डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

राज्यातील अप्रशिक्षीत शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून सेवेचे लाभ मिळणेबाबत.

 राज्यातील अप्रशिक्षीत शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून सेवेचे लाभ मिळणेबाबत.

मा.श्रीकांत गोविंदराव देशपांडे, माजी वि.प.स. यांनी संदर्भाकित पत्रात खालीलप्रमाणे नमूद केले

राज्यात पूर्वी मागास प्रवर्गाचे प्रशिक्षीत उमेदवार मिळत नसल्यामुळे अप्रशिक्षीत शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सेवेत असतांना ते प्रशिक्षीत झालेत. त्यांना त्यावेळी अप्रशिक्षीत वेतन श्रेणी होती. त्यांना नियुक्ती दिनांकापासुन खालील लाभ मिळावेत.

१) निवड व वरीष्ठ श्रेणीसाठी नियुक्ती दिनांक ग्राह्य धरणे

२) दि.०१.११.२००५ पुर्वी नियुक्ती असल्यामुळे जुनी पेंशन योजना लागू करणे

३) इतर सेवा विषयक लाभ

उपरोक्त विनंतीच्या अनुषंगाने आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास सादर करावेत, ही विनंती.

आदेश पहा...