कमी पटसंख्येच्या शाळेवर निवृत्त शिक्षक
शापोआ मानधनात वाढ
राज्य शासनाने स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात भरघोस वाढ केली असून यापुढे एप्रिल पासून त्यांना माहे अडीच हजार रुपयांचे मानधन प्राप्त होणार आहे.
यापूर्वीचे मानधन पंधराशे रुपये इतके होते यामध्ये नऊशे रुपये केंद्र शासन तर सहाशे रुपये राज्य शासन वाटा उचलत होते.
यानंतर आता एप्रिल 2023 पासूनचे पंचवीसशे रुपये मानधन प्रत्येकी स्वयंपाकी तथा मदतनीस यांना प्राप्त होणार आहे एक आनंदाची बातमी शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणता येणार आहे.
बदली प्रक्रियेत पतीपत्नीबाबत महत्त्वाचे
पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा ३० कि.मी. परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल.
जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रिकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे.
यापैकी एकाची पण दहा वर्षे सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल" असे नमूद आहे. तथापि, म.ना.से (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१, नियम ९(५६) मधील विहीत "बदली व्याख्येस अनुसरुन ज्या पती पत्नींची टप्पा क्र.५ मध्ये One Unit मधून बदली झालेली आहे, तथापि, त्यापैकी एकाच्या शाळेमध्ये बदल झालेला नाही (त्याच शाळेतील अन्य रिक्त / बदलीपात्र पदावर बदली झालेली आहे) अशा शिक्षकांचा त्या शाळेवरील वास्तव सेवा ज्येष्ठतेचा दिनांक हा त्या शाळेवरील प्रथमतः रुजू झाल्याचा
दिनांकच ग्राह्य धरण्यात यावा. तथापि, अशा शिक्षकांना सन २०२२-२३ च्या बदली प्रक्रियेमधील टप्पा क्र.५ च्या पुढील बदली प्रक्रियेमधून वगळण्यात यावे.
संपूर्ण आदेश पहा....
नवोदय फाॕर्म मुदतवाढ
मित्रांनो नवोदय परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी तारीख आता पुन्हा आठ दिवसांनी वाढवून देण्यात आलेली आहे.
पूर्वीच ८ फेब्रुवारी ही तारीख देण्यात आलेली होती. ती आता परत नव्याने वाढवून 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे .
साइटवर येणाऱ्या अनेक अडचणी पाहता शिक्षकांना किंवा पालकांना फॉर्म भरताना अनेक अडचणी येत होत्या. फॉर्म रिफ्रेश होऊन जायचा पूर्ण माहिती भरल्यानंतर भरलेली माहिती ही रिफ्रेश होऊन जायची आणि पुन्हा नव्याने ती माहिती भरून दोन-तीन वेळेस प्रयत्न केल्यानंतरच फॉर्म सबमिट होत होता.
तर ही अडचण पाहता नव्याने शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी वेळ वाढवून देण्यात आलेली आहे. ज्यामुळे ज्या मुलांचे फॉर्म भरायचे बाकी होते त्या मुलांचे फॉर्म भरण्याची काम आता लवकरच लवकर पूर्ण करता येणार आहे. फक्त यामध्ये आता वर सर्टिफिकेट चा पुरावा हा आधार नसेल तर पालकांनी आता मुलांचा बर्थ सर्टिफिकेट चा पुरावा सुद्धा पहिल्यांदा लॉगिन पेजवर भरावा लागणार आहे.
Vinsys तर्फे महत्त्वाचा संदेश
*बदली अंतिम यादी संवर्ग 4*
*बदली पोर्टल 2022*
दि.07/02/2023
*वेळ 3.28 AM*
*विन्सिस सॉफ्टवेअर कंपनी कडून प्राप्त मेसेज*
👇👇👇👇
*NOTE*
We have completed all the list generation of PDF and Alignment and Corrections with Right Labels
Logins have been Enabled for all EO and CEO Once you download confirm we will open teacher logins
आम्ही पीडीएफची सर्व सूची निर्मिती पूर्ण केली आहे आणि उजव्या लेबलसह संरेखन आणि सुधारणा पूर्ण केल्या आहेत
सर्व EO आणि CEO साठी लॉगिन सक्षम केले गेले आहेत एकदा तुम्ही पुष्टी डाउनलोड केल्यानंतर आम्ही शिक्षक लॉगिन उघडू
आता महिला सुरक्षा बाबत महत्त्वाचा निर्णय
*महाराष्ट्र शासनाचा नवा निर्णय*
आता महिला सुरक्षा बाबत महत्त्वाचा निर्णय पोलीस आदेश महाराष्ट्र पोलिसांनी मोफत राइड योजना सुरू केली आहे.
