डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

काय झाडी.... अफलातून गीत

 *🎤 अफलातून धमाल गीत व सुंदर जि.प.शाळा एकदा पहाच...🎼🎧*

गीत आवडल्यास चॕनलला व सबस्क्राईब व व्हिडीओ शेअर करा.... 


🌳🌴🪴 *काय झाडी...*🪴🌴🌳


https://youtu.be/YqLU7in-7kA


      *गीतलेखन व गायन*


     *श्री अंकुश नागरगोजे*


        *व्हिडीओ व संगीत*

        *प्रकाशसिंग राजपूत*


*आय. एस. ओ. समान जि.प. शाळा हाच दर्जा व ब्रॕण्ड बनवूया....*





*जास्तीतजास्त शेअर करा....*

ओ देश मेरे...

 शाळेतील विद्यार्थी घडवितांना गुणवत्ता व कलागुणांचा त्यांच्यात भंडार व्हावा हाच सदैव उद्देश ठेवत कार्य करत आलो आहोत.... 

मुरुमखेडावाडी शाळेतील कु. कल्याणी व साक्षी बचाटे यांनी कठीण असे गीत आत्मसात केले आहे.

    नक्कीच पहा 👇



      प्रकाशसिंग राजपूत व दिलीप आढे

        सहशिक्षक 

       मुरुमखेडावाडी 

रिटर्न भरण्यास ३१ जुलै अंतिम दिनांक

 २०२१-२२चे इनकम टॅक्स रिटर्न भरण्यसाठीची  अंतिम मुदत ही ३१ जुलै आहे. रिटर्न भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्याचा विचार सरकारचा नाही.



गेल्या वर्षी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५.८९ कोटी रिटर्न फाईल झाले होते.  सर्वसाधरण समज असतो की रिटर्न दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळेल. 

त्यामुळे सुरुवातीला रिटर्न कमीच फाईल होतोत. अखेरच्या दिवशीपर्यंत.” वैयक्तिक करदाते आणि ज्याना ऑडिटची गरज नाही, अशा नागरिकांसाठी इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै असते.


इनकम टॅक्स विभागाची रिटर्न फाईल करण्यासाठीची नवी वेबसाईट अत्यंत सुटसुटीत आणि मोठी क्षमता असलेली आहे.

 आतापर्यंत २.३ कोटी नागरिकांनी अगदी सहजपणे, कोणताही अडचण न येता इनकम टॅक्स रिटर्न फाईल केला आहे, असे दररोज जवळपास २० लाख नागरिक रिटर्न फाईल केले जातात,  गेल्या दोन आर्थिक वर्षांत कोरोनाच्या साथीमुळे इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती

 द्रौपदी मुर्मू या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. २०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवड झाली  असून  त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. 



जन्मतारीख: २० जून, १९५८ (वय ६४ वर्ष)
जन्मस्थळ: ओडिशा




त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले.

त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले.

स्थानिक राजकारणसंपादन करा

मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.[७]

ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.[८] २०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या.[९] त्यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले.

राज्यपालपदसंपादन करा

त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.[१०][११] भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आदिवासी नेत्या आहेत.

त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.




अवघड क्षेत्रातील जोखीम असलेली सेवा...

 महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षांपासून दुर्गम व कठीण भागातील अर्थात अवघड क्षेत्रातील सेवा करणाऱ्या शिक्षकांना २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन आदेशाने खरा न्याय मिळाला.  मात्र गेल्या २ वर्षापासून बदल्या न झाल्याने अवघड क्षेत्रात ५ वर्ष सेवा करण्याची मजबुरी या शिक्षकांवर आलेली आहे.





          निकषात वेळोवेळी बदल होत अवघड संकल्पना जरी बदलण्याचा प्रयत्न  होत असला तरी वास्तव जी भौगोलिक परिस्थिती आहे तीच सर्वाधिक परिणाम या अवघड क्षेत्रावर करत असते. ना तर राष्ट्रीय महार्मागापासूनचे अंतर ना तर फोन लागतो की नाही....

    माझी २०१८ पासून या क्षेत्रात बदली असून सतत अशा परिस्थितीत सेवा बजावतांना अनेक गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो. काल झालेला परिणाम आपण फोटोत पाहू शकता हे काही पहिल्यांदा नाही गेल्या वर्षी ३ वेळेस असच काही झाले. 2 D मध्ये जग कसे दिसते हे लक्षात येथे व 3 D न पाहू शकत असल्याने टु व्हिलर वर घरी येतांना रस्त्यावरील चढ उतार व गड्डे ही लवकर न दिसल्याने सर्वांधिक जोखीम हीच म्हणावी लागेल. या भागात येत असतांना अनेकदा मधमाशी चावा घेतात. मधमाशींचा होणारा हा त्रास २ -३ दिवस फारच कष्टदायी होतो. या व्यतिरिक्त  पक्के रस्ते नसल्याने अरुंद केवळ ६ फुटाच्या वाटेवर वाहन चालवितांना दोन्ही बाजूने २ फुट उंचीचे गवत असल्याने अचानक वाहनापुढे किंग कोबरा  ते ही अगदी ६ -७ फुटाचे लांबी असलेले हे तर अंगावर शहारे आणून सोडतात ५-६ वेळा अगदी गाडीसमोर आडवे तर एकवेळेस पायाजवळ अगदी दिड फुटावर की ज्याने उसळी घेतलीच होती केवळ नशीब बलवत्तर म्हणून काही अनुचित घडले नाही. 

     सततचा खडकाळ मार्ग व तिन्ही ऋतूचा भडीमार या परिस्थितीला अतिशय बिकट बनवतात.अवघड  परिस्थितीत शिक्षण गंगा पोहचविणाऱ्या माझ्या तमाम शिक्षक बांधवांना मानाचा मुजरा....   शासन , संघटना व प्रशासन या सर्वांनी अवघड क्षेत्राचा सकारात्मक विचार करावा हीच माफक अपेक्षा ....


      प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 

            सहशिक्षक 

जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी 

 कें करमाड, ता / जि . औरंगाबाद

    9960878457