मित्रांनो नवोदय परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी तारीख आता पुन्हा आठ दिवसांनी वाढवून देण्यात आलेली आहे.
पूर्वीच ८ फेब्रुवारी ही तारीख देण्यात आलेली होती. ती आता परत नव्याने वाढवून 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे .
साइटवर येणाऱ्या अनेक अडचणी पाहता शिक्षकांना किंवा पालकांना फॉर्म भरताना अनेक अडचणी येत होत्या. फॉर्म रिफ्रेश होऊन जायचा पूर्ण माहिती भरल्यानंतर भरलेली माहिती ही रिफ्रेश होऊन जायची आणि पुन्हा नव्याने ती माहिती भरून दोन-तीन वेळेस प्रयत्न केल्यानंतरच फॉर्म सबमिट होत होता.
तर ही अडचण पाहता नव्याने शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी वेळ वाढवून देण्यात आलेली आहे. ज्यामुळे ज्या मुलांचे फॉर्म भरायचे बाकी होते त्या मुलांचे फॉर्म भरण्याची काम आता लवकरच लवकर पूर्ण करता येणार आहे. फक्त यामध्ये आता वर सर्टिफिकेट चा पुरावा हा आधार नसेल तर पालकांनी आता मुलांचा बर्थ सर्टिफिकेट चा पुरावा सुद्धा पहिल्यांदा लॉगिन पेजवर भरावा लागणार आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.