नेमकी योजना काय ?
जेथे रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत महिलांना एकट्याने घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसेल, तेथे महिला पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर (1091 किंवा 7837018555) कॉल करून वाहन मागू शकतात.*
*हा क्रमांक २४x७ कार्यरत असेल.*
*नियंत्रण कक्ष वाहन किंवा जवळपासचे PCR वाहन/SHO वाहन येईल आणि तिला सुरक्षितपणे तिच्या घरी सोडेल. हे विनामूल्य केले जाईल.*
*तुमच्या ओळखीच्या प्रत्येकीला हा संदेश पाठवा.*
*चला सोपा करूया परिपाठ*
*संकल्पना व लेखक*
*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*
मोबाईल नंबर 9130958046
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख - ७ फेब्रुवारी २०२३
वार- मंगळवार
तिथी-माघ कृष्ण २ शके १९४४
अयन-उत्तरायण
ऋतू - शिशिर ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना " रज्जब"
पारशी महिना शेहरेवार
Today's almanac
Date - 7 February 2023
Tuesday
Tithi-Magh krushna 2
Shaka 1944
Ayana-Uttarayana
Ritu - Shishir Ritu(Autumn season)
"Rajjab" month of Muslims
Parsi month Shehrewar
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सूर्योदय 7.01
सूर्यास्त 6.24
दिवस कालावधी 11 तास 22 मि.38 से.
चंद्र अस्त:-8.07
चंद्र उदय:-19.49
प्रदीपन. 98.8%
चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 404518 km
Sunrise 7.01 Am
Sunset 6.24Pm
Day duration 11 hrs 22 min 38 sec.
Moonset:-8.07
Moon rise:-19.49
Illumination 98.8%
Distance between moon and earth 404518 km.
🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙
सुविचार
*यशाला चकाकी तेव्हाच मिळते, जेव्हा प्रयत्नांचा पाया मजबूत असतो.*
Good thought
*Success shines only when the foundation of effort is strong.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दिनविशेष
जागतिक दिवस:
वन अग्नि सुरक्षा दिवस.
१९७४ ’ग्रेनाडा’चा स्वातंत्र्यदिन
१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१८९८: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा जन्म.
special day
World Day:
Forest Fire Safety Day.
1974 Independence Day of Grenada
1971: Women get the right to vote in Switzerland.
1898: Birth of Ramabai Ambedkar, wife of Dr. Babasaheb Ambedkar.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजची म्हण व अर्थ
खोट्याच्या कपाळी गोटा - वाईट काम करणाऱ्याचेच नुकसान होते.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कोडे
पानाचे ठेवले पदरावर पदर
बेसनाच्या सारणाची त्यामधे भर
चवीला हवा , चिंचेचा गर
वाफवुन तळा भरभर .......?
उत्तर अळू वड्या
############################
सामान्य ज्ञान
1) तुळजापूर हे तुळजाभवानीचे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर:- उस्मानाबाद
2) महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते?
उत्तर:-पैठण
3) महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहेत?
उत्तर:- औरंगाबाद
4) शिर्डी हे साईबाबांचे धार्मिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर:- अहमदनगर
5) महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?
ऊत्तर:- अरबी समुद्र.
General knowledge
1) In which district Tuljapur is the religious place of Tuljabhavani?
Answer:- Osmanabad
2) Which place is known as Dakshin Kashi of Maharashtra?
Answer:- Paithan
3) Which division has maximum number of districts in Maharashtra?
Answer:- Aurangabad
4) In which district is Shirdi, the religious site of Sai Baba?
Answer:- Ahmednagar
5) Which sea is west of Maharashtra?
Answer:- Arabian sea.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
बोधकथा
*(जिल्हा परिषदेचे उद्याच्या परिपाठातील मूल्य आणि बोधकथा pdf प्राप्त न झाल्या मुळे ही बोधकथा तात्पुरती दिली आहे. उद्या सकाळी pdf मिळाल्यास त्यातलीच बोधकथा घ्यावी ही नम्र विनंती.)*
सशांना नेहमीच घाबरून जगावं लागतं.
कुठल्याही शिकाऱ्याची चाहुल लागली कि जीव मुठीत घेऊन पळत सुटावं लागतं.
असं सतत घाबरण्याला ससे एक दिवस कंटाळले.
सगळ्यांनी मिळुन ठरवलं कि आपण आता हे जंगल सोडुन जाऊया.
अशी जागा शोधूया जिथे आपल्याला कोणाला घाबरून राहावं लागणार नाही.
सगळे दुडूदुडू पळत निघाले.
