डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
School लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
School लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Jumping In shapes

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी सदैव नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे.

 या शाळेचा परिसर अगदी हिरव्यागार झाडांनी(मियावाॕकी घनवनाने) व्यापलेला आहे .शाळा अत्यंत दुर्गम डोंगर भागात असून शाळेचा परिसर फारच सुंदर आहे.

आंनददायी शिक्षणाचा सदैव वापर येथे होत आहे. शाळेतील दोन्हीही शिक्षकांच्या प्रयत्नाने विद्यार्थी दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण घेत आहे.

शाळेतील नाविण्यपुर्ण उपक्रम हे शाळेच्या एकूणच प्रगतीची उंची वाढवितात. 

आज विद्यार्थ्यांना learning shapes ही activity ही jumping in shapes या आनंददायी कृतीतून घेण्यात आली. प्रकाशसिंग राजपूत यांनी मैदानावर विद्यार्थ्यांना त्यांच्या चप्पलचा वापर करून आखलेल्या भौमितिक  आकारात लावण्यात सांगितले तेव्हा आकाराची प्रत्यक्ष निर्मिती ते करु शकले व आनंद घेत खेळाच्या माध्यमातून शिक्षकांनी सांगितलेल्या  आकारात उडी घेण्याचे एकूणच कसब ते शिकले.

सूचना ऐकून ठराविक आकार ओळखून उडी घेणे बौद्धिक व शारीरिक कसब वाढविणारे ठरले.

   प्रकाशसिंग राजपूत व  दिलीप आढे 

सहशिक्षक 

जि.प.प्रा.शा.मुरूमखेडावाडी ,

कें करमाड , ता/जि. छ. संभाजीनगर 






 https://youtu.be/qRDGiAa3DL4

शाळा सुरु होण्या पुर्वीच पुस्तके वाटपास उपलब्ध होणार

 शाळा सुरु होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहो‍चविण्याचे नियोजन केले असून यावर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे .



समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते बालभारतीच्या गोरेगाव भांडारात करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण विभागातील संचालक कैलास पगारे, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी, मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी इंदरसिंग गडाकोटी, शिक्षण निरीक्षक देविदास महाजन, आदि उपस्थित होते.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे तसेच अनुदानित शाळांना राज्य शासनातर्फे इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून २०२२ पासून राज्यातील शाळा नियमितपणे सुरु होत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आले असून ही पाठ्यपुस्तके शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी आजपासून मोफत पाठ्यपुस्तक वितरणाला सुरुवात करण्यात आली. पाठ्यपुस्तक मंडळाच्या अन्य विभागीय भांडारातूनही या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरु करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ करिता एकूण ५ कोटी ४० लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी ही सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे निर्देश मंत्री श्रीमती गायकवाड यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. समग्र शिक्षा अभियानाव्यतिरिक्त इयत्ता १ ली ते १२ वीची सर्व पाठ्यपुस्तके खुल्या बाजारात विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये किमान 5 टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय

 मुंबई - शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये किमान 5 टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शैक्षणिक कामासाठी या निधीचा विनियोग करता येणार आहे.



या बैठकीत शालेय शिक्षण व क्रीडा उपविभाग वगळून विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनामधील सध्या अस्तित्वात असलेल्या शालेय शिक्षणाशी संबंधित चार योजनांची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्यात आली. यात जिल्हा परिषदांच्या क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांची इमारत व वर्ग खोल्यांची विशेष दुरुस्ती, स्वच्छतागृह दुरुस्ती, जिल्हा परिषदांच्या क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांची इमारत व वर्गखोली बांधकाम, स्वच्छतागृह बांधकाम, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प व स्वच्छतागृह बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शालेय स्वच्छता, वाचनालय, शैक्षणिक बोलक्या भिंती निर्माण करणे, जिल्हा परिषदच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र कक्षाचे बांधकाम, शाळेतील क्रीडांगण-पटांगण सुविधा निर्माण करणे, जिल्हा परिषदांच्या क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना संरक्षक भिंत उभारणे, आदर्श शाळामध्ये विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, इंटरनेट किंवा वाय-फाय सुविधा निर्माण करता येणार आहेत.

