डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

अवघड क्षेत्रातील जोखीम असलेली सेवा...

 महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षांपासून दुर्गम व कठीण भागातील अर्थात अवघड क्षेत्रातील सेवा करणाऱ्या शिक्षकांना २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन आदेशाने खरा न्याय मिळाला.  मात्र गेल्या २ वर्षापासून बदल्या न झाल्याने अवघड क्षेत्रात ५ वर्ष सेवा करण्याची मजबुरी या शिक्षकांवर आलेली आहे.





          निकषात वेळोवेळी बदल होत अवघड संकल्पना जरी बदलण्याचा प्रयत्न  होत असला तरी वास्तव जी भौगोलिक परिस्थिती आहे तीच सर्वाधिक परिणाम या अवघड क्षेत्रावर करत असते. ना तर राष्ट्रीय महार्मागापासूनचे अंतर ना तर फोन लागतो की नाही....

    माझी २०१८ पासून या क्षेत्रात बदली असून सतत अशा परिस्थितीत सेवा बजावतांना अनेक गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो. काल झालेला परिणाम आपण फोटोत पाहू शकता हे काही पहिल्यांदा नाही गेल्या वर्षी ३ वेळेस असच काही झाले. 2 D मध्ये जग कसे दिसते हे लक्षात येथे व 3 D न पाहू शकत असल्याने टु व्हिलर वर घरी येतांना रस्त्यावरील चढ उतार व गड्डे ही लवकर न दिसल्याने सर्वांधिक जोखीम हीच म्हणावी लागेल. या भागात येत असतांना अनेकदा मधमाशी चावा घेतात. मधमाशींचा होणारा हा त्रास २ -३ दिवस फारच कष्टदायी होतो. या व्यतिरिक्त  पक्के रस्ते नसल्याने अरुंद केवळ ६ फुटाच्या वाटेवर वाहन चालवितांना दोन्ही बाजूने २ फुट उंचीचे गवत असल्याने अचानक वाहनापुढे किंग कोबरा  ते ही अगदी ६ -७ फुटाचे लांबी असलेले हे तर अंगावर शहारे आणून सोडतात ५-६ वेळा अगदी गाडीसमोर आडवे तर एकवेळेस पायाजवळ अगदी दिड फुटावर की ज्याने उसळी घेतलीच होती केवळ नशीब बलवत्तर म्हणून काही अनुचित घडले नाही. 

     सततचा खडकाळ मार्ग व तिन्ही ऋतूचा भडीमार या परिस्थितीला अतिशय बिकट बनवतात.अवघड  परिस्थितीत शिक्षण गंगा पोहचविणाऱ्या माझ्या तमाम शिक्षक बांधवांना मानाचा मुजरा....   शासन , संघटना व प्रशासन या सर्वांनी अवघड क्षेत्राचा सकारात्मक विचार करावा हीच माफक अपेक्षा ....


      प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 

            सहशिक्षक 

जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी 

 कें करमाड, ता / जि . औरंगाबाद

    9960878457



Cbse निकाल पहा...

 CBSE 10वी 12वी निकालाची तारीख कधीही जाहीर होऊ शकते.


कधी लागणार निकाल?

परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, तो cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. 

येथे उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात आणि एकूण 30 टक्के गुण आवश्यक आहेत. मात्र, एक-दोन विषयांत कमी गुण मिळाल्यास निराश होऊ नका, अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे कंपार्टमेंट पेपरचे आयोजन केले जाते. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत 21 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. CBSE लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म 2 परीक्षांचे निकाल जाहीर करणार आहे. दोन्ही वर्गांचे निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर होतील अशी अपेक्षा आहे.



एसएमएसद्वारे निकाल पाहता येईल
विद्यार्थी त्यांचे CBSE निकाल 2022 10वी आणि 12वीचे निकाल एसएमएसद्वारे देखील मिळवू शकतात. यासाठी तुमचा इयत्ता 10वी किंवा 12वीचा रोल नंबर टाका आणि हा एसएमएस 7738299899 वर पाठवा. 


कोणत्या माध्यमातून तुम्ही निकाल तपासू शकता

CBSE निकाल 2022 जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in आणि cbseresults.nic.in व्यतिरिक्त, विद्यार्थी UMANG अॅप, डिजीलॉकर आणि एसएमएसद्वारे देखील तपासू शकतात.

असा पहाल निकाल

-विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत साइट cbse.gov.in, cbresults.nic.in ला भेट देऊ शकतात.
-यानंतर CBSE 10वी/12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
-आता तुमचा नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक टाका.
-यानंतर 10वी आणि 12वी 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
-विद्यार्थ्यांना यानंतर त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करायचे आहेत.
-शेवटी निकालाची प्रिंट काढा.


आंतरजिल्हा बदली टप्पा २ असा होणार...

तुमच्या वाहनावर कुठला चालान आहे का?

 आज डिजिटल तंत्रज्ञान इतके विकसित झालेले असून यामुळे अनेक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत.

वाहन दंड संहिता या क्षेत्रात अग्रेसर असून आज पावती न फाडता त्या दंडाचे ई चालान पोलीस यंत्रणेकडून वाहन चालकास आकारल्या जात असून आता कित्येकदा आपणांस याविषयी कल्पना ही राहत नाही.


