डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बदली अर्ज भरण्यासाठी उपयुक्त माहिती

 *संवर्ग-1  मधील शिक्षकांनी फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी*



➡️ *21/12/2022 ते 24/12/2022*

*वरील चार दिवसांच्या कालावधीमध्ये संवर्ग-1 शिक्षक प्राधान्यक्रम भरू शकतात.*

➡️ *विशेष संवर्ग भाग एकचे शिक्षक खालील लिंकला क्लिक करून आपला मोबाईल नंबर व मोबाईल नंबर वर येणारा ओटीपी व कॅपच्या टाकून पोर्टल लॉगिन करू शकता*


https://ott.mahardd.in/


➡️ *विशेष संवर्ग-1 मधील शिक्षकाला बदली करायची असेल तर त्यांना किमान 1 शाळेचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल आणि जास्तीत जास्त 30 शाळांचा प्राधान्यक्रम देऊ शकतात.* 


➡️ *जर संवर्ग 1 ज्या शिक्षकांनी  कोणताही प्राधान्यक्रम दिला नाही तर त्यांना फॉर्म सबमिट करता येणार नाही*


➡️ *संवर्ग-1 साठी पसंतीक्रम अनिवार्य नाही जर त्यांनी पसंतीक्रम भरला नाही तर त्यांची संवर्ग-1 मध्ये बदली होणार नाही,*


*तरीसुद्धा बदलीसाठी होकार दिल्यानंतरही बदली नको असेल तर आपल्या प्राधान्यक्रमामध्ये आपल्याला न मिळणारे एक गाव प्राधान्यक्रम टाकून सबमिट केल्यास निश्चितच आपली बदली होणार नाही* 


➡️ *विशेष संवर्ग भाग मधील येणारे शिक्षक  जर बदली पात्र शिक्षक यादीमध्ये असतील व त्यांनी बदलीसाठी होकार दिलेला असेल तर त्यांची बदली निश्चित होईल म्हणजेच ते आहेत त्या शाळेवर राहणार नाही*


*त्यामुळे विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांचे नाव जर बदली पात्र यादीमध्ये येत असेल तर त्यांची बदली निश्चित होईल त्यामुळे त्यांनी पसंती क्रम भरताना जास्तीत जास्त शाळांचा पसंती क्रम भरावा जेणेकरून यास बदली प्रक्रियेमध्ये आपणास शाळा मिळेल अन्यथा आपण विस्थापित होऊ शकता*


➡️ *विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षक जर बदली पात्र शिक्षक असतील आणि त्यांना संवर्ग एक च्या बदली प्रक्रियेमध्ये शाळा मिळत नसते तर त्यांना शाळेवर पाच वर्ष व त्या क्षेत्रामध्ये दहा वर्ष झाल्यामुळे ते बदली पात्र आहेत त्यामुळे ते बदली पात्रच्या बदली प्रक्रियेमध्ये बदली अर्ज भरू शकतात*


➡️ *शिक्षक आपला प्राधान्यक्रम जतन (Save) करू शकतात परंतु सबमिट करण्यास विसरू नका अन्यथा तुमचा फॉर्म बदली प्रणालीद्वारे विचारात घेतला जाणार नाही.* 


➡️ *एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर फॉर्ममध्ये कोणताही बदल शक्य होणार नाही.* 


➡️ *संवर्ग-1 चे शिक्षक फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा मागू शकतात त्यामुळे बदली पात्र यादीचा अभ्यास करून प्राधान्यक्रम भरवा* 


➡️ *संवर्ग-1 शिक्षक बदलीसाठी सध्या ज्या शाळेत आहे ती शाळा पसंतिक्रमात निवडू शकत नाहीत.* 


➡️ *विशेष संवर्ग भाग एक शिक्षकांनी यापूर्वीच पोर्टलवर बदली प्रक्रियेमधून सूट मिळवलेली असेल अर्थातच त्यांना बदली नको असेल असे नोंदवलेले आहे अशा शिक्षकांना या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची पोर्टलवर नोंद करण्याची गरज नाही*


