डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

विद्यार्थी अभावी सरकारी शाळेवर संकट|school close admission zpschool|

 राज्यातील १५ हजार शाळा बंद होण्याचा धोका  ?


विभागनिहाय स्थिती


  • मराठवाडा : २,१६३

  • विदर्भ : ३,५२३

  •  खान्देश : ३९१

  • पश्चिम महाराष्ट्र : ४,८३१

  • पुणे व मुंबई : ४,०९१

एकूण : १४,९९९



राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद आणि खासगी मिळून सुमारे १५ हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. एकट्या विदर्भात अशा शाळांची संख्या ३ हजार ५२३ इतकी आहे. यासंदर्भात तातडीने पाऊले उचलण्यात न आल्यास हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण होत आहे.



या शाळाच बंद होत असल्याने शिक्षण व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बंद होणाऱ्या विभागनिहाय शाळांमध्ये मराठवाड्यात औरंगाबाद ३४७, नांदेड ३९४, हिंगोली ९३, परभणी १२६, जालना १९०, बीड ६३३, लातूर २०२, उस्मानाबाद १७८; खान्देशमध्ये जळगाव १०७, धुळे ९२, नंदुरबार १९२; पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर ३४२, सातारा १४०, रत्नागिरी १,३७५, सिंधुदुर्ग ८३५, कोल्हापूर ५०७, सांगली ४१५, पालघर ३१७; मुंबई उपनगरांतील ८६, मुंबई-२मधील ३१, ठाणे ४४१, रायगड १,२९५, पुणे १,१३२, पुणे १,१३२, नाशिक ३३१ आणि अहमदनगरमधील ७७५ शाळांचा समावेश आहे.

सरकारी शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळात शिक्षणाचा प्रवाह पोहचविला जातो.  
अकोल्यामध्ये ही परिस्थिती बदलण्यासाठी शाळा बचाव समितीची स्थापना करण्यात आली. शाळा बचाव समितीचे पदाधिकारी गावोगावी भेटी देऊन, जनजागृती शाळा बचाव करीत आहेत.

 विद्यार्थी संख्या कशी वाढवली जाईल, शाळा टिकवण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचाही इशारा देण्यात आला आहे. 


1 Comments:

अनामित म्हणाले...

त्या त्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक मिळून पालकांशी सुसंवाद, विद्यार्थ्याशी जिव्हाळा, गुणवत्ता, प्रसंगी शाळा, घरी ने, आण करने (विद्यार्थ्यांना ), उपक्रम, कृती, खेळ आयोजित करणे, आपापल्या त unity , team work etc