दरम्यान, किमान 5 टक्के इतका निधी शालेय शिक्षणाशी संबंधित क्रीडा योजना वगळून कायमस्वरुपी राखून ठेवण्यास मान्यता दिली. किमान 5 टक्के इतका निधी राखून ठेवण्याची मर्यादा ही मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी लागू राहणार नाही. भविष्यात राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अतिरिक्त निधी जिल्हा वार्षिक योजने सर्वसाधारण अंतर्गत उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. ही सुधारित योजना 2022-23 या आर्थिक वर्षापासून लागू होईल, असे राज्य शासनाने म्हटले आहे.

शाळापूर्व तयारी अभियान.....अशी तयारी करा...

 शाळापूर्व तयारी अभियान.....

           शाळापूर्व तयारी मेळावा घ्यायच्या दिवशी सर्व प्रथम प्रभातफेरी काढायची आहे. 

आपल्याला शाळेत ७ प्रकारचे स्टॉल लावायचे आहेत. सर्व स्टॉल हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित आहेत.



 स्टॉल क्र-१ नाव नोंदणी आणि रिपोर्ट कार्ड देणे.


             पहिलीत येणाऱ्या मुलांचे स्वागत करायचे आहे.त्यांचे वजन,उंची याची नोंद करायची आहे.

स्टॉल क्र-२ शारीरिक विकास...


             यामध्ये दोरीच्या उड्या, दोन्ही हाताच्या साहाय्याने चेंडू किंवा रिंग फेकणे,कागदाच्या साहाय्याने होडी तयार करणे,रंग भरणे,चेंडू बादलीत टाकणे अशा वेगवेगळ्या कृतींचे आयोजन करून मुलांचा शारीरिक विकास कितपत झालेला आहे हे तपासायचे आहे.यात मुलांना मदतीची गरज आहे का किंवा तो चांगले करतो/करते याप्रमाणे नोंद करायची आहे.


स्टॉल क्र-३ बौद्धिक विकास


     यामध्ये लहान-मोठा फरक ओळखणे,२ प्रकारांमध्ये वर्गीकरण(जसे-फळे व पक्षी),दिलेल्या वस्तू-चित्रे क्रमाने लावणे,जोडी लावणे या क्षमतांचा समावेश होतो.


स्टॉल क्र-४ सामाजिक आणि भावनात्मक विकास-


        यामध्ये घरी राहिल्याने मुलांमध्ये सामाजिक आणि भावनात्मक विकास कशा पद्धतीने झाला हे आपल्याला तपासायचे आहे.यात आपण त्यांना आपल्या परिवारातील सदस्यांची नावे सांगणे,खेळ/क्रियांमध्ये आनंदाने सहभागी होणे,स्वच्छ आणि नीटनेटके राहणे,धीटपणे बोलणे या क्षमतांची आपण नोंद घेणार आहोत.


स्टॉल क्र-५ भाषा विकास -


       यात चित्र पाहून वर्णन करणे, गोष्ट सांगणे,अक्षरे ओळखणे,अक्षरे पाहून ओळखणे या क्षमतांची नोंद आपल्याला घ्यायची आहे.


स्टॉल क्र-६ गणनपूर्व तयारी -



    यात कमी-जास्त ओळखणे,आकार ओळखणे,अंक ओळखणे,वस्तू मोजणे या क्षमतांची  नोंद आपल्याला  घ्यायची आहे.


स्टॉल क्र-७ मातांना साहित्य देणे व मार्गदर्शन. -

    यामध्ये सर्व नोंदी तपासून त्यानंतर सर्व मुलांना व पालकांना मार्गदर्शन करायचे आहे.


                अशा पद्धतीने आपल्याला स्टॉल उभारायचे आहेत.


महावितरणने सर्व वीज जोडण्या सुरू कराव्यात....

 राज्यातील सर्व शाळांमध्ये सध्या परीक्षा चालू आहेत. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळांमध्ये वीज असणे आवश्यक आहे.


