आज डिजिटल तंत्रज्ञान इतके विकसित झालेले असून यामुळे अनेक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत.
वाहन दंड संहिता या क्षेत्रात अग्रेसर असून आज पावती न फाडता त्या दंडाचे ई चालान पोलीस यंत्रणेकडून वाहन चालकास आकारल्या जात असून आता कित्येकदा आपणांस याविषयी कल्पना ही राहत नाही.
जेव्हा याबाबतीत नोटीस प्राप्त होते तेव्हा नक्कीच या कायदेशीर बाबींचा मनस्ताप अनेकांना होतो.
आपल्या वाहनांवर ई चालान आहे का? कसे पहायचे
याबाबतीत एक वेबसाईट असून आपण यावर आपल्या वाहनांवर ई चालान आहे का ? ते पाहू शकणार आहे. याच बरोबर अनेक RTO वाहन माहितीचे ॲण्ड्राईड अॕप ही आहेत त्यावरून सुद्धा आपण ई चालान पाहू शकता.
या वेबसाईटवर गेल्यावर आपणांस खालील पेज दिसेल
१) यावर आपणांस आपल्या वाहनाचा क्रमांक अचूक टाकायचा आहे.
२) त्यानंतर आपल्या वाहनाचे चेसिंस क्रमांक किंवा इंजिन क्रमांक या दोन्ही पैकी एक शेवटचे ४ अंक येथे टाकायचे आहे.
जर आपल्या वाहनांवर कुठलाही ई चालान असेल तर आपणांस तात्काळ दिसून येईल. व आपण लगेचच त्यास भरून कायदेशीर बाबी पासून सुटका मिळवू शकता.
लेखन
प्रकाशसिंग राजपूत
(समूहनिर्माता)
डिजिटल समूह महाराष्ट्र
लेख आवडल्यास माहितीस्तव आपल्या मित्रांना शेअर करा...
आणि जर चूक नसतानाही challan मिळाले असेल तर काय करावे ? मी शहरात बघितले की चूक नसताना ट्रॅफिक पोलिस वाहन पुढे गेले की फोटो घेतात आणि challan करतात.
उत्तर द्याहटवामाझी काहीही चूक नसताना मला e challan मिळाले होते.नको कटकट म्हणून मी ऑनलाईन भरून टाकले.
उत्तर द्याहटवाचुकीचे चालान असेल तर त्या विरुद्ध दाद मागता येते.
उत्तर द्याहटवा