शिक्षा सप्ताह, दिवस सहावा
वार शनिवार दि. २७/०७/२०२४
Eco clubs for Mission LIFE Day
शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि #Plant4Mother या अभियान अंतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवार दि.२७/०७/२०२४ रोजी आयोजन करणे.
अ) शाळेमध्ये Eco clubs for Mission LIFE या थीम अंतर्गत Plant4 Mother अभियान आयोजित करण्यासाठी सूचना
वृक्षारोपण मोहिमेचे दि.२७/०७/२०२४ रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे. शालेय परिसर, घर, सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे. शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात यावी. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान ३५ रोपे लावावीत.
विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग : विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत. यामुळे विधार्थी, त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल.
नावांचे फलक लावणे विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा.
रोपाचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे:- विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक/अध्यक्ष/सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी, पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करावी.
![]() |
मुरूमखेडावाडी शाळेत दरवर्षी घनवनाचा वाढदिवस विद्यार्थी |
वरील उपक्रमाच्या अनुषंगाने-
१. जिओटॅग केलेले फोटो अपलोड करणे शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे जिओटॅग केलेले फोटो, सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकर लिंकवर अपलोड करावेत. https://docs.google.com/spreadsheets/d/13mepPOy8gmyX5HR4D1Swob OztSgb15eQRBNrFMwo/edit?gid=15896978#gid=15896978
२. सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे या मोहिमेबद्दल संमाजात जाणीवजागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो #Plant4 Mother आणि # एक पेड़ माँ के नाम हे हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करावेत.
ब) शाळांमध्ये मिशन लाइफसाठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबतच्या सूचना
शाळांमधील मिशन लाइफसाठी इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात. हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहांच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वतर्नशैलीला प्रोत्साहित करते. इको क्लब हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील, पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती जाणून घेण्यास
सक्षम करतात. केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील ८२३२ शासकीय शाळा व CBSE व इतर
व्यवस्थापनाच्या ५३८६ शाळांनी इको क्लबची स्थापना करावी.
मिशन लाइफसाठी इको क्लबची स्थापनाः विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी ज्या शाळांमध्ये इको क्लबची स्थापना केलेली नसेल त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांनी मिशन लाइफसाठी इको क्लब स्थापन करावेत आणि
इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी.
नेतृत्व :- शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाइफसाठी इको क्लबचे प्रमुख /मार्गदर्शक असतील आणि इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमांचे आणि शैक्षणिक प्रगतीची देखरेख करतील.
समन्वयकाची जबाबदारी:- मिशन लाइफसाठी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील पदव्युत्तर शिक्षक (PGT) किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) यांची नियुक्ती करावी. या शिक्षकाकडे इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयकाची जबाबदारी देण्यात यावी. हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांच्या तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनरावलोकनासाठी सादर करतील.
मिशन लाइफसाठी इको क्लबची रचना-
> इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील ४-५ विद्यार्थी असतील.
> मिशन लाइफसाठी क्लबचे इको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाईल > शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या
उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावे.
> ऊर्जा संवर्धन, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयांवर आधारित
उपसमित्यांची स्थापना करावी.
> इको क्लव अंतर्गत उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करावे. प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.