 

जेव्हा याबाबतीत नोटीस प्राप्त होते तेव्हा नक्कीच या कायदेशीर बाबींचा मनस्ताप अनेकांना होतो.

आपल्या वाहनांवर ई चालान आहे का? कसे पहायचे

याबाबतीत एक वेबसाईट असून आपण यावर आपल्या वाहनांवर ई चालान आहे का ? ते पाहू शकणार आहे. याच बरोबर अनेक RTO वाहन माहितीचे ॲण्ड्राईड अॕप ही आहेत त्यावरून सुद्धा आपण ई चालान पाहू शकता.

या वेबसाईटवर गेल्यावर आपणांस खालील पेज दिसेल



१) यावर आपणांस आपल्या वाहनाचा क्रमांक अचूक टाकायचा आहे.
२) त्यानंतर आपल्या वाहनाचे चेसिंस क्रमांक किंवा इंजिन क्रमांक या दोन्ही पैकी एक शेवटचे ४ अंक येथे टाकायचे आहे. 

जर आपल्या वाहनांवर कुठलाही ई चालान असेल तर आपणांस तात्काळ दिसून येईल. व आपण लगेचच त्यास भरून कायदेशीर बाबी पासून सुटका मिळवू शकता.

   लेखन
प्रकाशसिंग राजपूत 
   (समूहनिर्माता)
डिजिटल समूह महाराष्ट्र 

लेख आवडल्यास माहितीस्तव आपल्या मित्रांना शेअर करा...

टप्पा क्र २

टप्पा क्र २ सविस्तर पहा....

चॕनलला सबस्क्राईब अवश्य करा... 





आॕनलाईन बदली टप्पा २

 शिक्षक आॕनलाईन बदली प्रक्रियेचा टप्पा क्र २

 आंतरजिल्हा बदली कशी होणार हे पहा...


चॕनलला सबस्क्राईब अवश्य करा....


click here




जीएसटी मुळे शैक्षणिक वस्तू महागणार...

 शैक्षणिक वस्तू महागणार

मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे,. त्याशिवाय एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे.


या वस्तुही महागणार....

पाकिट बंद आणि लेबल असलेल्या खाद्य  पदार्थावर जीएसटी लागू करण्यात आला आहे. 

यामध्ये मासे, टेट्रा पॅकमधील दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार आदी पदार्थांसह मुरमुरेंवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंत हे पदार्थ जीएसटीबाहेर होते. 

बॕकेकडून जारी करण्यात येणाऱ्या धनादेश सेवांवर 18 टक्के आणि एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. एक हजार रुपयांपेक्षा प्रति दिवस भाडे असणाऱ्या हॉटेल रुम्सवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. एलईडी लाइट्स आणि लॅम्पच्या किंमतीदेखील वाढवण्याची शक्यता आहे. सरकारने या वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्यांहून 18 टक्क्यांवर केली आहे.

सायकल पंप, टर्बाइन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता 18 टक्के टॅक्स आकारला जाणार आहे. तसेच बियाणे साफ करण्यासाठी आणि वर्गीकरण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मशीनवर 18 टक्के कर आकारण्यात येणार आहे. सोलर वॉटर हिटर्सवरही 12 टक्के GST आकारण्यात येणार आहे. याआधी पाच टक्के जीएसटी आकारण्यात येत होता.


आरोग्यसेवा महागणार

रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी  5 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्याशिवाय, जैव-वैद्यकीय कचऱ्यावर  प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या सुविधेवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या जीएसटी विरोधात केंद्र सरकारला पत्र लिहीले आहे. हा जीएसटी तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.






बदली बाबत नविन अपडेट पहा...

 बदली संदर्भात १५ जुलैचे पत्रक


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे.

 सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत बदलीस पात्र असलेल्या/ विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी. निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे. इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.


 तथापि, काही जिल्हा परिषदांकडून प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या यादीमध्ये शिक्षकांचे आडनाव नमूद नसल्याची बाब Vinsys IT Services (I) Pvt. Ltd यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. (प्रत सोबत)



२. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत धोरणातील तरतूदीनुसार एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास व त्यांची सेवाजेष्ठता, तसेच जन्मदिनांकही एकच असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनांव प्रथम येईल, अशा शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात येणार आहे. 

त्यामुळे ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रीयेसाठी शिक्षकांचे आडनांव नमूद असणे आवश्यक आहे. सबब, सदर प्रणालीमध्ये आडनांव नमूद न केलेल्या सर्व शिक्षकांना त्यांची आडनांवे (आधार कार्ड, पॅन कार्ड, इ. मध्ये नमूद केल्याप्रमाणे) प्राथम्याने नमूद करण्याबाबत कळविण्यात यावे व त्याप्रमाणे प्राथम्याने दुरुस्ती करुन घ्यावी, 

कर्मचारी मुख्यालयबाबत महत्त्वाची बातमी

सदर प्रणालीमध्ये आडनांवे नमूद न करणान्या शिक्षकांना बदलीसाठी इंग्रजी अद्याक्षराप्रमाणे आडनांवानुसार प्राधान्यक्रम मिळाला नाही तर, त्यास संबंधित शिक्षक जबाबदार राहतील, ही बाब देखील त्यांच्या निदर्शनास आणावी, ही विनंती करण्यात आलेली आहे.