पळता पळता ते नदीकाठी आले.
तिथे बेडुक बसलेले होते.
अचानक एवढे ससे पळत आल्यामुळे बेडुक दचकले आणि टणाटण पाण्यात उड्या मारायला लागले.
त्या बेडकांना पाहुन एक ससा थबकला.
त्याने विचार केला आपण लहान प्राणी म्हणुन सगळ्यांना घाबरत पळतो.
पण हे बेडूक आपल्यापेक्षाही लहान आहेत आणि ते आपल्याला घाबरत आहेत.
म्हणजे सगळ्यांना घाबरणाऱ्या आपल्यासारख्यानाही घाबरणारे कोणीतरी आहेत.
याचा अर्थ जिथे कोणी कोणाला घाबरणार नाही अशी जागा नाहीच.
आपल्याला सावध राहणं हाच एक मार्ग आहे.
त्याने हा विचार सर्वांना सांगितला आणि त्यांनी जंगल सोडण्याचा विचार रद्द केला.
बोध:- बोध:- परिस्थितीला घाबरून जगण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा सामना करत जगावे आणि संकटांचा न घाबरता सामना करावा.
Moral
Bodh:- Rather than living in fear of the situation, one should live facing the situation and face the difficulties without fear.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Rabbits always have to live in fear.
Any hunter has to run away with his life in hand.
One day the rabbits got tired of this constant fear.
Everyone decided together that we should leave this forest now.
Let's find a place where we don't have to be afraid of anyone.
Everyone ran away.
Running they came to the river.
Frogs were sitting there.
Suddenly, because so many rabbits ran, the frogs started jumping into the water.
Seeing those frogs, a rabbit started thinking.
He thought that as we are small animals, we run scared of everyone.
But these frogs are even smaller than us and they are afraid of us.
It means that everyone is afraid of others who are afraid of us.
It means that there is no place where no one is afraid of anyone.
One way is to be careful.
He shared this idea with everyone and they canceled the idea of leaving the forest.
English words
School community
Learning लर्निंग शिकणे
Classmate क्लासमेट वर्गमित्र
Primary school प्रायमरी स्कुल प्राथमिक शाळा
School yard. स्कूल यार्ड शाळेचे आवार
Pupil प्युपिल विद्यार्थी
(गेले 3 दिवस आपण school community बद्दल शब्द घेत आहोत.रोज 5 शब्द या प्रमाणे केले तर खुप दिवस लागतील.या उलट जर आपण विद्यार्थ्यांना या विषयाशी संबंधित जास्तीत जास्त शब्द शोधण्याचे आव्हान दिले तर हे काम अधिक गतीने होईल.तर चॅलेंज मुलांना द्या.आणि मुलांनी दिलेला प्रतिसाद पहा.शक्य झाले तर मला देखील कळवा🙏)
Wish you all Happy Tuesday💐💐
युडायस कोड नुसार शाळा पहा
जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या संवर्ग ४ टप्पा आता पूर्ण झालेला असून या बदली मध्ये आपल्याला कोणती शाळा मिळाली आहे ते बदली यादीतील युडायस वरून पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा...
*🌈बदली अपडेट महत्त्वाचे..!*
◼️आता मिळणार बदलीची पुन्हा एक संधी..!
◼️फक्त विस्थापित शिक्षकांसाठी(ज्यांच्या नावासमोर Tagged आणि जुन्याच शाळेचा Udise Code आहे..!
◼️Eligible Round -2 (विस्थापित फेरीत) गेलेल्या शिक्षकांना आता स्व-तालुक्यात शाळा मिळविण्याची मोठी संधी..
आज दि.६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी जिल्हा अंतर्गत ची संवर्ग ४ ची बदली यादी प्रकाशित झाली आहे.परंतु त्यात बदल असल्याने तिला अंतिम समजण्यात येऊ नये.सुधारित यादी १२ वाजता नंतर प्रकाशित केली जाणार आहे,अश्या सूचना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाल्या आहेत.
*यादीचे पृथककरण(Analysis) केल्यास विस्थापित होण्याच्या भीतीने बऱ्याच शिक्षकांनी आपला स्व-तालुका सोडून बाहेरील तालुक्यातील शाळा निवडल्या आहेत आणि त्यांना त्या मिळाल्या आहेत.असे झाल्याने त्यांच्या स्व-तालुक्यातील बऱ्याच जागा रिक्त असल्याचे पाहायला मिळाले आहे.*
आता पुढील Eligible Round २(विस्थापित) मध्ये अत्यंत कमी म्हणजेच पूर्ण सर्व जिल्ह्यात १४२९ शिक्षक फॉर्म भरणार आहेत .परंतु त्या तुलनेत जागा भरपूर असल्याने त्यांना शाळा निवडण्यासाठी जास्त पर्याय उपलब्ध असणार आहेत,ज्यामुळे आपल्याला चांगली किंवा आपल्या आवडीची शाळा मिळण्याची शक्यता १००% असणार आहे.
