डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणान्या जाहिरातींसाठी एसईबीसी/इमाव या प्रवर्गातील आरक्षणाच्या लाभबाबत |pavitra-portal-teacher-job|

 पवित्र पोर्टलमार्फत खाजगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणान्या जाहिरातींसाठी एसईबीसी/इमाव या प्रवर्गातील आरक्षणाच्या लाभ तसेच १० टक्के रिक्त पदांकरीता कार्यवाही करणेबाबत..

बिंदुनामावलीतील त्रुटींबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून शहानिशा करणेबाबत मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार १० टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. याअनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून बिंदुनामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रूटी नसल्याबाबत शहानिशा करुन १० टक्के रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दूसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त १० टक्के पदभरतीचा समावेश करण्यात यावा.

२. भरतीप्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरतीप्रक्रियेचा एक भाग आहे. यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात याव्यात. तसेच शासन निर्णय दि.१०.११.२०२२ अन्वये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहीराती घेण्यात येतील, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. यानुसार आपण प्रस्तावित केल्यानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरात देण्याची सुविधा देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

३. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता अधिनियम, २०२४ राज्यात दि. २६.०२.२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. याअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्रांद्वारे वेळोवळी दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन, नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) या प्रवर्गाकरीता विहीत आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देणेबाबत सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात.
४. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी, २०२२ अनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद केलेले उमेदवारांना सद्यस्थितीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरीता असलेले आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे. यास्तव सदर उमेदवारांना यापुढील येणाऱ्या जाहीरातीमध्ये प्राप्त होणारे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी. तसेच शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२ च्या आधारे यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेबाबतची माहिती उमेदवारांनी नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चूकीमूळे उमेदवारांना त्यांनी अर्हता प्राप्त करुनही अशा उमेदवारांना विचारात घेण्यात आले नाही. यास्तव दि.१२.०२.२०२३ पूर्वी विहीत अर्हता प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना यापुढील जाहीरातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरीता स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी देण्यात यावी. असे आदेशात नमुद करण्यात आलेले आहे. 

संपूर्ण आदेश पहा....






0 Comments:

टिप्पणी पोस्ट करा

याबाबत आपली काॕमेंट करा.