डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
Teacher Job लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Teacher Job लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सेवानिवृत्त शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू

 

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ८५८ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यात प्राथमिक शिक्षकांसह पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १०१ शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम निर्णय या आठवड्यात होणार आहे.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आला होता. या निर्णयाला शिक्षक संघटनाकडून विरोधही झाला.
मात्र, शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळा व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून वीस हजार रुपये मानधनावर कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपाची सेवानिवृत्त शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सुरू केली आहे. जिल्ह्यात ८५८ शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. त्यानुसारही कंत्राटी भरती सुरू झाली आहे.


पहिल्या टप्प्यात १८७ सेवानिवृत्त शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी १२७ सेवानिवृत्त शिक्षकांना बोलविण्यात आले होते. त्यांपैकी १०४ सेवानिवृत्त शिक्षक कागदपत्र पडताळणीला उपस्थित राहिले. यात १०१ शिक्षकांची निवड शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.
शिक्षक भरती (Teachers recruitment)

 शिक्षक भरती (Teachers recruitment) 15 मे नंतर संच मान्यता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया  जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाणार  आहे. त्यासाठी लवकरच शिक्षक भरतीसाठी असलेले पवित्र पोर्टल हे अॕक्टिव्ह होणार आहे.🔘 विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर संच मान्यता 15 मे रोजी अंतिम केली जाणार आहे.

🔘 शिक्षण विभागाकडून संच मान्यतेचे शाळा निहायवितरण 20 मे पर्यंत होणार आहे.


🔘   या संच मान्यतेतील मंजूर पदांनुसार पद भरतीची(Teachers recruitment)  कार्यवाही सुरु होईल.

 

🔘  संबंधित शाळा व्यवस्थापनांना शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर 15 जुलै पर्यंत रिक्त पदे नोंदवून पोर्टलवर जाहिरात दिली जाईल.

 

🔘   शिक्षण संचालनालयाकडून 17 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार टेट परीक्षेच्या निकालानंतरची पदभरतीची (Teachers recruitment) कार्यवाही सुरु करणे आवश्यक असल्याचं प्रधान सचिवांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे.

नॉन क्रिमिलिअर ची अट महिला उमेदवारांसाठी रद्द वाचा सविस्तर...

🔘  20 ऑगस्टपर्यंत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे आधी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.


या ब्लाॕगला  खालील Follow  बटणने follow करा व अपडेट रहा....