डिजिटल द्विभाषिक परिपाठ
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र
डिजिटल द्विभाषिक परिपाठ ...
*चला सोपा करूया परिपाठ*
*संकल्पना व लेखक*
*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*
मोबाईल नंबर 9130958046
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख - ६ फेब्रुवारी २०२३
वार- सोमवार
तिथी-माघ कृष्ण १ शके १९४४
अयन-उत्तरायण
ऋतू - शिशिर ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना " रज्जब"
पारशी महिना शेहरेवार
Today's almanac
Date - 6 February 2023
Monday
Tithi-Magh krushna 1
Shaka 1944
Ayana-Uttarayana
Ritu - Shishir Ritu(Autumn season)
"Rajjab" month of Muslims
Parsi month Shehrewar
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सूर्योदय 7.02
सूर्यास्त 6.23
दिवस कालावधी 11 तास 21 मि.42 से.
चंद्र अस्त:-7.31
चंद्र उदय:-18.58
प्रदीपन. 99.8%
वॅनिंग गिबस 99.8%
Sunrise 7.02 Am
Sunset 6.23Pm
Day duration 11 hrs 21 min 42 sec.
Moonset:-7.31
Moon rise:-18.58
Illumination 99.8%
Waning gibbous 99.8%
🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙
सुविचार
कुणाला दुखावून मिळालेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही मात्र कुणाला आनंद मिळावा म्हणून पोचलेला त्रास नेहमीच चूक देतो.
Good Thought
Happiness gained by hurting someone can never bring happiness, but suffering caused to bring happiness to someone always brings happiness.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
दिनविशेष
१८९०: भारतरत्नने सन्मानित ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान यांचा जन्म.
१८०४: जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ यांचा मृत्यू (जन्म: १३ मार्च १७३३)
special day
1890: Birth of Bharat Ratna awardee Khan Abdul Ghaffar Khan.
1804: Death of Joseph Priestley – English chemist (born: 13 March 1733)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजची म्हण व अर्थ
खायला काळ भुईला भार - निरूद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.
कोडे
पाटील बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब?
उत्तर : कणीस
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सामान्य ज्ञान
1)विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
उत्तर : टंगस्टन
2) डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?
उत्तर : मूत्रपिंडाचे आजार
3) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?
उत्तर : पांढऱ्या पेशी
4) विश्व कर्करोग दिन कोणत्या दिवशी असतो?
उत्तर:-4 फेब्रुवारी
5) एपीजे अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
उत्तर:- अग्निपंख
General knowledge
1)Which metal wire is used in electric lamp?
Answer: Tungsten
2) In which disease does dialysis treat?
Answer: Kidney disease
3) Which cells in the human body can resist pathogens?
Answer: White cells
4) On which day is World Cancer Day?
Answer:-4th February
5) What is the name of APJ Abdul Kalam's autobiography?
Answer:- Agni pankh
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
बोधकथा
एकदा एक कावळा आकाशातुन उडत असताना त्याला एक विंचु दिसला.
त्या विंचवाला मारून खावे असे कावळ्याला वाटले.
कावळ्याने जमिनीवर झेप घेतली आणि विंचवाला पकडुन उडाला.
विंचवाने ताबडतोब त्याला डांगी मारली आणि कावळा कळवळत जमिनीवर पडला.
विंचु त्याच्या तावडीतुन सुटला आणि तुरुतुरु निघुन गेला.
कावळा आपल्या बेसावधपणाला कोसत विंचवाच्या दंशामुळे गतप्राण झाला.
बोध:- नेहमी सावध पणाने काम करावे
Parable
Once a crow was flying in the sky when it saw a scorpion.
The crow wanted to kill and eat that scorpion.
The crow swooped down on the ground and caught the scorpion and flew away.
The scorpion immediately pounced on him and the crow fell to the ground in agony.
The scorpion escaped from his clutches and hurried away.
The crow was killed due to the scorpion's sting in his carelessness.
Note:- Always work with caution
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
English words
School community
1)Head Master. हेडमास्टर मुख्याध्यापक
2)Head mistress. हेड मिस्ट्रेस मुख्याध्यापिका
3) Laboratory. लॅबोरेटरी प्रयोगशाळा
4) Library. लायब्ररी ग्रंथालय
5) kitchen किचन स्वयंपाकगृह