 वीज जोडणी तोडलेल्या शाळांच्या बिलापोटी 14 कोटी 18 लाख रुपये महावितरणकडे शालेय शिक्षण विभागाकडून जमा करण्यात आले आहेत. 

त्यामुळे महावितरणने सर्व वीज जोडण्या सुरू कराव्यात असे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.


काय म्हणाल्या शालेय शिक्षण मंत्री- 

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, सध्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्याचप्रमाणे उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळांमध्ये वीज असणे अत्यंत गरजेचे आहे. शालेय शिक्षण विभागाने वीजजोडणी तोडलेल्या शाळांच्या बिलापोटी 13 कोटी 18 लाख रुपये महावितरणकडे आज भरण्यात येत आहेत. त्यामुळे महावितरणने आज सर्व वीज जोडण्या सुरू करण्यात. वीज दराबाबत वीज नियामक आयोगाने शाळांसाठी जी वर्गवारी केली आहे. त्याच वर्गवारी मधील वीज जोडण्या आहे किंवा नाही याची तपासणी करून घेण्याबाबत महावितरणच्या क्षेत्रीय अधिकारी यांनी खात्री करून घ्यावी. अन्यथा तसा बदल करून शाळांना वीज देयक द्यावेत.

6682 शाळांची वीज जोडणी तोडली- राज्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 60 हजार 801 शाळा असून, 56 हजार 235 शाळांमध्ये वीज जोडणी आहे. तर वीज जोडणी नसलेल्या शाळांची संख्या 4 हजार 566 आहे. 6 हजार 682 शाळांची वीज जोडणी तात्पुरती तोडण्यात आली असून, 14 हजार 148 शाळांची जोडणी कायमस्वरूपी तोडण्यात आली असल्याची माहिती यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यातील २५ हजार शाळेंची मान्यता अडचणीत...

 शिक्षण हक्क कायद्यानुसार विनाअनुदानित शाळांना देण्यात येणारी तब्बल 25 हजार शाळांची मान्यता मार्च 2022 मध्ये संपली आहे. मात्र पुढील प्रक्रियेबाबत संचालक कार्यालय अथवा स्थानिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून कोणत्याही सूचना प्राप्त न झाल्याने मुख्याध्यापकांचा गोंधळ उडालेला आहे.

या शाळांची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही तर वेतनेत्तर अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण होतीलच शिवाय, या शाळा अनधिकृत ठरतील.



शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील शाळांना दर तीन वर्षांनी स्वमान्यता घ्यावी लागते. राज्यात या मान्यतेचा पहिला टप्पा 2013 मध्ये पार पडला होता. यानंतर 2016 आणि 2019 मध्ये ही प्रक्रिया पार पडली. आता या प्रक्रियेला तीन वर्षे पूर्ण होणार असून 2022 च्या मान्यता प्रक्रियेबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.


 यामुळे या शाळांची मान्यता धोक्यात आली आहे. यामुळे संचालक कार्यालयाने याबाबत तातडीने पत्रक जारी करून स्थानिक पातळीवर निर्देश द्यावेत, आणि अशा शाळांचे प्रस्ताव मार्गी लावून यावर्षी मान्यता कायम कराव्यात, अशी मागणी होत आहे.

2019 मध्ये ज्या शाळांनी मान्यतेसाठी अर्ज केले होते, त्यापैकी बहुतांश शाळांच्या अर्जावर पुढील कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत शाळांनी वारंवार पाठपुरावा करूनही काही शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून शाळांना प्रतिसाद प्राप्त होत नसल्याची तक्रार मुख्याध्यापक करत आहेत. यामुळे आता या दोन्ही प्रक्रिया एकाचवेळी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी होत आहे.

आर टी ई कायद्यानुसार शाळांनी स्वमान्यता घेणे बंधनकारक आहे, आणि त्याशिवाय अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान दिले जात नाही. परंतु पहिल्यांदा स्व मान्यता देताना आवश्यक कागदपत्रे तपासून घेतली जातात. त्याला तीन वर्षांची मुदत आहे. त्याचे नूतनीकरण करताना पुन्हा 10 मानके पूर्तता व्यतिरिक्त असंख्य कागदपत्रे मागितली जातात.

