डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

वाबळेवाडीला शिक्षणमंत्री जाणार

  लोकवर्गणीतून मोठ्या दिमाखात उभ्या झालेल्या  जागतिक दर्जाच्या वाबळेवाडी शाळेवर बहिष्काराची वेळ आणणा-या पुणे जिल्हा परिषद प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत शिक्षणमंत्री यांनी लवकरच शाळेवरील बहिष्कार मागे घेण्यासाठी स्वत: वाबळेवाडीत येत असल्याचे आजच्या मुंबई येथील बैठकीत जाहीर केले .



दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पुढाकाराने झालेल्या तातडीच्या बैठकीत मंत्री केसरकर यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना समज दिली व आपल्या वाबळेवाडे 

दौ-यावेळी आयुष प्रसाद यांना हजर राहण्याचे सांगण्यात आलेले आहे .



शुक्रवारी  वाबळेवाडी शाळेतील सर्व पालकांनी एकत्र येवून शाळेवर बहिष्काराचा निर्णय घेतला होता.

 शाळा उभारणी केलेले मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे सव्वा वर्षांपूर्वी केलेल्या निलंबनानंतर ग्रामस्थांवर कारवाई करायला निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात शाळा बहिष्काराचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी तातडीने वाबळेवाडीत ग्रामस्थांची बैठक घेवून तेथूनच शिक्षणमंत्री केसरकर यांची बैठक घेतली .

शाळेत घेतलेला उपक्रम खूपच अफलातून ... पहा कोणती शाळा

संध्याकाळी सात ते रात्री नऊपर्यंत झालेल्या या बैठकीत केसरकर यांनी वाबळेवाडीकरांकडून सर्व माहिती घेतली व प्रशासनाची बाजु जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक  संध्या गायकवाड यांचेकडून फोनवर समजून घेतली. यावेळी त्यांनी लोकवर्गणी आणि वेगळे उपक्रम शाळांना प्रोत्साहनऐवजी त्रास दिला जात असेल तर यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असे थेट सांगितले. या शिवाय शासकीय कर्मचारी यांचे प्रतिनिधी म्हणून सीईओ आयुष प्रसाद हे असताना त्यांनी शाळेत न येताच कारवाया सुरू करणे यामुळे आपण त्यांचेवर प्रचंड नाराज असल्याचे त्यांना तात्काळ कळविण्यास सांगितले.