बदली संदर्भात १५ जुलैचे पत्रक
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे.
सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत बदलीस पात्र असलेल्या/ विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी. निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे. इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.
तथापि, काही जिल्हा परिषदांकडून प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या यादीमध्ये शिक्षकांचे आडनाव नमूद नसल्याची बाब Vinsys IT Services (I) Pvt. Ltd यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. (प्रत सोबत)
२. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत धोरणातील तरतूदीनुसार एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास व त्यांची सेवाजेष्ठता, तसेच जन्मदिनांकही एकच असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनांव प्रथम येईल, अशा शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात येणार आहे.
त्यामुळे ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रीयेसाठी शिक्षकांचे आडनांव नमूद असणे आवश्यक आहे. सबब, सदर प्रणालीमध्ये आडनांव नमूद न केलेल्या सर्व शिक्षकांना त्यांची आडनांवे (आधार कार्ड, पॅन कार्ड, इ. मध्ये नमूद केल्याप्रमाणे) प्राथम्याने नमूद करण्याबाबत कळविण्यात यावे व त्याप्रमाणे प्राथम्याने दुरुस्ती करुन घ्यावी,
कर्मचारी मुख्यालयबाबत महत्त्वाची बातमी
सदर प्रणालीमध्ये आडनांवे नमूद न करणान्या शिक्षकांना बदलीसाठी इंग्रजी अद्याक्षराप्रमाणे आडनांवानुसार प्राधान्यक्रम मिळाला नाही तर, त्यास संबंधित शिक्षक जबाबदार राहतील, ही बाब देखील त्यांच्या निदर्शनास आणावी, ही विनंती करण्यात आलेली आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा