डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

एक विचार अर्थक्रांती आणेल..... #motivational #ideal #home loan

 गृहकर्ज सरसकट सर्व भुखंडावर मिळावे कर्ज घेणाऱ्याच्या क्रयशक्ती तथा क्षमतेवर मिळावे ना की भुखंड .....


थोडक्यात पार्श्वभूमी 

आपण २०२० हे वर्ष ओलांडून आता खूप दिवस झाले . आर्थिक महासत्ता बनण्यासाठी आपले प्रयत्न निश्चितच प्रगतीला गवसणी घालणारे आहेत. सर्वसामान्य जनता सदैव एक स्वप्नं कुटुंबासाठी पहाते. ते म्हणजे स्वतः चे घर असावे. इथपर्यत अनेकांची घोडदौड सुरु असते. किंबहुना या स्वप्नं साकारण्यासाठी दिवस रात्र धडपड सुरु असते.



        आज सांगायचे गेले तर बॕकेचे गृहकर्ज हे फार कमी व्याजदराचे जवजवळ ७ % आसपास म्हणजेच खूप परवडणारे असेच म्हणता येईल. 

नगररचना व ग्रीन झोन -

हल्ली आपल्याकडे ग्रीन झोन व येलो झोन हे ठरवून त्यानुसारच त्या भागातील जमिनीला NA दिल्या जाते. खरं तर ही अट आपल्या विकासाला बाधा आणणारी  ठरली. ग्रीन झोन ३३% असणे आवश्यक आहे . परंतु शहराचा हाच भाग असावा हा नसावा असे करत करत एकूणच नगररचना विभाग हे त्या आधारित परवानगी देत त्यावर भुखंड अस्तित्वात येतात. येलोझोन मधील NA44 तर ग्रीन झोन हे गैर NA किंवा गुंठेवारी चे बनून जातात.



         एक ठराविक भाग हरीत क्षेत्र न करता जर प्रत्येक भुखंडजमिनीतील एकूण जमिनीतील काही भाग ज्याप्रमाणे ओपन स्पेस म्हणून सोडल्या जातो त्या ऐवजी हरित क्षेत्र करून त्यावर घनवन तयार केल्यास . हरित क्षेत्राचे लक्ष्य पुर्ण होऊन सर्वत्र हिरवी अंगणे निर्माण होतील.           

गृहकर्ज ( Home loan)

राष्ट्रीयकृत बॕकेच्या गृहकर्ज ( Home loan) घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. बॕकेच्या उत्पनाचा सर्वाधिक मार्ग या कर्जाचा आहे. परंतु येथे मोठी अडचण येथे ती प्लाॕट कायदेशीर की बेकायदेशीर  वास्तविक  बॕक कर्ज देते त्यावेळी कर्ज घेणाऱ्याची क्रयशक्ती किंवा क्षमता विचारत घेत कर्ज दिले जावे.

वरील NA अट काढल्यास बॕक तथा पर्यायाने देशाला कसा फायदा होईल ते खालीलप्रमाणे पहा....

१) बॕक कर्ज वाटप वाढून बॕकेचे उत्पन्न वाढून त्या आणखी भक्कम होत देशाच्या विकासाला हातभार लावतील.

२) NA नसलेल्या भुखंडावर घर बनते परंतु महाग कर्ज घेऊन किंवा उत्पन्न येईल त्याप्रमाणे थोडे थोडे बांधकाम. यामुळे घर बांधता बांधता संबंधित व्यक्ती खूपच कर्जात जाऊन त्याच्या क्रयशक्तीची हानी होत .  पुढील अनेक वर्ष तो कुठलीही उलाढाल करु शकत नाही.

३) NA नसलेल्या भुखंडावर घर बनून जातेच. मग अशा वेळी बॕक अशा घरांना कर्ज देत नाही. हे कर्ज व्यक्तीच्या क्रयशक्तीवर बॕकेने दयावे ना तर भुखंडावर. 

४) हल्ली पर्सनल लोन साठी बॕक फोन करून ग्राहक शोधत बसते व एकीकडे गृहकर्जाच्या शोधात व्यक्ती फिरत अखेर तो सावकाराचे न परवडणारे असे टक्केवारीचे कर्ज घेतो. किती मोठी ही विषमता? म्हणता येईल या सर्वा प्रकारास.

५)प्रत्येक भुखंड जमिनीवर काही भाग वृक्ष लागवडीसाठी आरक्षित करुन ग्रीन येलो झोन यात बदल होऊन NA सुलभ करत बॕकेला ही मोकळीक मिळावी. जेणे करुन त्या ही सुलभ कर्जवाटप करुन चांगल्या स्थितीत येतील.

देशाला गतीमान करणारा हा विचार अर्थक्रांती आणून भरभराट नक्कीच आणेल . आपल्याला कार वाटते काॕमेंट व ही पोस्ट शेअर करा. आमच्या सोबत राहण्यासाठी या साईटला follow करा....


प्रकाशसिंग राजपूत 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: