डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बदली सुधारित आदेश

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक उपरोक्त संदर्भ क्र.४ नुसार निर्गमीत करण्यात आले होते. परंतु दरम्यानच्या कालावधीत दिपावली सण तसेच क्षेत्रिय स्तरावर जिल्हांतर्गत बदलीच्या अनुषंगाने करावयाच्या कामाचे स्वरुप विचारात घेता त्यासाठी काही अधिकचा वेळ लागणार असल्यामुळे उपरोक्त संदर्भ क्र. ४ येथील दिनांक २०.१०.२०२२ चे पत्र रद्द करण्यात येत असून शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भ क्र.१ येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे.

सन २०२२ मध्ये होणान्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२ पर्यंत करण्यास संदर्भ क्र. २ येथील दिनांक ४.५.२०२२ च्या शासन निर्णयान्वये तरतुद करण्यात आली आहे. तसेच सन २०२२ मध्ये होणाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भ क्र. ३ येथील दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. उक्त दिनांक ४.५.२०२२ व दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही फक्त सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिताच लागू राहील.

आजचे सुधारित पत्र पहा.... 








बदलीचा आदेश निर्गमित

 जिल्हातंर्गत बदली बाबत आज दि २० आॕक्टोबरला पत्र आले असून बदली बाबतचे वेळापत्रक व संपुर्ण कार्यवाही स्पष्ट करण्यात आलेली आहे.

हे पत्र आपण खाली पाहू शकता.👇






बदली अपडेट

 जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबत डिजिटल स्कूल समूह  महाराष्ट्रावर गेल्या आठवड्यामध्ये दिलेली बातमी तंतोतंत खरी उतरली असून ग्रामविकास विभागाचे परवानगी आता बदलींसाठी प्राप्त झालेली आहे .

!

यापुढे आता बदलीची सर्व प्रक्रिया चालू होणार आहे जे बांधव 2018 19 मध्ये लांब गेले होते त्यांना जवळ येण्याची संधी आता प्राप्त होणार आहे .शैक्षणिक क्षेत्रातील  तःतोतंत बातमी भेटण्यासाठी  डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र असे वेब मध्ये सर्च करा.

याबाबत डिजिटल समूहाची बातमी पहा...

🔅Breaking News🔅

❄️ *बदली इच्छुक बंधू भगिनीसाठी आनंदवार्ता.* ❄️


*जिल्हातंर्गत बदली फाईलवर ग्रामविकास मंत्री महोदयांची स्वाक्षरी झाली असून बदली प्रक्रिया सुरू होईल.*

👉 मा.गिरीश महाजन साहेबांनी बदली फाईलवर स्वाक्षरी केली असून सचिव वळवी साहेब यांना पोर्टल सुरू करण्यास सांगितले आहे.कदाचित उद्या पोर्टल सुरू होईल.

💥 असे वृत्त हाती येत आहे.💥

वाबळेवाडीला शिक्षणमंत्री जाणार

  लोकवर्गणीतून मोठ्या दिमाखात उभ्या झालेल्या  जागतिक दर्जाच्या वाबळेवाडी शाळेवर बहिष्काराची वेळ आणणा-या पुणे जिल्हा परिषद प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत शिक्षणमंत्री यांनी लवकरच शाळेवरील बहिष्कार मागे घेण्यासाठी स्वत: वाबळेवाडीत येत असल्याचे आजच्या मुंबई येथील बैठकीत जाहीर केले .



दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पुढाकाराने झालेल्या तातडीच्या बैठकीत मंत्री केसरकर यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना समज दिली व आपल्या वाबळेवाडे 

दौ-यावेळी आयुष प्रसाद यांना हजर राहण्याचे सांगण्यात आलेले आहे .



शुक्रवारी  वाबळेवाडी शाळेतील सर्व पालकांनी एकत्र येवून शाळेवर बहिष्काराचा निर्णय घेतला होता.

 शाळा उभारणी केलेले मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे सव्वा वर्षांपूर्वी केलेल्या निलंबनानंतर ग्रामस्थांवर कारवाई करायला निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात शाळा बहिष्काराचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी तातडीने वाबळेवाडीत ग्रामस्थांची बैठक घेवून तेथूनच शिक्षणमंत्री केसरकर यांची बैठक घेतली .

