डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षक बदलीबाबत कोर्टाचा निर्णय

 📣

  *जिल्हा परिषद शिक्षकांसाठी ब्रेकिंग न्युज* 

 

🛑 अवघड शाळेबाबतीत ॲड. सुविध कुलकर्णी* 
    *यांच्या प्रयत्नांना यश* 🛑


*ज्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रांमध्ये तीन वर्ष यशस्वी सेवा केलेली आहे अशा सर्व शिक्षकांना बदली मागण्याचा अधिकार असून दिनांक 27 फेब्रुवारी 2017 रोजी राज्य शासनाने ठरविलेल्या धोरणाप्रमाणे शिक्षकांना बदल्या मिळविण्याचा अधिकार असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज ॲड. सुविध कुलकर्णी यांच्यामार्फत दाखल केलेली रमेश बनकर व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन ही याचिका निकाली काढली आहे.*

अवघड क्षेत्रातील सुंदर अशी मुरुमखेडावाडी शाळा...

सदर याचिकेची अंतिम सुनावणी आज रोजी न्यायमूर्ती आर व्ही घुगे व  एस जी दिघे यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी अँड सुविध कुलकर्णी यांनी शिक्षकांची बाजू मांडत उत्तम युक्तिवाद केला. दोन्ही उभय पक्षांचा युक्तिवाद लक्षात घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका निकाली काढताना अवघड क्षेत्रा मध्ये तीन वर्षापेक्षा  जास्त काळ कामकाज पूर्ण केले आहे, अशा सर्व शिक्षकांना दिलासा दिला आहे. 

सविस्तर वृत्त असे की राज्य शासनाने 27 फेब्रुवारी 2017 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशी दोन क्षेत्र शिक्षकांच्या सेवांसाठी सूचित केली होती. सदरील शासन निर्णयाच्या धोरणानुसार जे शिक्षक तीन वर्ष यशस्वी रित्या  अवघड क्षेत्रांमध्ये सेवा पूर्ण करतील,  अश्या शिक्षकांनाच सर्वसाधारण क्षेत्रात बदली मागण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला होता. त्यानुसार अनेक शिक्षकांनी अवघड क्षेत्रामध्ये सेवा केली, असे असताना दिनांक 07 एप्रिल 2021 रोजी राज्य शासनाने नवीन धोरण परत बदलीच्या संदर्भात निर्माण केले. त्यानुसार अवघड क्षेत्रात सेवा करणाऱ्या शिक्षकांचा कसलाही विचारविनिमय करण्यात आलेला नव्हता. 

दरम्यान 27 फेब्रुवारी 2017 रोजी च्या शासन निर्णयानुसार नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत अवघड क्षेत्रात कामकाज व सेवा केलेल्या शिक्षकांना सेवा करून देखील बदली मागण्याचा अधिकार प्राप्त झाला नाही, म्हणून रमेश बनकर व इतर शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड. सुविध कुलकर्णी यांच्या मार्फत धाव घेतली.  न्यायालयाने जिल्हा परिषद  राज्य शासनाला नोटीस बजावली. 

त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद नांदेड यांनी दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी सदरील धोरणाच्या संदर्भाने स्पष्टीकरण प्रकाशित करून सर्व शिक्षकांना बदली चा अधिकार मिळेल असेच धोरण राबविण्यात येत असल्याचे शपथपत्र न्यायालयात दाखल केले. दरम्यान न्यायालयात जिल्हा परिषद मार्फत दाखल करण्यात आलेल्या शपथ पत्रानुसार किनवट व माहूर हे दोन तालुके अवघड क्षेत्रांमध्ये मोडत असून 59 शाळा ह्या अवघड क्षेत्र म्हणून घोषित केल्याचे न्यायालयात प्रतिपादन केले. यावेळी सुविध कुलकर्णी  यांनी शिक्षकांची बाजू योग्य रित्या न्यायालयात मांडत शिक्षकांच्या अडचणी न्यायालयासमोर मांडल्या.

दरम्यान सदर याचिकेच्या  प्रभावामुळे अतिरिक्त 15 शाळांचा समावेश अवघड क्षेत्रा मध्ये जिल्हा परिषद नांदेड यांना करावा लागला. यामुळे शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला असून या शिक्षकांनी प्रामाणिकपणे अवघड क्षेत्रामध्ये तीन वर्षापेक्षा जास्त सेवा केली आह. त्यांना आता बदली चा अधिकार प्राप्त झाला असून यामुळे त्यांना हव्या त्या ठिकाणी बदल्या मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला असून *ॲड. सुविध कुलकर्णी* यांच्या अथक प्रयत्नामुळेच हे यश मिळाले असल्या चे मत शिक्षक वर्गातून व्यक्त केले जात आहे.

2 Comments:

sr म्हणाले...

शिर्षक भडक आणि बातमी मिळमिळीत नको

लता राधाकिसन पाथ्रीकर म्हणाले...

तीन जिल्हा बॉण्ड्री वर शाळेत अवघड क्षेत्रातला एकेक दिवस मोजून काढलेले अपंग बेरोजगार जोडीदार असलेले एकल आमच्या सारखे शिक्षक यांची ते कितीही दिवस असो,ती सेवा सलग सेवेत मोजतात,तिथे तीन वर्षे आग्रह नको,आधीच ए ग्रेड शासकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून वर शिक्षणसेवक काळापासून सोसत आलो आहोत.बदलीत काहींची नोकरी आरंभ दिनांक व काहींची शिक्षक पदावरील दिनांक असे शेवटच्या प्रपत्रात बदलीवेळी आहे.अडीच हजार पगार जरी मिळाला होता,पण तो कालावधी स्थायी दिनांक म्हणून तीच वर्षांत एकदाही खंड नाही म्हणून नोकरी आरंभ दिनांक पासून सलग सेवा असल्याने सर्व शिक्षकांची तीच दिनांक मोजावी.शिक्षक पदावरील नको.वस्तीशाळाबांधवांसाठी आरंभापासून सेवा मागणी बातम्या आहेत,आम्हीतर मराठी हिंदी इंग्रजी तीन भाषा सह डीएड वर नोकरी त लागलो, ऐच्छिकभाषांची सक्तीची सूट, हिंदी भाषा सूट ही निकाली काढावे.जिल्हा बदली व खाजगी संस्थेतून जिपत आलेले एकल बांधव टोकाला कार्यरत आहेत तेही कुटुंब जगावे,हा ही तीन वर्षेच कालावधी हवा.विस्थापित व रॅंडम राउंडमध्ये आलेले तीन वर्षे काहींना जून मध्ये पूर्ण होतील.विनंतीही जोडीदार नोकरीत ते करतील,एकल पुन्हा जैसे थे.सोयीची शाळा ते शांत व गैरसोय ते एकतीस मे ऐवजी तीस जूनपर्यंत मोजावे असे म्हणत आहेत.शाळा पूर्व तयारी पासून मातेवर शिक्षण जबाबदारी आहे पण एम एचठीसीईटी इ. फॉर्म मध्ये अपंग बेरोजगार वडील मरण फक्त कोरोनाने नाही मयत सगळे पुरुष कमवते नाही,कोरोनात बरेच पालक अनेक कारणांनी देवाघरी गेले.आईवडील जिवंत आहेत का व आई कमवती आहे काआईचे उत्पन्न किती हे कॉलमच नसल्याने लाखों कमवते जिवंत दोघे पालक पुन्हा इबीसी मिळवतात व विधवा आयकर मालमत्ता कर भरत लेकरांच्या दहावी बारावी परीक्षा पुरत्या ही रजा नसल्याने अवघड क्षेत्रातून येऊन असे अवघड प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात.अपंगपतीची टुइन वन वाहने सेटिंग बदल आवश्यक नसल्याने रोड टॅक्स सवलत सह विधवा पत्नींच्या नावे व्हावी.दोघे कमवते विशेष मुलांचे पालक सव्वा लाख रुपये आयकर सूट बालसंगोपन रजा विशेष क्रीडा रजा घेतात तसे विधवा विधुर दोघांनाही पदोन्नती स्वतंत्र यादी ने लाभ मिळावेत.जोडीदार मयत त्या विधवा विधुर ही अचानक गेले तर तीच पेन्शन आयुष्यभर विभागून दोन अपत्य यांना असावी ते कर्मचारी पेन्शन योजना लागू करण्यात आली तेव्हा नोकरी त लागलेहोते म्हणून आयुष्यभर शाळांचे लेकरं गुणवंत केले म्हणून.विधवांना मुख्यालय राहणे, मतदान जनगणना ड्युटीत सूट असावी.प्रभार सेवाज्येष्ठता ,एम ए संस्कृत पर्यंत सगळे ए ग्रेड ,शासकीय महाविद्यालय चेच डीएड नियमित पूर्णवेळ तेथे हजर म्हणून दुसर्या तालुक्यातील शाळेत रजा म्हणून एक वेतनवाढ बंद व 285दिवस बिनपगारी रजा सह बीएड असल्याने देता तसे पदोन्नती ही द्यावी.बदली पदोन्नती इ.आधी पगार कपात नुसारच त्या त्या तालुक्यातून जीपीएफ स्लीप मिळावी व सर्विस बुक नोंद अर्जित रजा कमी ते जास्त विशेष क्रीडा रजा ,बालसंगोपन रजा इ.नोंद, नॉमिनेशन बदल नोंद कॅंपने करवून घ्याव्यात.सरकारी दवाखान्यात दोन अपत्य जन्म व तेथेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारे कर्मचारी किंवा जोडीदार पैकी एकास व प्रभारी मुख्याध्यापक केंद्रप्रमुख इ.स आयुष्यात एक जादा वेतनवाढ असावी.झेंडा बांधण्यापासून वेतनबिल,आयकर इ.चेही प्रशिक्षण प्रभारीस देण्यात यावे.