माझी नविन रचना आपणांस सादर करत आहे.
*हृदय दाटले तरी तुझीच प्रीत मिळू दे...*
हळव्या मनास साथ नवा दे,
प्रीत ही आनंदाने सजवू दे,
धीर नवा गवसला जीवनी गं,
तुझ्या मनी माझं ही मन रमू दे...
साथ तुझी हिच आस मला दे,
चैतन्याचे भावविश्व माझे बनू दे,
गंभीर तु अशीच का वागते गं,
हरपून मी तुझ्यात प्रतिबिंब दिसू दे...
श्रावण सरी बनून भावना चिंब होऊ दे,
तुझा स्पर्श या भावनांना ही कधी होऊ दे,
प्रेमाचा माझा ही ग्रंथ लिहून गं,
आठवणींना साज जीवनी मला दे...
दुरावते तुही वेळ कठीण सुलभ होऊ दे,
स्वप्नं आयुष्याचे माझे ही पुर्ण होऊ दे,
हिरावून तु क्षण माझा जरी गं,
हृदय दाटले तरी तुझीच प्रीत मिळू दे...
✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️
औरंगाबाद
9960878457
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा