डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

मुख्यालय बाबत फार मोठी बातमी

 नांदेडमधील अर्धापूर पंचायत समितीच्या तब्बल 319 कर्मचाऱ्यांविरुद्ध मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 156/3 सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करा, असा निकाल अर्धापूर न्यायालयाचे न्यायाधीश एम डी बिरहारी यांनी दिला आहे. 



या कार्यवाहीत शिक्षक आणि ग्रामसेवक यांचा मोठा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सय्यद युनूस यांनी केस दाखल केली होती. मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाहीची ही राज्यातील मोठी घटना असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बदलीबाबत शिक्षक गेले कोर्टात

अर्धापूर पंचायत समिती अंतर्गत असलेले अनेक कर्मचारी विशेषतः शिक्षक आणि ग्रामसेवक मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता उचलत असल्याची माहिती उघड झाली. 

यानंतर आरटीआय कार्यकर्ते सय्यद युनूस यांनी अनेक तक्रारी करुन मुख्यालयी राहत नसल्याबाबत प्रशासनाला निदर्शनास आणून दिले. दरम्यान तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीसाठी टाळाटाळ होत होती.

 

पार्डी म. येथील रहिवासी असलेले आरटीआय कार्यकर्ते सय्यद युनुस पार्डीकर यांनी 8 जानेवारी 2020 रोजी मुख्यालयी न राहणाऱ्या आणि घरभाडे भत्ता नियमित उचलणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी करु दोषींविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले होते. 

या दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी  मिना रावताळे यांनी दिले होते. त्यावरुन धरणे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नव्हती. 

त्यामुळे दरम्यानच्या काळात आरटीआय कार्यकर्ते सय्यद युनुस पार्डीकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करुन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्याचे मुख्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, अर्धापूर पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. अर्धापूर पंचायत समिती कार्यालयातील 319 कर्मचारी मुख्यालयी न राहता खोटे कागदपत्रे सादर करुन प्रति माह अंदाजे 14 ते 15 लाख रुपये प्रमाणे दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपये शासनाकडून उचलत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. 

या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. ए आर चाऊस यांच्या माध्यमातून अर्धापूर न्यायालयात संबंधित प्रकरण 30 मार्च 2022 रोजी सय्यद युनूस यांनी दाखल केले होते. 

न्यायालयासमोर सर्व सत्य बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतर 319 कर्मचाऱ्यांविरुद्ध 7 जुलै 2022 रोजी 156/3 सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश न्यायाधीश एम डी बिरहारी यांनी दिले आहेत.  


वारी रं ...वारी... विठ्ठलाची पंढरी

तमाम भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐जय हरि विठ्ठल🙏🏼🙏🏼🙏🏼*



वारी रं ...वारी... विठ्ठलाची पंढरी


धाव पाऊलांची गवसे पंढरी,

विठु रुखमाई दर्शनास वारी,

पावन होऊन जीवन उद्धारी ,

अखंड भक्तीची आस ही भारी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



साज भक्तांवर भक्तीचा जरी,

आत्मशांती लाभे या नगरी,

विठुरायाची सजूनी  पंढरी,

सार्थ होण्या भक्ताची वारी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



हरिनामाची जपुनी माळ जरी,

तीर्थरुपी सावली विठ्ठल धरी,

भक्तांची बनुनी माय माऊली,

गर्जे नभ कडकडाडे वीज जरी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



 *काव्यलेखन*

     ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

         औरंगाबाद 

📲  9960878457

हृदय दाटले तरी तुझीच प्रीत मिळू दे...

माझी नविन रचना आपणांस सादर करत आहे.




 *हृदय दाटले तरी तुझीच प्रीत मिळू दे...*



हळव्या मनास साथ नवा दे,

प्रीत ही आनंदाने सजवू दे,

धीर नवा गवसला जीवनी गं,

तुझ्या मनी माझं ही मन रमू दे...



साथ तुझी हिच आस मला दे,

चैतन्याचे भावविश्व माझे बनू दे,

गंभीर तु अशीच का वागते गं,

हरपून मी  तुझ्यात प्रतिबिंब दिसू दे...




श्रावण सरी बनून भावना चिंब  होऊ दे,

तुझा स्पर्श या भावनांना ही कधी होऊ दे,

प्रेमाचा माझा ही ग्रंथ लिहून गं,

आठवणींना साज जीवनी मला दे...



दुरावते तुही वेळ कठीण सुलभ होऊ दे,

 स्वप्नं आयुष्याचे माझे ही पुर्ण होऊ दे,

हिरावून तु क्षण माझा जरी गं,

हृदय दाटले तरी तुझीच प्रीत मिळू दे...



      ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️ 

            औरंगाबाद

9960878457 

नंदनवन मुरुमखेडावाडी शाळेत सजूनी...

 🌳🌴 *अशक्य ते शक्य झाले*🌴🌳


*नंदनवन मुरुमखेडावाडी शाळेत  सजूनी...*


*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडा वाडी शाळेत जपानी पद्धतीचे मियावाॕकी पद्धतीचे हे घनवन उभारण्यात आले. ग्राईंड मास्टर कंपनी , इकोसत्व ,जिल्हा परिषद ,वनखाते आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी या सर्व टीमच्या एकत्रित प्रयत्नाने *_अशक्य ते शक्य झाले आहे_* अगदी खडकाळ डोंगरावर भागामध्ये हे नंदनवन साकारलेले आहे .



झाडांची उंची सरासरी 16 ते 20 फुटाच्या दरम्यान झालेली आहे माझी एकूण सेवा काळातील हा सर्वात अनमोल क्षण माझ्या जीवनासाठी आहे .

    700 झाडांची यशस्वी लागवड होऊन त्यांचे  जतन करता आले हे माझ्यासाठी निसर्ग सेवेची एक  मोठी संधी मिळालेली आहे. जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी आदरणीय श्रीमती जयश्री चव्हाण मॅडम यांच्या हस्ते 29 ऑगस्ट 2020 रोजी हे घनवन लागवड झालेले आज असे काही बहरुन आलेले आहे.


   *प्रकाशसिंग राजपूत व दिलीप आढे*

        सहशिक्षक 

जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी 

 📲 9960878457

हरित शाळा अभियान गीत....








नवोदय निकाल 2022 #navodayresult

नवोदय विद्यालय निकाल पहाण्यासाठी खालील दिलेल्या चित्रावर अथवा Result Tab वर क्लिक करा.







मिशन झिरो ड्राॕप चे प्रपत्रक

  मिशन झिरो ड्राॕप चे प्रपत्रकअ, ब, क, ड व गोषवारा प्रपत्र डाऊनलोड करा...

https://drive.google.com/file/d/12Y9xhm4VEnuBQRFODvMneN-SPKBzgWPX/view?usp=drivesdk


दि.07/07/2022 गावस्तर समिती बैठक

मुख्याध्यापक यांनी गावस्तर समितीतील सदस्यांसोबतच सर्व व्यवस्थापनाच्या शाळा जिल्हा परिषद/खाजगी) यांचे मुख्याध्यापक, सर्व कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये अध्यापक (पदविका विद्यालय (डी.टी.एड. कॉलेज), अध्यापक महाविद्यालय (बी. एड. कॉलेज), MSW महाविद्यालयाचे प्राचार्य यांची बैठक आयोजित करावी व बार्ड प्रभाग निहाय/ बस्ती वाड्या/ तांडे इ. ठिकाणी मिशन झिरो ड्रॉपआऊट राबविण्याबाबत नियोजन.


दि. 08/07/2022 रोजी

. गावस्तरावर मिशन झिरो ड्रॉपआऊट बाबत प्रभातफेरी आयोजन, ढोलताशांच्या गजरात दिंडी, दवंडी, ग्रामसभा, ध्वनिक्षेपक यंत्रणा, सार्वजनिक ठिकाणी चौकात जनप्रबोधन / जनजागृतीचे करणे, पथनाटय आयोजित करणे.


दि.  09/07/2022 ते 17/07/2022


. गाव/ शाळास्तरावर केलेल्या नियोजनाप्रमाणे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस,डी. एड. चे विद्यार्थी,बी एड. ग्रामसेवक, तलाठी, पदवीधर / पदव्युत्तर, डी. टी. MSW चे विद्यर्थी यांचे मार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे


18/07/2022


● गावस्तरावर शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांची यादी संकलीत करुन


शाळानिहाय जनरल रजिस्टर तसेच विद्यार्थी हजेरी पत्रक व गावपंजिका पडताळणी करुन अद्ययावत करणे.


• सर्वेक्षणाचा अहवाल शाळास्तरावर एकत्रित करणे. जर शाळाबाह्य, अनियमित व स्थलातरीत विद्यार्थी संख्या शुन्य असल्यास मुख्याध्यापक यांचे प्रमाणपत्र घेणे, • तसंच सर्वेक्षणाचा अहवाल केंद्रस्तरावर जमा करणे.


दि. 19/07/2022  सर्वेक्षणाचा अहवाल तालुकास्तरावर सादर करणे.


20/07/2022

 सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हास्तरावर सादर करणे.

भरती/ आरक्षण / अनुशेष बाबतचे विवरणपत्र प्रसिद्धीबाबत आदेश

 

सरळसेवा भरती/ आरक्षण / अनुशेष

बाबतचे विवरणपत्र कार्यालयाच्या

सूचना फलकावर लावणेबाबत.

सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व संवर्गातील पदभरतीबाबतचे वार्षिक विवरणपत्र कार्यालयाच्या सूचना फलकावर वेळोवेळी लावण्याबाबतच्या सूचना सामान्य प्रशासन विभाग/ १६-ब यांच्या दि.८.१.२००३ च्या संदर्भीय परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत. तथापि, सदर विवरणपत्र कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे असे कालच्या परिपत्रकात म्हटलेले आहे.

या जिल्ह्यातील शिक्षक बदली संदर्भात कोर्टात ... सविस्तर वाचा...

२. सर्व नियुक्ती प्राधिकारी/ आस्थापना अधिकारी यांना कळविण्यात आले आहे की, सरळसेवा भरतीसाठी दि. ६.७.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या बिंदू नामावलीनुसार प्रत्येक संवर्गातील सरळसेवेची मंजूर पदे, कार्यरत पदे रिक्त पदे, अनुशेषाची पदे तसेच मागणी केलेली पदे याबाबतची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार वेळोवेळी सूचना फलकावर लावावी.अशा सुचना करण्यात आलेल्या आहेत.

शासन आदेश पहा....