डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

गुरु माऊली नविन काव्यरचना

 






🙇🏻‍♂️            *गुरु माऊली...*


वंदन करुनी तह्यांना आज घडलो आम्ही ,

अज्ञानाची पुसुनी काजळी पेटवली  ज्ञानाची ज्योती,

शिल्पकार जीवनाचे गुरु आम्ही  सदैव  ऋणी,

भाग्य शिष्याचे उजळे हीच कार्याची प्रचिती....



उत्कर्षाच्या मार्गाचे आपण ठरला सारथी,

गौरवावी कितीच ही अनंत महंती,

आज जीवनी पाऊलोपाऊली घडतेय ख्याती,

परंपरा या नात्याची जुनी मनी आदर राहती...



यशाची गोडी लावली क्षणभर जाहला क्रोधी,

सार्थ करण्या कष्ट मनातून राहती,

विश्वगुरु दिव्यरुप या शिष्यास  बनती,

चंदनरुपी उजळे ज्ञानदानाची कीर्ती....



*माझ्या जीवनातील सर्व गुरु माऊलींना त्रिवार मानाचा मुजरा व वंदन....*💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼


   ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

           औरंगाबाद

डिसले सरांनी नोकरीचा राजीनामा दिला


 ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी जिल्हा परिषद शिक्षक पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. माढा तालुका प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार यांच्याकडे त्यांनी पोस्टाद्वारे आपला राजीनामा दिला आहे. अमेरिकेतील फुलब्राइट संस्थेची शिष्यवृत्ती घेऊन पुढील शिक्षणासाठी 8 ऑगस्ट रोजी रवाना होण्याआधी डिसले गुरुजींनी राजीनामा दिल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. शिक्षक रणजीतसिंह डिसले ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

डिसले सरांच्या कार्याचा गौरव ग्लोबल पुरस्कार मिळण्याआधी
दीडवर्ष पुर्वी प्रकाशसिंग राजपूत यांच्या राष्ट्रीय स्तरावरील
दैनिक  लोकमतच्या संपादकीय पानावरील लेखात केलेला आहे.



2022 च्या जानेवारी महिन्यात शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी तब्बल 3 वर्षे डिसले गुरुजी अनुपस्थित असल्याचा आरोप केला होता.

2021 मध्ये अमेरिकन सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर.. ग्लोबर टीचर अवॉर्ड विजेते सोलापुरातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले
यांना आता अमेरिकन सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर झाली होती. अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली होती. ही प्रतिष्ठेची असलेली स्कॉलरशिप संपूर्ण जगभरातील एकूण 40 शिक्षकांना यंदा देण्यात आली होती. 

लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत. याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे, असे डिसले गुरुजींनी सांगितले. पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती.



मुख्यालय बाबत फार मोठी बातमी

 नांदेडमधील अर्धापूर पंचायत समितीच्या तब्बल 319 कर्मचाऱ्यांविरुद्ध मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 156/3 सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करा, असा निकाल अर्धापूर न्यायालयाचे न्यायाधीश एम डी बिरहारी यांनी दिला आहे. 



या कार्यवाहीत शिक्षक आणि ग्रामसेवक यांचा मोठा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सय्यद युनूस यांनी केस दाखल केली होती. मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाहीची ही राज्यातील मोठी घटना असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बदलीबाबत शिक्षक गेले कोर्टात

अर्धापूर पंचायत समिती अंतर्गत असलेले अनेक कर्मचारी विशेषतः शिक्षक आणि ग्रामसेवक मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता उचलत असल्याची माहिती उघड झाली. 

यानंतर आरटीआय कार्यकर्ते सय्यद युनूस यांनी अनेक तक्रारी करुन मुख्यालयी राहत नसल्याबाबत प्रशासनाला निदर्शनास आणून दिले. दरम्यान तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीसाठी टाळाटाळ होत होती.

 

पार्डी म. येथील रहिवासी असलेले आरटीआय कार्यकर्ते सय्यद युनुस पार्डीकर यांनी 8 जानेवारी 2020 रोजी मुख्यालयी न राहणाऱ्या आणि घरभाडे भत्ता नियमित उचलणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी करु दोषींविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले होते. 

या दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी  मिना रावताळे यांनी दिले होते. त्यावरुन धरणे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नव्हती. 

त्यामुळे दरम्यानच्या काळात आरटीआय कार्यकर्ते सय्यद युनुस पार्डीकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करुन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्याचे मुख्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, अर्धापूर पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. अर्धापूर पंचायत समिती कार्यालयातील 319 कर्मचारी मुख्यालयी न राहता खोटे कागदपत्रे सादर करुन प्रति माह अंदाजे 14 ते 15 लाख रुपये प्रमाणे दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपये शासनाकडून उचलत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. 

या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. ए आर चाऊस यांच्या माध्यमातून अर्धापूर न्यायालयात संबंधित प्रकरण 30 मार्च 2022 रोजी सय्यद युनूस यांनी दाखल केले होते. 

न्यायालयासमोर सर्व सत्य बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतर 319 कर्मचाऱ्यांविरुद्ध 7 जुलै 2022 रोजी 156/3 सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश न्यायाधीश एम डी बिरहारी यांनी दिले आहेत.  


वारी रं ...वारी... विठ्ठलाची पंढरी

तमाम भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐जय हरि विठ्ठल🙏🏼🙏🏼🙏🏼*



वारी रं ...वारी... विठ्ठलाची पंढरी


धाव पाऊलांची गवसे पंढरी,

विठु रुखमाई दर्शनास वारी,

पावन होऊन जीवन उद्धारी ,

अखंड भक्तीची आस ही भारी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



साज भक्तांवर भक्तीचा जरी,

आत्मशांती लाभे या नगरी,

विठुरायाची सजूनी  पंढरी,

सार्थ होण्या भक्ताची वारी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



हरिनामाची जपुनी माळ जरी,

तीर्थरुपी सावली विठ्ठल धरी,

भक्तांची बनुनी माय माऊली,

गर्जे नभ कडकडाडे वीज जरी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



 *काव्यलेखन*

     ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

         औरंगाबाद 

📲  9960878457

हृदय दाटले तरी तुझीच प्रीत मिळू दे...

माझी नविन रचना आपणांस सादर करत आहे.




 *हृदय दाटले तरी तुझीच प्रीत मिळू दे...*



हळव्या मनास साथ नवा दे,

प्रीत ही आनंदाने सजवू दे,

धीर नवा गवसला जीवनी गं,

तुझ्या मनी माझं ही मन रमू दे...



साथ तुझी हिच आस मला दे,

चैतन्याचे भावविश्व माझे बनू दे,

गंभीर तु अशीच का वागते गं,

हरपून मी  तुझ्यात प्रतिबिंब दिसू दे...




श्रावण सरी बनून भावना चिंब  होऊ दे,

तुझा स्पर्श या भावनांना ही कधी होऊ दे,

प्रेमाचा माझा ही ग्रंथ लिहून गं,

आठवणींना साज जीवनी मला दे...



दुरावते तुही वेळ कठीण सुलभ होऊ दे,

 स्वप्नं आयुष्याचे माझे ही पुर्ण होऊ दे,

हिरावून तु क्षण माझा जरी गं,

हृदय दाटले तरी तुझीच प्रीत मिळू दे...



      ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️ 

            औरंगाबाद

9960878457