डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

एक विचार अर्थक्रांती आणेल..... #motivational #ideal #home loan

 गृहकर्ज सरसकट सर्व भुखंडावर मिळावे कर्ज घेणाऱ्याच्या क्रयशक्ती तथा क्षमतेवर मिळावे ना की भुखंड .....


थोडक्यात पार्श्वभूमी 

आपण २०२० हे वर्ष ओलांडून आता खूप दिवस झाले . आर्थिक महासत्ता बनण्यासाठी आपले प्रयत्न निश्चितच प्रगतीला गवसणी घालणारे आहेत. सर्वसामान्य जनता सदैव एक स्वप्नं कुटुंबासाठी पहाते. ते म्हणजे स्वतः चे घर असावे. इथपर्यत अनेकांची घोडदौड सुरु असते. किंबहुना या स्वप्नं साकारण्यासाठी दिवस रात्र धडपड सुरु असते.



        आज सांगायचे गेले तर बॕकेचे गृहकर्ज हे फार कमी व्याजदराचे जवजवळ ७ % आसपास म्हणजेच खूप परवडणारे असेच म्हणता येईल. 

नगररचना व ग्रीन झोन -

हल्ली आपल्याकडे ग्रीन झोन व येलो झोन हे ठरवून त्यानुसारच त्या भागातील जमिनीला NA दिल्या जाते. खरं तर ही अट आपल्या विकासाला बाधा आणणारी  ठरली. ग्रीन झोन ३३% असणे आवश्यक आहे . परंतु शहराचा हाच भाग असावा हा नसावा असे करत करत एकूणच नगररचना विभाग हे त्या आधारित परवानगी देत त्यावर भुखंड अस्तित्वात येतात. येलोझोन मधील NA44 तर ग्रीन झोन हे गैर NA किंवा गुंठेवारी चे बनून जातात.



         एक ठराविक भाग हरीत क्षेत्र न करता जर प्रत्येक भुखंडजमिनीतील एकूण जमिनीतील काही भाग ज्याप्रमाणे ओपन स्पेस म्हणून सोडल्या जातो त्या ऐवजी हरित क्षेत्र करून त्यावर घनवन तयार केल्यास . हरित क्षेत्राचे लक्ष्य पुर्ण होऊन सर्वत्र हिरवी अंगणे निर्माण होतील.           

गृहकर्ज ( Home loan)

राष्ट्रीयकृत बॕकेच्या गृहकर्ज ( Home loan) घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. बॕकेच्या उत्पनाचा सर्वाधिक मार्ग या कर्जाचा आहे. परंतु येथे मोठी अडचण येथे ती प्लाॕट कायदेशीर की बेकायदेशीर  वास्तविक  बॕक कर्ज देते त्यावेळी कर्ज घेणाऱ्याची क्रयशक्ती किंवा क्षमता विचारत घेत कर्ज दिले जावे.

वरील NA अट काढल्यास बॕक तथा पर्यायाने देशाला कसा फायदा होईल ते खालीलप्रमाणे पहा....

१) बॕक कर्ज वाटप वाढून बॕकेचे उत्पन्न वाढून त्या आणखी भक्कम होत देशाच्या विकासाला हातभार लावतील.

२) NA नसलेल्या भुखंडावर घर बनते परंतु महाग कर्ज घेऊन किंवा उत्पन्न येईल त्याप्रमाणे थोडे थोडे बांधकाम. यामुळे घर बांधता बांधता संबंधित व्यक्ती खूपच कर्जात जाऊन त्याच्या क्रयशक्तीची हानी होत .  पुढील अनेक वर्ष तो कुठलीही उलाढाल करु शकत नाही.

३) NA नसलेल्या भुखंडावर घर बनून जातेच. मग अशा वेळी बॕक अशा घरांना कर्ज देत नाही. हे कर्ज व्यक्तीच्या क्रयशक्तीवर बॕकेने दयावे ना तर भुखंडावर. 

४) हल्ली पर्सनल लोन साठी बॕक फोन करून ग्राहक शोधत बसते व एकीकडे गृहकर्जाच्या शोधात व्यक्ती फिरत अखेर तो सावकाराचे न परवडणारे असे टक्केवारीचे कर्ज घेतो. किती मोठी ही विषमता? म्हणता येईल या सर्वा प्रकारास.

५)प्रत्येक भुखंड जमिनीवर काही भाग वृक्ष लागवडीसाठी आरक्षित करुन ग्रीन येलो झोन यात बदल होऊन NA सुलभ करत बॕकेला ही मोकळीक मिळावी. जेणे करुन त्या ही सुलभ कर्जवाटप करुन चांगल्या स्थितीत येतील.

देशाला गतीमान करणारा हा विचार अर्थक्रांती आणून भरभराट नक्कीच आणेल . आपल्याला कार वाटते काॕमेंट व ही पोस्ट शेअर करा. आमच्या सोबत राहण्यासाठी या साईटला follow करा....


प्रकाशसिंग राजपूत 



हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग #samruddhi mahamargh

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्दिष्ट 


लोकांच्या आणि वस्तूंच्या जलद आणि सुलभ वाहतुकीसाठी सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक सुविधांसह शेवटच्या टप्प्यात कनेक्टिव्हिटी निर्माण करणे आहे. 


 द्रुतगती मार्गामुळे महाराष्ट्रातील मोठ्या लोकसंख्येला स्वयंरोजगार आणि मजुरीच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, व्यापार, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये सहज प्रवेश मिळेल.


   



   मुख्य 10 जिल्हे


   नागपूर

   वर्धा
   अमरावती
   वाशिम
जालना
   नाशिक
   ठाणे

बुलढाणा

औरंगाबाद

अहमदनगर


   इतर  जिल्हे


   चंद्रपूर

  गोंदिया

   गडचिरोली

   यवतमाळ

   अकोला

   हिंगोली

   परभणी

   नांदेड

   बीड

   धुळे

   जळगाव

   पालघर

   रायगड

   नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांतून एक्स्प्रेस वे जाणार आहे.  हे नागपूरला मुंबईशी जोडेल आणि देशातील सर्वात मोठ्या कंटेनर पोर्ट - जेएनपीटीशी थेट संपर्क स्थापित करेल.  यामुळे राज्याचा अबकारी (निर्यात-आयात) व्यापार वाढेल.  मार्गातील सर्व प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी परस्पर जोडलेले महामार्ग आणि फीडर रस्ते बांधले जातील.  यामध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड असे आणखी १४ जिल्हे जोडले जातील.  अशा प्रकारे महाराष्ट्रातील एकूण २४ जिल्हे या एक्स्प्रेस वेशी जोडले जाणार आहेत.

  •    राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळेही एक्स्प्रेस वेने जोडली जातील.

  •    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची क्षणचित्रे

  •    हा द्रुतगती मार्ग 701 किमी लांबीचा असेल, जो 10 जिल्हे, 26 तालुके आणि सुमारे 392 गावांना थेट जोडेल.

  •    त्याची वेगमर्यादा 150 किमी प्रतितास असेल जी नागपूर आणि मुंबई 8 तासात पोहोचेल.  त्यामुळे मुंबई ते औरंगाबाद प्रवासाचा कालावधी 4 तास आणि औरंगाबाद ते नागपूर 4 तास जास्त असेल.

  •    हे अनेक औद्योगिक क्षेत्रे, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC), वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (WDFC), वर्धा आणि जालना येथील ड्राय पोर्ट्स आणि मुंबईचे JNPT यांना जोडेल.

  •    22.5 मीटरच्या मध्यभागी एकूण 120 मीटर रुंदीचा एक्स्प्रेस वे डिझाइनच्या आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करेल.  प्रत्येक बाजूला 4,8 लेन असतील.  द्रुतगती मार्गाच्या मध्यभागी दोन्ही बाजूंच्या लेनचे रुंदीकरण करण्याची तरतूद करण्यात आली आहे.  त्यामुळे भविष्यात विस्तारासाठी जमिनीची गरज भासणार नाही.

  •    अंडरपासला जोडणारे सर्व्हिस रोड दोन्ही बाजूला असतील.

  •    हे मोक्याच्या ठिकाणी सुमारे 50+ उड्डाणपूल, 24+ इंटरचेंज, 5 पेक्षा जास्त बोगदे, 400+ वाहने आणि 300+ पादचारी अंडरपास प्रदान करेल.  हे अंडरपास आणि उड्डाणपूल वाहतुकीला अडथळा न होता वाहने वेगाने जाण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी फायदेशीर ठरतील.  स्थानिक लोकांना कोणताही अडथळा न येता प्रवास करणे आणि अपघातांना आळा घालणे देखील फायदेशीर आहे.

  •    एक्स्प्रेस वेच्या संपूर्ण लांबीमध्ये विस्तृत लँडस्केपिंग, बोगद्याची प्रकाश व्यवस्था, पुलाचे सुशोभीकरण, सुधारित पथदिवे आणि डिजिटल संकेत असतील.

  •    द्रुतगती मार्गाच्या बांधकामात शक्यतो स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्य, फ्लाय अॅश आणि प्लास्टिकचा वापर केला जाईल.  एक्स्प्रेस वेवरूनही पावसाचे पाणी बाहेर काढले जाईल.

  •    एक्स्प्रेस वेचा प्रवेश आणि निर्गमन व्यवस्थापित केले जाईल आणि कव्हर केलेल्या अंतरावर आधारित टोल आकारला जाईल.  टोल वसुली स्वयंचलित करण्याचा प्रस्ताव आहे.

  •    द्रुतगती महामार्ग हा शून्य अपघाती महामार्ग असेल;  कोणत्याही अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीची तक्रार करण्यासाठी प्रत्येक 5 किमीवर सीसीटीव्ही निगराणी आणि विनामूल्य टेलिफोन बूथ असतील.

  •    ओएफसी केबल्स, गॅस पाइपलाइन, पॉवर लाईन्स इत्यादींसाठी एक्सप्रेसवेसह उपयुक्तता महामार्ग प्रदान केले जातील.

  •    कोणतीही आणीबाणी, नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धासारखी परिस्थिती उद्भवल्यास, द्रुतगती मार्गावर विमानांचे लँडिंग सुलभ करण्यासाठी द्रुतगती मार्गाचे तात्पुरत्या धावपट्टीत रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे.

तुमचे wifi राऊटर धोक्यात तर नाही .... हॕकरची नजर त्यावर.... #Wifi, #router

 एका रिसर्चनुसार वायफाय राऊटरच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे. काही कंपन्यांचे वायफाय राऊटर हॅकर्ससाठी सोपं लक्ष्य बनले आहेत.



 यामुळे वायफाय नेटवर्कच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. आयओटी इन्स्पेक्टर आणि चीप मॅगझिनला सुरक्षा संशोधकांच्या चमूने ही माहिती दिलेली आहे.

 

 यामुळे विविध कंपन्यांचे लाखो वायफाय राउटर धोक्यात असल्याचे मानल्या जात आहेत. . इंटरनेट सुरक्षा कंपन्यांच्या राऊटरमधील जुन्या आवृत्त्यांमधील काही घटक हे देखील याचं कारण असू शकतं. यामुळे हॅकर्सना हे राऊटर हॅक करणे सोपं होतं, असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.



    

जाणून घ्या कोणकोणत्या बाबतीत धोका असू शकतो.... 

विविध  ब्रँडचे लाखो वायफाय राऊटर धोक्यात येऊ शकतात. या नव्या संशोधन Edimax,Asus Netgear,  Synology,AVM D-Link, , TP-Link आणि  यासह मोठ्या ब्रँडमधील अनेक WiFi राऊटरच्या सुरक्षेबाबत धोक्यांची घंटा दिली आहे.

घरबसल्या स्पेस बद्दल सर्व काही शिकण्यासाठी फ्री सर्टिफिकेट कोर्स..... आणला आहे

 इस्रो भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आता विद्यार्थ्यांना  घर बसल्या स्पेस बद्दल सर्व काही शिकण्यासाठी  फ्री सर्टिफिकेट कोर्स आणला आहे.


 मुलांना अवकाश संशोधनाची माहिती किंवा अवकाशामध्ये वैज्ञानिक संशोधनात रस निर्माण होण्यासाठी .  अवकाशात बाबतीत कार्य करण्याकरिता तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इसरो या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी मोफत कोर्स आणलेला आहे.



 मग या कोर्स बद्दल या लेखामध्ये माहिती आपणासाठी घेऊन आलो आहोत,   याबाबतीत या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला https://www.iirs.gov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. यावर तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स यावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे.


 सध्यातरी या ऑनलाइन अॕप्लीकेशन ची विंडो बंद आहे. पण लवकरच यामध्ये सुरु अर्ज भरणे सुरू होणार  आहे . असा हा कोर्स करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्याची गरज असणार नाही . हा कोर्स  पूर्णपणे मोफत  आपणास करता येणार आहे. याबाबतीत  विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही सर्व कोर्स सुद्धा प्राप्त होणार आहे . 



आणि आय आर एस देहरादून चे अधिकृत वेबसाईट नुसार आय आर एस यूट्यूब चॕनल वर माहिती मिळणार आहे . उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चोवीस तासानंतर उपलब्ध असलेल्या ऑफलाइन सत्रात त्यांची उपस्थिती नोंदणी अनिवार्य असणार आहे. इस्रोच्या मते या ऑनलाइन शिक्षण अभ्यासक्रमातील प्रत्येक अभ्यासक्रम वेगळा कालावधीमध्ये विभागलेला असणार आहे चार ते बारा दिवसांचा तो असणार आहे. विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी आहे.

रखडलेल्या शिक्षक बदल्या आता मार्चनंतर.... #Teacher #transfer

 शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या लवकरात लवकर कराव्यात, असे निवेदन शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. 



यावेळी ग्रामविकास मंत्र्यांनी, बदल्या सॉफ्टवेअर टेंडरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. टेंडरिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल व मार्चमध्ये बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन मे महिन्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने बदल्या होतील, अशी ग्वाही दिली.




शिष्टमंडळात शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, रवी अंबुले, जयप्रकाश हेडाऊ, शत्रुघ्न मरस्कोल्हे, असलम शेख, अमीर अली सिद्दिकी उपस्थित होते. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करावी, पोकळ बिंदू नामावलीनुसार आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांच्या बदल्या करणे, राज्य रोष्टर, विभाग रोष्टर एक करणे, 10 टक्केची अट रद्द करावी तसेच आदिवासी, नक्षलग्रस्त भागात सेवा करणाऱ्या शिक्षकांचा वेगळा संवर्ग निर्माण करणे, पती-पत्नी एकत्रीकरणाच्या बदल्या विनाअट करणे, शिक्षणसेवक मानधन वाढवून 20 हजार करणे, पदोन्नतीची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा पाचवा टप्पा राबवावा, सर्व मुलांना मोफत गणवेश देण्यात यावेत.