डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

रिटर्न भरण्यास ३१ जुलै अंतिम दिनांक

 २०२१-२२चे इनकम टॅक्स रिटर्न भरण्यसाठीची  अंतिम मुदत ही ३१ जुलै आहे. रिटर्न भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्याचा विचार सरकारचा नाही.



गेल्या वर्षी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५.८९ कोटी रिटर्न फाईल झाले होते.  सर्वसाधरण समज असतो की रिटर्न दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळेल. 

त्यामुळे सुरुवातीला रिटर्न कमीच फाईल होतोत. अखेरच्या दिवशीपर्यंत.” वैयक्तिक करदाते आणि ज्याना ऑडिटची गरज नाही, अशा नागरिकांसाठी इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै असते.


इनकम टॅक्स विभागाची रिटर्न फाईल करण्यासाठीची नवी वेबसाईट अत्यंत सुटसुटीत आणि मोठी क्षमता असलेली आहे.

 आतापर्यंत २.३ कोटी नागरिकांनी अगदी सहजपणे, कोणताही अडचण न येता इनकम टॅक्स रिटर्न फाईल केला आहे, असे दररोज जवळपास २० लाख नागरिक रिटर्न फाईल केले जातात,  गेल्या दोन आर्थिक वर्षांत कोरोनाच्या साथीमुळे इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.