डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

विद्यार्थ्यांनी शेळया वळायला मागितले

 

'आमची शाळा बंद केली, आता आम्हाला शाळा नकोच म्हणून शेळ्या वळायला द्या', अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.



इगतपुरी  तालुक्यातील अतिदुर्गम आणि विस्थापित असणाऱ्या दरेवाडी या गावातील 43 विद्यार्थी आपले दप्तर जमा करण्यासाठी नाशिक  जिल्हा परिषदेवर  निघाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील शाळेचा प्रश्न प्रलंबित आहे. भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळा मागील महिन्यात बंद करण्यात आली. ही शाळा बंद करू नये म्हणून ऑगस्ट महिन्यात देखील इगतपुरीला पायी जाऊन आंदोलन केले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना लेखी स्वरुपात शाळा बंद करणार नाही असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर पालक सभेत शाळा बंद करण्याचे पत्र वाचून दाखविण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख माधव उगले यांना मारहाण झाली. तेव्हापासून ही शाळा बंद आहे.

येथील 43 विद्यार्थी हे पालकांकडून किंवा एकमेकांना शिकून शाळेचा विसर पडू देत नाही.

दरम्यान आता येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाची मशाल घेतली असून हे विद्यार्थी नाशिकच्या दिशेने निघाले आहेत. 'आम्हाला शाळा नको, शेळ्या वळायला द्याव्यात' अशी अनोखी मागणी घेऊन 43 विद्यार्थी जिल्हा परिषद कार्यालयाकडे निघाले आहेत. आपले दप्तर पाठीला लावून आणि सोबत शेळ्या घेऊन विद्यार्थी घोषणा देत आहेत. प्रशासनाचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून दप्तर जमा करण्यात येणार आहे. यासोबतच आम्हाला शाळा नको आता शेळ्या द्या अशी मागणीही केली.

नेमके  प्रकरण काय ?

दरेवाडी गावानजीक भाम धरण बांधण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना विस्थापित करण्यात आले. येथून जवळच म्हणजेच चारशे ते पाचशे मिटर अंतरावर गाव विस्थापित करण्यात आले. 

त्याचबरोबर येथील शाळा देखील त्या गावात उभारण्यात आली. मात्र येथील 30 ते 35 कुटुंबांनी विस्थापित होण्यास नकार दिला. परिणामी 43 विद्यार्थी देखील जुन्या गावात राहिले. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला इथेच शाळा असायला हवी. मात्र सर्व शिक्षा अभियानानुसार एक किलोमीटर परिघात शाळा असणे अनिवार्य आहे. त्यानुसार संबंधित 43 विद्यार्थ्यांसाठी विस्थापित गावात शाळा उभारण्यात आली आहे. ही शाळा या गावापासून अवघी चारशे ते पाचशे मीटरवर आहे, मात्र तरी देखील 43 विदयार्थ्यांची मागणी आहे कि शाळा इथंच पाहिजे.


शाळा बंद करण्याचा असा केला छात्रभारतीने निषेध



NMMS 2022-23 परीक्षा बाबत सूचना

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १८ डिसेंबर २०२२ प्रसिद्धी निवेदनाबाबत आजचे पत्र .


 परीक्षा (NMMS) २०२२-२३ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १८ डिसेंबर

२०२२ रोजी करण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रसिध्दीपत्राची प्रत सोबत जोडलेली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच लोकराज्य मासिकामधून या परीक्षेच्या प्रसिद्धी निवेदनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.

आजचे आदेश पहा....


शाळा बंद करण्याचा असा केला छात्रभारतीचे निषेध






१०,२०,३० आश्वासित बाबत महत्त्वाचा आदेश

  ज्या कर्मचारी / अधिकारी यांना यापूर्वीच्या योजनेनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावर दि. ०१.०१.२०१६ पूर्वीच पहीला लाभ मंजूर केला आहे. अशा कर्मचाऱ्यांना त्यांची १२८ अशी २० वर्षाची सेवा, ही दि. ०१.०१.२०१६ पूर्वी पूर्ण होत असल्यास, संबंधितास दुसरा लाभ (Second benefit on promotional post) दि. ०१.०१.२०१६ पासून पात्रतेनुसार अनुज्ञेय ठरेल." या उपपरिच्छेदाखालील तक्त्यामध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. सदर प्रकरणी आता सदर तक्त्यात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.


पहा सविस्तर आदेश....




जिल्हातंर्गत बदली बाबत आजची अपडेट

जिल्हातंर्गत बदली अपडेट

  जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचा शुभारंभ आता ग्रामविकास मंत्रालय आदेशानंतरच होणार आहे .



एक प्रकारे बदली प्रक्रियेची पूर्ण तयारी झालेली असून याबाबत पुढील निर्णय घेण्याची सर्व जबाबदारी आता मात्र  मंत्रालयीन परवानगी  स्वरूपाचे असल्याने यामुळे बदली प्रक्रिया थांबलेली आहे.

 जिल्हा परिषदेच्या स्तरावरील यादी प्रसिद्ध करणे , रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे याच बरोबर अवघड क्षेत्राची यादी घोषित करणे या प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेल्या असून केवळ मंत्रालयीन आदेशाची आता वाट पाहिल्या जात आहे .

एकदा जर  आदेश प्राप्त झाल्यास  जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे.

 एक विचार केल्यास सहा महिन्याच्या अंतरात मध्ये दोन वर्षाच्या बदल्या होणार आहे 2022- 23 च्या बदल्या या दिवाळीत होणार तर 2023- 24 च्या बदल्या या मे महिन्यात होण्याची शक्यता आहे एकूणच या कालावधीमध्ये सर्वाधिक शिक्षकांच्या बदल्या या होणार आहेत .

ऑनलाईन बदली मध्ये होऊ घातलेल्या या सर्व बदल्या एक प्रकारे भरपूर काही बदल शिक्षण क्षेत्रामध्ये घडून आणणार आहेत.

 निश्चितच लवकरच बदली प्रक्रिया गती घेण्यासाठी  जिल्हांतर्गत बदलीचा शुभारंभाचा आता केवळ मंत्रालयीन आदेश येणे  बाकी आहे.

  प्रकाशसिंग राजपूत

   समूहनिर्माता 

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 


शाळा बंद करण्याचा असा केला छातभारतीने निषेध




१०० पेक्षा जास्त गाड्यांना पोस्टर लावून छात्रभारतीने केला शाळाबंदीच्या निर्णयाचा निषेध

 

शिंदे गटाच्या  मेळाव्यासाठी मुंबई बाहेरुन आलेल्या सर्व एसटी व खाजगी बसेसला छात्रभारती विद्यार्थी संघटनेने पोस्टर लावत ० ते २० पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.


"शिंदे साहेबांना सांगाल का ? शाळाबंदी करु नका "

"जिल्हा परिषदेची मुलं लय लावतील लळा, शिंदे साहेबांना सांगा नका लावू शाळांना टाळा"

"एसटीला भरले १० कोटी शाळाबंदीचा निर्णय रोखेल शिक्षणाची गती"

"बसला भरले १० कोटी , शिक्षण नेले मागे आश्वासन खोटी"

अशा आशयाचे स्टीकर लावून छात्रभारती विद्यार्थी संघटनेने राज्याध्यक्ष रोहित ढाले यांच्या नेतृत्वाखाली शाळाबंदीच्या निर्णयाचा धिक्कार केला. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.