डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र
डिजिटल द्विभाषिक परिपाठ ...
*चला सोपा करूया परिपाठ*
*संकल्पना व लेखक*
*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*
मोबाईल नंबर 9130958046
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख - ६ फेब्रुवारी २०२३
वार- सोमवार
तिथी-माघ कृष्ण १ शके १९४४
अयन-उत्तरायण
ऋतू - शिशिर ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना " रज्जब"
पारशी महिना शेहरेवार
Today's almanac
Date - 6 February 2023
Monday
Tithi-Magh krushna 1
Shaka 1944
Ayana-Uttarayana
Ritu - Shishir Ritu(Autumn season)
"Rajjab" month of Muslims
Parsi month Shehrewar
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सूर्योदय 7.02
सूर्यास्त 6.23
दिवस कालावधी 11 तास 21 मि.42 से.
चंद्र अस्त:-7.31
चंद्र उदय:-18.58
प्रदीपन. 99.8%
वॅनिंग गिबस 99.8%
Sunrise 7.02 Am
Sunset 6.23Pm
Day duration 11 hrs 21 min 42 sec.
Moonset:-7.31
Moon rise:-18.58
Illumination 99.8%
Waning gibbous 99.8%
🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙
सुविचार
कुणाला दुखावून मिळालेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही मात्र कुणाला आनंद मिळावा म्हणून पोचलेला त्रास नेहमीच चूक देतो.
Good Thought
Happiness gained by hurting someone can never bring happiness, but suffering caused to bring happiness to someone always brings happiness.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
दिनविशेष
१८९०: भारतरत्नने सन्मानित ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान यांचा जन्म.
१८०४: जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ यांचा मृत्यू (जन्म: १३ मार्च १७३३)
special day
1890: Birth of Bharat Ratna awardee Khan Abdul Ghaffar Khan.
1804: Death of Joseph Priestley – English chemist (born: 13 March 1733)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजची म्हण व अर्थ
खायला काळ भुईला भार - निरूद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.
कोडे
पाटील बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब?
उत्तर : कणीस
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सामान्य ज्ञान
1)विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
उत्तर : टंगस्टन
2) डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?
उत्तर : मूत्रपिंडाचे आजार
3) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?
उत्तर : पांढऱ्या पेशी
4) विश्व कर्करोग दिन कोणत्या दिवशी असतो?
उत्तर:-4 फेब्रुवारी
5) एपीजे अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
उत्तर:- अग्निपंख
General knowledge
1)Which metal wire is used in electric lamp?
Answer: Tungsten
2) In which disease does dialysis treat?
Answer: Kidney disease
3) Which cells in the human body can resist pathogens?
Answer: White cells
4) On which day is World Cancer Day?
Answer:-4th February
5) What is the name of APJ Abdul Kalam's autobiography?
Answer:- Agni pankh
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
बोधकथा
एकदा एक कावळा आकाशातुन उडत असताना त्याला एक विंचु दिसला.
त्या विंचवाला मारून खावे असे कावळ्याला वाटले.
कावळ्याने जमिनीवर झेप घेतली आणि विंचवाला पकडुन उडाला.
विंचवाने ताबडतोब त्याला डांगी मारली आणि कावळा कळवळत जमिनीवर पडला.
विंचु त्याच्या तावडीतुन सुटला आणि तुरुतुरु निघुन गेला.
कावळा आपल्या बेसावधपणाला कोसत विंचवाच्या दंशामुळे गतप्राण झाला.
बोध:- नेहमी सावध पणाने काम करावे
Parable
Once a crow was flying in the sky when it saw a scorpion.
The crow wanted to kill and eat that scorpion.
The crow swooped down on the ground and caught the scorpion and flew away.
The scorpion immediately pounced on him and the crow fell to the ground in agony.
The scorpion escaped from his clutches and hurried away.
The crow was killed due to the scorpion's sting in his carelessness.
Note:- Always work with caution
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
English words
School community
1)Head Master. हेडमास्टर मुख्याध्यापक
2)Head mistress. हेड मिस्ट्रेस मुख्याध्यापिका
3) Laboratory. लॅबोरेटरी प्रयोगशाळा
4) Library. लायब्ररी ग्रंथालय
5) kitchen किचन स्वयंपाकगृह
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.