शाळेत घेतलेला उपक्रम खूपच अफलातून ... पहा कोणती शाळा

संध्याकाळी सात ते रात्री नऊपर्यंत झालेल्या या बैठकीत केसरकर यांनी वाबळेवाडीकरांकडून सर्व माहिती घेतली व प्रशासनाची बाजु जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक  संध्या गायकवाड यांचेकडून फोनवर समजून घेतली. यावेळी त्यांनी लोकवर्गणी आणि वेगळे उपक्रम शाळांना प्रोत्साहनऐवजी त्रास दिला जात असेल तर यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असे थेट सांगितले. या शिवाय शासकीय कर्मचारी यांचे प्रतिनिधी म्हणून सीईओ आयुष प्रसाद हे असताना त्यांनी शाळेत न येताच कारवाया सुरू करणे यामुळे आपण त्यांचेवर प्रचंड नाराज असल्याचे त्यांना तात्काळ कळविण्यास सांगितले.


शालेय शिक्षणमंत्री राजस्थान दौऱ्यावर

 शिक्षण मंत्री दीपक केसरकर  हे राजस्थानची शिक्षणातील प्रगती जाणून घेण्यासाठी राजस्थानच्या दौऱ्यावर गेले आहेत.



शालेय शिक्षण मंत्र्यांनी शाळेच्या दप्तरांचे ओझे कमी करण्याची घोषणा केली. या घोषणेवर पालक, शिक्षक, शिक्षण तज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ, डॉक्टर या सगळ्यांनी टीका केली. मुलांच्या आणि पालकांच्या मनावर रोजच्या अभ्यासामुळे आणि कालबाह्य परीक्षा पद्धतीमुळे जे मानसिक आणि बौद्धिक ओझं निर्माण होतं, ते आधी कमी करायला हवं, अशी मागणी त्यावेळेला केली गेली होती. या मागणी नंतर शिक्षणमंत्र्यांनी खुलासा केला होता की, त्याबद्दल निर्णय अजून व्हायचा आहे. 

राजस्थान मधील शिक्षण देशात उत्कृष्ट -


 शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना ईटीव्ही भारतने राजस्थान मध्ये धडे गिरवण्या बाबत कारण विचारले असता त्यांनी खुलासा केला, आम्ही राजस्थानमध्ये शिक्षणाचे झालेले प्रयोग पाहण्यासाठी जात आहोत. मी स्वतः आणि शिक्षण विभाग देखील सोबत असणार आहे. आम्ही प्रथम जयपुर येथे जाणार आहोत जेथे शिक्षण क्षेत्रात चांगलं कार्य झालेलं आहे. आम्ही ते समजून घेणार आहोत. त्यानंतर चंदीगड, हरियाणा असा दौरा करून मग महाराष्ट्रात परतणार आहोत. राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करणार आहोत. त्यासाठी हा अनुभव उपयोगी ठरणार आहे.

महाराष्ट्र इतर राज्यांच्या मागे नाही राहिलं पाहिजे:

राजस्थानमध्ये जाण्याचं कारण असं की राजस्थानामधील सिक्कर-झुंझुनू व जयपूर हे असे जिल्हे आहेत जेथील सरकारी शाळा ह्या सर्वोत्तम श्रेणीमध्ये गणल्या जातात.

 केंद्र सरकारच्या 2020 च्या शालेय शिक्षणा संदर्भात अहवालात राजस्थान देशात प्रथम क्रमांकावर होते. महाराष्ट्राचे मंत्री आणि शिक्षण विभाग तेथून धडे गिरवून आल्यानंतर राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विषमता किती दूर करतात, राज्याला गुणात्मक दृष्ट्या किती प्रगतीपथावर नेतात, हे येणाऱ्या काळात कळेलच. मात्र त्यासाठी शिक्षक, पालक आणि शिक्षण तज्ञांनी यांना यावर लक्ष ठेवावंच लागणार.