डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

सरसकट पदवीधर वेतनश्रेणी देण्याबाबत अभ्यास करण्याकरिता समिती स्थापन.*

 राज्यातील उच्च प्राथमिक (इ. ६ वी ते ८ वी ) च्या वर्गाकरिता नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करुन शिफारस करण्याकरिता पुढीलप्रमाणे समिती नियुक्ती करण्यात येत आहे.


१) आयुक्त, शिक्षण    अध्यक्ष


(२) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य    सदस्य


३) संचालक, विद्याप्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे

सदस्य

४) सह सचिव / उप सचिव (शिक्षक व शिक्षकेतर), मंत्रालय, मुंबई   सदस्य


५) सह सचिव / उप सचिव (ग्रामविकास विभाग), मंत्रालय, मुंबई   सदस्य


६) सह संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे   सदस्य सचिव








शालेय पोषण आहाराच्या खिचडीत पाल आढळल्याने विषबाधा

 बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथील एका शाळेतील तब्बल 15हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या खिचडीत पाल आढळल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आलेली आहे.



यांतील दोघेजण गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.खिचडीत (पुलाव) शनिवारी दुपारी भोजनासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या ताटात पाल आढळून आली.

ही बाब समजेपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्‍ली होती. ज्याच्या ताटात पाल आढळली, तो सातव्या वर्गातील पृथ्वीराज वाघमारे यास उलट्या, चक्‍कर आणि मळमळीचा त्रास जाणवू लागल्याने पालकांनी त्यास लोहगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तद्नंतर एकामागून एक विद्यार्थी येत गेल्याने संख्या 15 च्या वर गेली.

कोल्हेबोरगाव येथील पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना मळमळ होणे, उलट्या होणे व चक्‍कर येण्याचा त्रास होत असल्याने सदरील विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. या विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. दोन विद्यार्थ्यांना जास्तीचा त्रास असल्याने त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.


बदली संदर्भात महत्त्वाचे परिपत्रक

गणिताशी गट्टी मासिक ऑनलाईन प्रश्नमंजुषा क्र. ६

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र समूहसदस्य श्री अजित तिजोरेसर निर्मिती असलेली ....


 *गणिताशी गट्टी मासिक ऑनलाईन प्रश्नमंजुषा क्र. ६*


परीक्षेसाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://forms.gle/ruwegrKWJcp6fffe6


१) या परीक्षेत *काळ व वेग* या घटकावर दहा MCQ प्रश्न विचारले जातील.

२) परीक्षा दहा गुणांची असेल.

३) परीक्षेची वेळ : रविवार दिनांक २६ जून २०२२ रोजी सायंकाळी ७:०० ते ८:००

४) सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.

५) प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या सदस्यांची नावे गणिताशी गट्टी फेसबुक पान तसेच व्हाट्सअप समूहावर प्रसिद्ध केली जातील.

६) रात्री आठनंतर येणाऱ्या प्रतिसादांचा क्रमांकासाठी विचार केला जाणार नाही.

७) परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर केला जाईल.


सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!💐



*#गणिताशीगट्टी*