बदली अपडेट्स
महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला लवकरच सुरुवात होत आहे.
ऑनलाइन माहिती भरताना राज्यातील दीड हजार शिक्षकांनी आपले बंद असलेले मोबाईल नंबर दिले आहेत.
या दीड हजार शिक्षकांनी आपले चालू असलेले मोबाईल नंबर देण्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
चालू असलेले मोबाईल नंबर मिळाले की बदली प्रक्रिया सुरू करायला कोणतीही अडचण येणार नाही मोबाईल नंबर अपडेट झाले की कोणत्याही क्षणी बदली प्रक्रिया सुरू होऊ शकते.
तसेच राज्यातील केंद्रप्रमुखांना एकापेक्षा अधिक केंद्रांची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे त्यांना अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. केंद्रप्रमुखांच्या काही जागा ह्या राज्य सरकार व स्पर्धा परीक्षेद्वारे भरायचे असल्याने त्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा तात्पुरत्या अभावित स्वरूपात भरण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठवण्यात येत आहे. हा प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत ग्रामविकास विभागाकडे जाईल. शिक्षण आयुक्त कार्यालयाशी सतत संपर्कात आहोत.*