जि.प. सेवानिवृत्त शिक्षक थेट धडकले मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प.अमरावती यांच्या दालनात....
जि.प. अमरावती मधील सेवानिवृत्त शिक्षक आपल्या प्रलंबित मागणी साठी दिनांक 6 मे 2024 वार सोमवारला आपल्या सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्ते रक्कम सह इतर मागणी साठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती यांची भेट घेतली असता. मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासना कडून मिळाल्यावरही प्रशासनाकडून सातव्या वेतन आयोगाच्या हप्ते रक्कम न मिळाल्यामुळे इतर मागणी सह आज दिनांक 20 मे 2024 वार सोमवारला सेवानिवृत्त शिक्षक मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. अमरावती यांच्या दालनात मोठ्या प्रमाणात धडकले होते.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी मा. शिक्षणाधिकारी साहेब , जि.प. अमरावती यांना त्वरित सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रलंबित मागण्या सोडविण्याचे आदेश दिले असून 24 मे 2024 वार गुरुवारला सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या मागण्या खालील प्रमाणे होत्या.
प्रमुख मागण्या या होत्या....
1) सेवा निवृत्त शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते रक्कम त्वरीत वितरीत करण्यात यावी.
2) सेवानिवृत्त शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच प्रलंबित हप्ते रक्कम परत गेल्याने काही सेवानिवृत्त शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते रक्कम मिळणार नाही . अशा सेवानिवृत्त शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या हप्ते रक्कम मागणी त्वरीत करून लवकरात लवकर वंचित राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना लवकरच सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रक्कम मिळण्यात यावे .
3) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना गटविमा योजना रक्कमेच्या लाभापासून वंचित आहेत . त्यांना त्वरीत गटविमा योजनेचा लाभ त्वरीत मिळण्यात यावा.
4) सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्यात एक तारखेस मिळण्यात यावे.
5) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांची उपदान रक्कम मिळाली नाही. करीता उपदान रक्कम त्वरीत उपलब्ध करून द्यावी.
6)अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी मिळाली नाही.त्यांना सेवानिवृत्ती सेवानिवृत्ती नंतरची भविष्य निर्वाह निधी रक्कम त्वरीत उपलब्ध करून द्यावी.
7) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना 1 जुलै ची काल्पनिक वेतन न लागून त्यांना वेतन वाढ फरकाची रक्कम मिळाली नाही. त्यांना त्वरीत वेतनवाढ फरकाची थकबाकी रक्कम मिळण्यात यावी.
8) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना महागाई भत्याची एरीअर्स रक्कम मिळाला नाही. त्यांना महागाई भत्याची एरीअर्स त्वरीत मिळण्यात यावा.
9) प्रत्येक पंचायत समिती स्तरावर प्रत्येक महिन्यात निश्चित कोणत्याही एक तारखेस सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी पेन्शन अदालत चे आयोजन करण्यात याव. याबाबत लेखी पत्र काढण्यात यावे.
10) प्रत्येक महिन्यात जिल्हा स्तरावर निश्चित कोणत्याही एक तारखेस सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात यावे. त्याबाबत लेखी पत्र काढण्यात यावे.
11) मा . शिक्षपाधिकारी (प्राथमिक विभाग ) जि .प . अमरावती यांच्या कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचे काम हे एकाच टेबलावर आहे. पण जिल्हातील प्रत्येक पंचायत समिती स्तरावर कार्यरत शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक या दोघांचे काम सांभाळण्यासाठी वेगवेगळे क्लार्क आहेत . त्याच प्रमाणे मा.शिक्षणाधिकारी कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचे काम सांभाळण्यासाठी एक वेगळ्या क्लार्क ची व्यवस्था करावी . कार्यरत शिक्षकांचे काम सांभाळण्यासाठी दुसऱ्या क्लार्क ची व्यवस्था करावी सेवानिवृत्त शिक्षक व कार्यरत शिक्षकांचे काम एकाच क्लार्क कडे देण्यात येवू नये . त्यामुळे कामाचा गोंधळ निर्माण होत आहे .
12) जि . प . शिक्षक यांना सेवानिवृत्ती च्या दिनांकास सेवानिवृत्ती चे सर्व लाभ मिळणे बाबत .
जिल्हा प्रशासनाने सेवा निवृत्त शिक्षकांच्या वरील समस्या न सोडविल्यास जिल्हातील जि .प . सेवानिवृत्त शिक्षक दि 30 मे 2024 वार गुरुवारला जिल्हा परिषद अमरावती समोर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन सत्याग्रह करतील . मा . मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब , जिल्हा परिषद , अमरावती यांनी दि 24 मे 2024 ला सभेचे आयोजन करून सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे . आजच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर समश्या मांडण्या करीता सत्येंदु अभ्यंकर सर, प्रभाकर देशमुख सर, विनोद कुऱ्हेकर सर, श्याम पाटील सर, ॲड .सौ .निता प्रफुल्ल कचवे मॅडम , सौ अश्विनी देशमुख मॅडम, श्रीमती शोभा मेहरे मॅडम ,अजमत उल्ला खान सर, मिलींद लबडे सर, अरविंद महल्ले सर, वासुदेव रेचे सर ,प्रकाश डोंगरे सर, मुनेश्वर उमप सर, कु सुनंदा चांगोले मॅडम , मनोहर चर्जन सर, जावेद अहमद खान सर, प्रशांत गुल्हाणे सर, हरी कपले सर, अरुण धांडगे सर, साहेबराव काळेमघ सर, प्रमोद डहाणे सर, चंद्रकांत शंके सर , राजेंद्र खरकाळे सर, सौ अनिता कापडे मॅडम , सुरेश रायपुरे सर, दिनेश कनेटकर , भास्कर गजभिये सर, संदीप मेहरे सर , राहुल शेंडे सर, उद्धव दहाट सर , . डि. व्ही. राऊत सर , रणजीत नितनवरे सर , रामचंद्र गजभीये सर, सौ कुल्हे मॅडम , सौ . नलिनी लंगटे मॅडम , सुनंदा गोहत्रे मॅडम, शालीनी नागपुरे मॅडम , दिपक मुळे सर , राजु खरकर सर , पुंडलीक वितोंडे सर, देविदास उमप सर, मो . शकील मो रहेमान सर, आर . बी . नितनवरे सर, सौ . इंद्रकला गजभीये मॅडम , मसुद अहमद सर , आर एन . पापळीकर सर , सुरेंद्रनाथ वाडेकर सर , धनराज साखरे सर, विलास गावनेर सर, निरंजन राऊत सर, संजय कुकटकर सर , सुरेंद्रनाथ वाडेकर सर , अनिल ढोके सर , दिलीप चौधरी सर , सुरेश राहाटे सर , राजु भाकरे सर व शेकडो सेवानिवृत्त शिक्षक हजर उपस्थित होते .