डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
Online Transfer लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Online Transfer लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आंतरजिल्हा आणि जिल्हाअंतर्गत बदली धोरण मसुदा 2024-25|teacher transfer|

 आंतरजिल्हा आणि जिल्हाअंतर्गत बदली धोरण मसुदा 2024-25



जिल्हा अंतर्गत बदली बाबत


वाचा.


1) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021


2) ग्राम विकास विभाग, पत्र क्र. जिपब-2022/प्र. क्र.29/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 03/06/2022


3) ग्राम विकास विभाग, पत्र क्र. जिपब-2022/प्र. क्र.29/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 10/06/2022 (मुद्दा क्र.4 व 6)


4) ग्राम विकास विभाग, पत्र क्र. जिपब-2022/प्र. क्र. 175/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 25/07/2022 (मुद्दा क्र.2)


5) ग्राम विकास विभाग, पत्र क्र. जिपब-2022/प्र. क्र.29/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 26/08/2022 (मुद्दा क्र.2 व 3)


6) ग्राम विकास विभाग, पत्र क्र. जिपब-2022/प्र. क्र.29/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 13/01/2023


7) ग्राम विकास विभाग, पत्र क्र. जिपब-2022/प्र. क्र. 29/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 08/02/2023 (मुद्दा क्र.2)


1) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.1.3,1.8 व 5.6 मध्ये "शासन निर्णयात नमूद कालावधीपेक्षा बदली प्रक्रिया अंमलबजावणी कालावधी मध्ये वाढ झाल्यास विशेष संवर्ग १ अंतर्गत संबंधित शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी सादर करावयाचे प्रमाणपत्र हे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या कालावधी पर्यंतचे ग्राह्य धरण्यात येईल". असे वाचण्यात यावे.


2) जे शिक्षक पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांचा समावेश बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही.


3) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.4.2.6 मध्ये "विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार/ नकार दर्शवल्यास, तसेच दिलेले पर्याय उपलब्ध न झाल्यास, संबंधित शिक्षक बदलीच्या पुढील संवर्गामध्ये पात्र होत असल्यास, संबंधितांना पात्र संवर्गामध्ये बदलीची संधी देण्यात येईल". असे वाचण्यात यावे.


4) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.1.10 व 4.5 मध्ये "विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत पात्र शिक्षकाने बदलीतून सूट घेतल्यास, संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदलीपात्र असल्यास, जोडीदाराची पात्रतेनुसार संबंधित संवर्गातून बदली केली जाईल". असे वाचण्यात यावे.


5) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र. 4.2.8 नुसार:- मध्ये विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित प्रमाणपत्र ऑनलाईन युडीआयडी / त्री-सदस्यीय समितीची स्वाक्षरी असलेले ग्राह्य धरण्यात येईल.


6) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.4.3.6मध्ये "विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांना विनंती बदलीसाठी ३ वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही". असे वाचण्यात यावे.


7) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.1.9 नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-2:- विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत जोडीदार शिक्षणसेवक, तात्पुरत्या स्वरूपात निलंबित शिक्षक असल्यास संबंधितांना या संवर्गाचा लाभ देता येईल, याकरिता प्रणालीमध्ये अशा शिक्षकांचे शालार्थ आय डी नमूद करण्याची सुविधा देण्यात येईल.


8) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र. 4.3.5 नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 मध्ये विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून ३० कि.मी. अंतराबाबत सादर केलेले प्रमाणपत्र / दाखला याची पडताळणी गट शिक्षणअधिकारी यांचे द्वारा तालुका स्तरावर करण्यात यावी.

9


) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र. 1.3 व 5.6 नुसार शासन निर्णयात नमूद कालावधीपेक्षा बदली प्रक्रिया अंमलबजावणी कालावधी मध्ये वाढ झाल्यास विशेष संवर्ग २ अंतर्गत संबंधित शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी अंतराबाबत सादर करावयाचे प्रमाणपत्र / दाखला हे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या कालावधी पर्यंतचे ग्राह्य धरण्यात येईल.


10) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र. 1.7 मध्ये "बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक: बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक" तसेच ज्या शाळा 2019 मध्ये अवघड क्षेत्र म्हणून घोषित केले होते तेथील शिक्षकांना 2022 मध्ये बदली अधिकार प्राप्त असताना बदली ची संधी मिळाली नाही म्हणून अशा शिक्षकांची सेवा ही 2019 च्या अवघड क्षेत्रानुसार पुढील बदली वर्षात ग्राह्य धरण्यात यावी.


11) राज्यघटनेतील १४व्या कलमातील तरतुदीनुसार कोणतेही ठिकाण लिगभेदानुसार प्रतिकूल किंवा अनुकूल ठरविता येत नाही त्यानुसार शासन परिपत्रक दिनांक २० ऑगस्ट २०१९ मधील महिलांसाठी अनुकूल व प्रतिकूल याबाबतचे वरील परिपत्रक रद्द करण्यात येत आहे.


12) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.4.4.5 मध्ये "बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देता येईल याऐवजी संबंधित संवर्गातील शिक्षकांना निव्वळ रिक्त जागांवर व बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देण्यात येईल". असे वाचण्यात यावे.


13) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र. 1.10- बदलीस पात्र शिक्षकः बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पुर्ण झलेली आहे असे शिक्षक. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. तसेच अवघड क्षेत्रात ज्या शिक्षकांची सलग सेवा १० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली असेल व सध्याच्या शाळेतील सेवा ५ वर्ष किंवा अधिक झाली असेल अश्या शिक्षकांचा समावेश बदली पात्र शिक्षकांच्या संवर्गात करण्यात येईल.


14) बदली अधिकार प्राप्त या संवर्गातील शिक्षकांना बदली पात्र संवर्गाप्रमाणे पती-पत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात यावा.


15) बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना एकूण सेवा जेष्ठतेऐवजी अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवा जेष्ठता विचारात घेऊन प्राधान्य देण्यात येईल.


16) 1.10- बदलीस पात्र शिक्षक : बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी


निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पुर्ण झलेली आहे असे शिक्षक. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. मध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवा जेष्ठता विचारात घेऊन सर्व साधारण क्षेत्रात १० वर्ष पूर्ण सेवा केलेल्या व सध्याच्या शाळेत ५ वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या शिक्षकांना वास्तव सेवा जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदलीने पदस्थापना देण्यात येतील.


अ) असे पात्र शिक्षक विशेष संवर्ग भाग १ मध्ये पात्र असल्यास त्यांनी संबंधित संवर्गामधून बदलीस होकार नकार देणे अनिवार्य राहील.


ब) टप्पा क्र. ६ अंतर्गत विशेष संवर्ग भाग २ मधील कोणत्याही तरतुदी लागू राहणार नाहीत. भ) टप्पा क्र. ६ अंतर्गत बदलीपात्र या संवर्गाप्रमाणे पती-पत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ घेता येईल.


17) बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ठ शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाइल पडताळणी व दुरुस्ती हि सुविधा संबंधित बदली प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी अंतिम केली जाईल. बदली प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची प्रोफाइल दुरुस्ती अनुज्ञेय राहणार नाही.

18) संपूर्ण जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यासाठी १३० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागत असल्याने २०२४-२५ पासून २६ जानेवारी रोजी प्रक्रिया सुरु करण्यात येईल, व माहे मे अखेरीस संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असेल या नुसार बदली वर्षातील शिक्षकांची कार्यमुक्ती माहे जून अखेरीस पूर्ण करण्यात येईल.


19) बदली वर्षात आंतर जिल्हा प्रक्रियेमध्ये भाग घेऊन बदली झालेल्या शिक्षकांना त्याच वर्षीच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत भाग घेता येणार नाही.


20) जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग भाग १ ची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी बदली पात्र शिक्षकांची यादी तसेच टप्पा क्र. ६ साठी पात्र असण्यार्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.


21) शासन निर्णय क्र. जिपब-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.4.5.4 मध्ये "या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल, ऐवजी बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्य क्रम न दिल्यास, सेवाजेष्ठता विचारात न घेता अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल." असे वाचण्यात यावे.


22) अनुसूचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्रातील) रिक्त पदे भरत असताना सदर जागांचा प्राधान्यक्रम हा स्थानिक अनुसूचित जमातीच्या शिक्षकांव्यतिरिक्त इतर शिक्षकांनी भरू नये.