प्रस्ताव वेळेवर मंजूर होत नाहीत. अडवणूक केली जाते. त्यामुळे मुख्याध्यापकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. आत्ताच्या स्वमान्यतेची मुदत मार्च 22 अखेर संपली. पुढील स्वमान्यता प्रस्ताव सादर करणेबाबत अद्याप कोणताही आदेश नाही अशी माहिती मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी दिली.

दर तीन वर्षांनी काय पाहिले जाते

शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये कोणत्या भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे याचबरोबर कोणत्या शैक्षणिक सुविधा असणे आवश्यक आहे याबाबतचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. यानुसार दहा मानांकने निश्चित करण्यात आली आहेत. यानुसार इमारत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मैदाने, स्वच्छतागृहे, विद्युत पुरवठा, संरक्षक भिंत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प, किचन शेड, वर्गखोल्या, मुख्याध्यापक कक्ष याची पूर्तता शाळांमध्ये असणे आवश्यक आहे. शाळेला मान्यता देताना या सर्व सुविधा पाहिल्या जातात, मात्र त्या सुविधा कायम आहेत का, याची तपासणी करून ही मान्यता दिली जाते.



शिक्षकाने मुलीला शिक्षा दिल्याचा पालकाचा रागअनावर शाळेत केला गोळीबार #firing,

 राजस्थान मधील भरतपूर जिल्ह्यातील कामन पोलीस स्टेशन परिसरात एका शिक्षकाने एका मुलीला चापट मारल्याने संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी शाळेत घुसून गोळीबार केला.


   शाळा चालकाच्या जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

   तिने मध्यस्थी केल्यावरच शिक्षकाच्या पत्नीला मार लागला आणि त्यामुळे तिला जबर दुखापत झाली.  घटनेनंतर, शिपाई परिसरातून बाहेर पडला.  पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून माहितीच्या आधारे तपास सुरू केला.     



 शाळा चालकाच्या जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  पोलीस संशयित शिपायाचा शोध घेत आहेत, मात्र अद्याप त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही.  कमानचे पोलीस अधिकारी दौलत साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंवारा गावात सोमवारी ही घटना घडली.  कंवारा येथील रहिवासी रामनिवास गुर्जर यांची मुलगी गंगा गुर्जर याच गावातील बजरंग सार्वजनिक वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात शिकते.  सुरेंद्र सिंग या शाळेत प्रशासन आणि शिकवतात.  10-11 दिवसांपूर्वी सुरेंद्र सिंहने गंगा गुर्जरला तिचं गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे चापट मारली.  याबाबत गंगा यांनी तिचे वडील रामनिवास गुर्जर यांच्याकडे तक्रार केली. 


 आर्मी सेंटरमधून रजा मिळाल्यानंतर तो रविवारी घरी परतला.  मुलीच्या तक्रारीवरून तो सोमवारी बंदुक घेऊन शाळेत आला. त्याने शाळेचे संचालक सुरेंद्र सिंग यांना रिव्हॉल्वर दाखवून धमक्या देण्यास सुरुवात केली. 

      त्यावेळी शाळेच्या संचालकाची पत्नी राजबालाही तिथे होती.  रामनिवास आणि सुरेंद्र सिंग यांच्यातील वादात ती स्वत:ला झोकून देऊ लागली.  यादरम्यान, राम रहिवासी असलेल्या गुर्जरने बंदुकीतून गोळीबार केला.  रायफलमधून गोळी लागल्याने राजबाला यांच्या हाताला दुखापत झाली.  

 

गोळीबार होताच एकच गोंधळ उडाला.  राजबाला यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले.  दरम्यान, वडिलांनी क्षणाचा फायदा घेत तेथून निघून गेले.  घटनेची माहिती मिळताच कमान पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  पोलिसांनी तेथील फौजी राम निवासचा बराच शोध घेतला, परंतु त्याचा कोणताही पत्ता लागला नाही.  अधिकारी सध्या आरोपी शिपायाचा शोध घेत आहेत.  शाळेत झालेल्या गोळीबारामुळे रहिवासी हैराण झाले होते.