४ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/नगरपालिका
१.९.५ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी
१.९.६ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक / कर्मचारी असेल तर,
१.९.७ पती-पत्नी दोघांपैकी एक / दोघेही शिक्षणसेवक / तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक म्हणून
कार्यरत असेल तर,
१.१० बदलीस पात्र शिक्षक :-
बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित घरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक, तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल...
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.