23) बदली प्रक्रिया सुरु असताना निलंबित. मयत, सेवेतून कार्यमुक्त केलेले व बडतर्फ केलेले शिक्षक बदली प्रक्रियेतून त्या टप्प्यावर वगळण्यात येतील.


आंतरजिल्हा बदली प्रक्रिये बाबत


विकास विभाग, शासन निर्णय क्र. आंजिब-4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. 4/2021


1) शासन निर्णय क्र. आंजिब-4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.8.1 मध्ये "ज्या शिक्षकांना एका जिल्हा परिषदेकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे असे शिक्षक, ऐवजी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेअंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र हा संवर्ग रद्द करण्यात येत आहेत. त्यानुसार या पूर्वी ज्या शिक्षकांनी संबंधित जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असेल असे कोणतेही प्रमाणपत्र पात्रता निश्चित करण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही." असे वाचण्यात यावे.


2


) शासन निर्णय क्र. आंजिब-4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.8.3 मध्ये "सदर प्रक्रियेअंतर्गत पती-पत्नी एक युनिट म्हणून एखाद्या जिल्ह्यात दोन जागा उपलब्ध नसल्यास संबंधित शिक्षकांच्या जोडीदाराला शेजारी असलेले जिल्हे पर्याय म्हणून निवडता येतील."


3) शासन निर्णय क्र. आंजिब-4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र. 15 मध्ये "आंतर जिल्हा बदली प्रक्रियेअंतर्गत शिक्षकांची कार्यमुक्ती व बदलीच्या जिल्ह्यातील रुजू होणेबाबत कार्यवाहीसाठी कालावधी निश्चित करून त्यानुसार आवश्यक अंमलबजावणी संबंधित सर्व जिल्ह्यांनी करणे अनिवार्य आहे. सदर कालावधी हा १५ दिवसांचा निश्चित असावा."


शिक्षक बदल्या आता मोबाईल अॕपने


 शिक्षकांच्या बदल्या मोबाईल ॲपद्वारे...


राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठीचे मोबाईल ॲप पूर्णपणे विकसित झाले आहे. 



या ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या बदल्यांमध्ये काही त्रुटी राहू नयेत आणि या त्रुटीच्या आधारे बदलीनंतर उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या आव्हान याचिका टाळण्यासाठी या मसुद्याची फेरतपासणी केली जाणार आहे.कारण सन २०१८ ला पहिल्यांदा आॕनलाईन बदली प्रक्रिया राबविल्या गेली तेव्हा  कित्येक शिक्षक ? न्यायालयात गेले होते. बदल्या रद्द होईपर्यत वेळ तेव्हा आलेली  होती.

म्हणूनच राज्य सरकारने या फेरतपासणीसाठी ३४ जिल्हा परिषदांमधील मिळून १०२ जणांची तपासणी समिती स्थापन केलेली आहे. 

या समितीत प्रत्येक जिल्हा परिषदेतून सरासरी तीन सदस्यांचा समावेश केला आहे.

या फेरतपासणी समितीत प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी, संगणक प्रोग्रॅमर, वरिष्ठ लेखनिक, डाटा एंट्री आॕपरेटर, सहायक प्रशासकीय अधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी आदी विविध पदांवरील व्यक्तींचा समावेश केला आहे.


 यानुसार पुणे जिल्हा परिषदेतून कनिष्ठ सहायक जीवन गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद देंडगे आणि सहायक प्रशासकीय अधिकारी शेखर गायकवाड या तिघांना या समितीत घेण्यात आले आहे.


याआधी या मसुद्यात सरकारने तब्बल ३१ दुरुस्त्या करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार या ॲपसाठीच्या मसुद्यात (डेटा) समाविष्ट करण्यात आलेली जिल्हानिहाय शिक्षकांची संख्या, सुगम व दुर्गम शाळांची नावे, सर्व शिक्षकांची प्राथमिक माहिती, आधार आणि पॅन कार्ड क्रमांकाची पुर्नपडताळणी करण्याचे सांगण्यात आले होते. शिवाय राज्य सरकारने मोबाईल ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांसाठी एक शिक्षक, एक मोबाईल नंबर अनिवार्य केला आहे.


राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द केले आहे. नवीन बदली धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्यांसाठी हे खास ॲप विकसित केले आहे. हे ॲप मोबाईल आणि संगणक अशा दोन्ही ठिकाणी वापरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना घरबसल्या आॅनलाइन बदली आदेश मिळू शकणार आहेत. या मोबाईल ॲपच्या प्रगतीचा आढावा घेण्याची जबाबदारी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.


आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या मोबाईल अॅपद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बदल्यांसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित केले आहे. आयुष प्रसाद यांच्याच अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या पाच सीईंओंचा समावेश असलेल्या अभ्यास गटाने राज्य सरकारला ही शिफारस केली होती. सरकारने ही शिफारस सरकारने स्वीकारली आहे

शिक्षक बदलीबाबत कोर्टाचा निर्णय

 📣

  *जिल्हा परिषद शिक्षकांसाठी ब्रेकिंग न्युज* 

 

🛑 अवघड शाळेबाबतीत ॲड. सुविध कुलकर्णी* 
    *यांच्या प्रयत्नांना यश* 🛑


*ज्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रांमध्ये तीन वर्ष यशस्वी सेवा केलेली आहे अशा सर्व शिक्षकांना बदली मागण्याचा अधिकार असून दिनांक 27 फेब्रुवारी 2017 रोजी राज्य शासनाने ठरविलेल्या धोरणाप्रमाणे शिक्षकांना बदल्या मिळविण्याचा अधिकार असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज ॲड. सुविध कुलकर्णी यांच्यामार्फत दाखल केलेली रमेश बनकर व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन ही याचिका निकाली काढली आहे.*

अवघड क्षेत्रातील सुंदर अशी मुरुमखेडावाडी शाळा...

सदर याचिकेची अंतिम सुनावणी आज रोजी न्यायमूर्ती आर व्ही घुगे व  एस जी दिघे यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी अँड सुविध कुलकर्णी यांनी शिक्षकांची बाजू मांडत उत्तम युक्तिवाद केला. दोन्ही उभय पक्षांचा युक्तिवाद लक्षात घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका निकाली काढताना अवघड क्षेत्रा मध्ये तीन वर्षापेक्षा  जास्त काळ कामकाज पूर्ण केले आहे, अशा सर्व शिक्षकांना दिलासा दिला आहे. 

सविस्तर वृत्त असे की राज्य शासनाने 27 फेब्रुवारी 2017 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशी दोन क्षेत्र शिक्षकांच्या सेवांसाठी सूचित केली होती. सदरील शासन निर्णयाच्या धोरणानुसार जे शिक्षक तीन वर्ष यशस्वी रित्या  अवघड क्षेत्रांमध्ये सेवा पूर्ण करतील,  अश्या शिक्षकांनाच सर्वसाधारण क्षेत्रात बदली मागण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला होता. त्यानुसार अनेक शिक्षकांनी अवघड क्षेत्रामध्ये सेवा केली, असे असताना दिनांक 07 एप्रिल 2021 रोजी राज्य शासनाने नवीन धोरण परत बदलीच्या संदर्भात निर्माण केले. त्यानुसार अवघड क्षेत्रात सेवा करणाऱ्या शिक्षकांचा कसलाही विचारविनिमय करण्यात आलेला नव्हता. 

दरम्यान 27 फेब्रुवारी 2017 रोजी च्या शासन निर्णयानुसार नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत अवघड क्षेत्रात कामकाज व सेवा केलेल्या शिक्षकांना सेवा करून देखील बदली मागण्याचा अधिकार प्राप्त झाला नाही, म्हणून रमेश बनकर व इतर शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड. सुविध कुलकर्णी यांच्या मार्फत धाव घेतली.  न्यायालयाने जिल्हा परिषद  राज्य शासनाला नोटीस बजावली. 

