🙇🏻♂️ *गुरु माऊली...*
वंदन करुनी तह्यांना आज घडलो आम्ही ,
अज्ञानाची पुसुनी काजळी पेटवली ज्ञानाची ज्योती,
शिल्पकार जीवनाचे गुरु आम्ही सदैव ऋणी,
भाग्य शिष्याचे उजळे हीच कार्याची प्रचिती....
उत्कर्षाच्या मार्गाचे आपण ठरला सारथी,
गौरवावी कितीच ही अनंत महंती,
आज जीवनी पाऊलोपाऊली घडतेय ख्याती,
परंपरा या नात्याची जुनी मनी आदर राहती...
यशाची गोडी लावली क्षणभर जाहला क्रोधी,
सार्थ करण्या कष्ट मनातून राहती,
विश्वगुरु दिव्यरुप या शिष्यास बनती,
चंदनरुपी उजळे ज्ञानदानाची कीर्ती....
*माझ्या जीवनातील सर्व गुरु माऊलींना त्रिवार मानाचा मुजरा व वंदन....*💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼
✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️
औरंगाबाद
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा