डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

युडायस कोड नुसार शाळा पहा

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या संवर्ग ४  टप्पा आता पूर्ण झालेला असून या बदली मध्ये  आपल्याला कोणती शाळा मिळाली आहे ते बदली यादीतील युडायस वरून  पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा...





*🌈बदली अपडेट महत्त्वाचे..!*



◼️आता मिळणार बदलीची पुन्हा एक संधी..!


◼️फक्त विस्थापित शिक्षकांसाठी(ज्यांच्या नावासमोर Tagged आणि जुन्याच शाळेचा Udise Code आहे..!


◼️Eligible Round -2 (विस्थापित फेरीत) गेलेल्या शिक्षकांना आता स्व-तालुक्यात शाळा मिळविण्याची मोठी संधी..


आज दि.६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी जिल्हा अंतर्गत ची संवर्ग ४ ची बदली यादी प्रकाशित झाली आहे.परंतु त्यात बदल असल्याने तिला अंतिम समजण्यात येऊ नये.सुधारित यादी १२ वाजता नंतर प्रकाशित केली जाणार आहे,अश्या सूचना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाल्या आहेत.


*यादीचे पृथककरण(Analysis) केल्यास विस्थापित होण्याच्या भीतीने बऱ्याच शिक्षकांनी आपला स्व-तालुका सोडून बाहेरील तालुक्यातील शाळा निवडल्या आहेत आणि त्यांना त्या मिळाल्या आहेत.असे झाल्याने त्यांच्या स्व-तालुक्यातील बऱ्याच जागा रिक्त असल्याचे पाहायला मिळाले आहे.*


आता पुढील Eligible Round २(विस्थापित) मध्ये अत्यंत कमी म्हणजेच पूर्ण सर्व जिल्ह्यात १४२९  शिक्षक फॉर्म भरणार आहेत .परंतु त्या तुलनेत जागा भरपूर असल्याने त्यांना शाळा निवडण्यासाठी जास्त पर्याय उपलब्ध असणार आहेत,ज्यामुळे आपल्याला चांगली किंवा आपल्या आवडीची शाळा मिळण्याची शक्यता १००% असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: