नुकतेच महाराष्ट्र राज्यात दहा आणि वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या असणाऱ्या शाळेवर आता निवृत्त झालेल्या शिक्षकांना मानधनावर नियुक्त करण्यात येणार आहे.
आज महाराष्ट्रात ही
जी परिस्थिती आलेली आहे ही लहान शाळेसाठी फार चिंता निर्माण करणारी बाब आहे.
आपण प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आज सर्वांची जबाबदारी खूप मोठी झालेली आहे .अनेक डी.एड बी.एड.धारक तरूण बेरोजगार असताना त्यांना प्राधान्य देण्याऐवजी निवृत्त झालेल्या पेन्शन धारक असलेल्या शिक्षकांना मानधनावर घेऊन नक्कीच या तरुणांचे भविष्य अंधारात लोटण्याचं काम झालेलं दिसून येत आहे .
या नवतरुणांना आज रोजगाराची गरज आहे .यांना शिक्षण सेवक म्हणून मानधनावर जर घेतल्यास यांच्या उज्वल भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा पैलू ठरणार आहे.
निवृत्त झालेल्या शिक्षकांना त्या अवघड ठिकाणी जाणे येणे शक्य होणार आहे का? वयाची मर्यादा पाहता त्यांच्याकडून हे काम करणे शक्य होणार नाही .असेच काही जाणवत आहे .
नवनियुक्त शिक्षकांना जर शिक्षण सेवक या मानधनावर नियुक्ती देण्यात आली कित्येक पट चांगल्या प्रकारे ते काम करू शकतील.
निश्चितच या बाबींचा विचार होणे फार महत्त्वाचा आहे सर्व संघटनांनी आणि शिक्षणप्रेमी सर्व लोकांनी या बाबीकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे झालेले आहे.
*प्रकाशसिंग राजपूत*
समूहनिर्माता
*📺डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥️
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.