त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद नांदेड यांनी दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी सदरील धोरणाच्या संदर्भाने स्पष्टीकरण प्रकाशित करून सर्व शिक्षकांना बदली चा अधिकार मिळेल असेच धोरण राबविण्यात येत असल्याचे शपथपत्र न्यायालयात दाखल केले. दरम्यान न्यायालयात जिल्हा परिषद मार्फत दाखल करण्यात आलेल्या शपथ पत्रानुसार किनवट व माहूर हे दोन तालुके अवघड क्षेत्रांमध्ये मोडत असून 59 शाळा ह्या अवघड क्षेत्र म्हणून घोषित केल्याचे न्यायालयात प्रतिपादन केले. यावेळी सुविध कुलकर्णी  यांनी शिक्षकांची बाजू योग्य रित्या न्यायालयात मांडत शिक्षकांच्या अडचणी न्यायालयासमोर मांडल्या.

दरम्यान सदर याचिकेच्या  प्रभावामुळे अतिरिक्त 15 शाळांचा समावेश अवघड क्षेत्रा मध्ये जिल्हा परिषद नांदेड यांना करावा लागला. यामुळे शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला असून या शिक्षकांनी प्रामाणिकपणे अवघड क्षेत्रामध्ये तीन वर्षापेक्षा जास्त सेवा केली आह. त्यांना आता बदली चा अधिकार प्राप्त झाला असून यामुळे त्यांना हव्या त्या ठिकाणी बदल्या मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला असून *ॲड. सुविध कुलकर्णी* यांच्या अथक प्रयत्नामुळेच हे यश मिळाले असल्या चे मत शिक्षक वर्गातून व्यक्त केले जात आहे.

शिक्षक बदली साॕफ्टवेअर संदर्भात मार्गदर्शक व्हिडीओ पहा....#teachertransfer,#online,

 शिक्षक आॕनलाईन  बदली संदर्भात साॕफ्टवेअर तयार झाले असून त्याबाबतचा मार्गदर्शक व्हिडीओ देण्यात आलेला आहे. 




बदली प्रक्रिया ही नव्या साॕफ्टवेअर द्वारे पार पडणार असून याबाबतीत शिक्षकांना व्यवस्थित माहिती व्हावी  यासंदर्भात हा व्हिडीओ सादर झालेला आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक  करा....






शिक्षक बदली 2022 विशेष बैठक #teacers transfer

 *शिक्षक बदली 2022 ठळक घडामोडी*



आज महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती आणि बदली अभ्यास गट महाराष्ट्र राज्य यांच्यात ऑनलाईन 3 तास बदली 2022 या विषयावर चर्चा झाली.

*सदर बैठकीस मा. आयुष प्रसाद साहेब मा. ओंबासे साहेब मा. कर्डीले साहेब उपस्थित होते.तसेच मा. संभाजीराव थोरात तात्या मा. मधुकर काठोळे मा.काळुजी बोरसे मा. अंबादास वाजे मा. चिंतामण वेखंडे मा. नवनाथ गेंड मा. साजिद निसार मा. संजय जाधव मा.देविदास बसवदे मा. यादव पवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.



*खालील मुद्यावर चर्चा झाली.*



1) 30 जून 3 वर्ष, अनफिट फॉर लेडीज*

2) आंतर जिल्हा बदली बाबत काही विषय*

3) प्रमोशन, संच मान्यता आदी*



*मा. काठोळे साहेब, मा. अंबादासजी वाजे साहेब मा. चिंतामण वेखंडे साहेब, देविदास बसवदे साहेब यांनी 3 वर्ष 30 जून आणि अनफिट फॉर लेडीज याबद्दल संघटनेची भूमिका मांडली.याबाबत मा. आयुष प्रसाद साहेबांनी सकारात्मक भूमिका घेत ह्यावर्षी पारदर्शक बदल्या होतील तशी कार्यवाही सुरु असून संघटनेच्या पाठपुराव्यामुळे विशेष बदली म्हणून 3 वर्षात विनंती बदली साठी शासनाकडे प्रस्ताव पाठवू असे सांगितले*.


*मा. संभाजीराव थोरात तात्या यांच्या पाठपुराव्याकडे आता अन्यायग्रस्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे. कारण मा. मुश्रीफ साहेब यांच्याकडेही पाठपुरावा करणे आवश्यक आहे.*



*परंतु आजच्या मिटिंगमुळे पोर्टल मध्ये बदलाबाबत प्रशासन सकारात्मक असून शासनाकडून येणाऱ्या सूचनेनुसार अपेक्षित बदल करू असे सांगितले आहे.*