➡️ *विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना दिनांक 21 डिसेंबर 2022 ते 24 डिसेंबर 2022 अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे वेळ गेल्यानंतर कोणतेही परिस्थितीत शिक्षक आपला प्राधान्यक्रम बदलू किंवा सबमिट करू शकणार नाही*


➡️ *संवर्ग-1 फॉर्म सबमिट करण्यापूर्वी शिक्षकांनी त्यांच्या पसंती क्रमाची पडताळणी करावी आणि त्यांनी भरलेला प्राधान्यक्रम योग्य असल्याची खात्री करावी.* 


➡️ *शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी 4 दिवसांचा अवधी असेल आणि त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी अडचण टाळण्यासाठी तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत उशीर करू नये,  आम्ही सर्व शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे प्राधान्यक्रम वेळेत भरावेत.* 


➡️ *पोर्टल वर वापरला जाणारा ओटीपी ईमेलवर आणि तसेच शिक्षकांच्या मोबाइलवर पाठवले जातात, जर तुमचा ओटीपी तुमच्या इनबॉक्समध्ये दिसत नसेल तर तुमचा जंक ईमेल तपासायला विसरू नका.* 


➡️ *तुमची  बदली तुमच्या हातात आहे योग्य वेळ द्या आणि संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या आणि त्यानंतरच तुमची प्राधान्यक्रम सबमिट करा घाईघाईने पुढे जाऊ नका आणि नंतर चुकांसाठी पश्चात्ताप करू नका. विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी पसंती क्रम भरताना विशेष संवर्ग भाग एकच्या यादीमधील आपला असलेला क्रमांक व बदलीपात्र यादीमध्ये उपलब्ध असलेल्या शाळा यांचा समन्वय साधून प्राधान्यक्रम भरावा जेणेकरून आपणास बदलीने शाळा मिळेल*




  

बदली वेळापत्रक सुधारित

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत दि 20/12/2022 चे पत्र  निर्गमीत करण्यात आले आहे. 

 प्रशासकीय कारणास्तव विशेष संवर्ग भाग-१ व २ च्या शिक्षकांच्या अर्जाची तपासणी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे संदर्भाधीन दिनांक २८.११.२०२२ च्या वेळापत्रकामध्ये अंशतः सुधारणा करुन शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात  आलेले  आहे.

राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करावयाच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे.






 बदली विशेस संवर्ग १ पसंतीक्रम 




बदली संदर्भात नविन व्हिडीओ

 जिल्हातंर्गत बदलीबाबत आजचा महत्त्वाचा व्हिडीओ विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासंदर्भात vinsys कडून मार्गदर्शक व्हिडीओ पहा....




 भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडूंसोबत भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी साधलेला हा संवाद व्हिडिओ स्वरूपामध्ये पाठवत आहे.

 विद्यार्थ्यांना हा माहितीपट म्हणून जर दाखवण्यात आला तर खेळाडूंचा विषयी त्यांच्या मनात निश्चित नवीन आदर निर्माण होणार आहे यासाठी खालील लिंक ला आपण व्हिडिओला क्लिक करायचं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून अंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलम्पिक मध्ये भारताचं नाव मोठं करणारे या खेळाडूंचा गौरव होईल आणि विद्यार्थ्यांना त्यांचा परिचय सुद्धा होईल.


व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा...

शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे

 

आरोग्य आणि शिक्षणासाठी 2021-22 यावर्षी देशभरातून केंद्र सरकारकडे 47 हजार 307.70 करोड इतका उपकर जमा झालेला आहे. 

यासंदर्भात शिक्षण क्षेत्र आणि राजकीय पक्षांनी सरकारला जाब विचारला आहे की, अब्जावधी रुपये शासनाकडे जमा होऊन सुद्धा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार खर्च करत नाही.



मात्र शिक्षण उपकर  हा केवळ शिक्षणाच्या कामासाठीच खर्च केला जाईल, अशी महत्वाची दुरुस्ती देखील केंद्र सरकारने  केली आहे.

राज्याच्या प्रत्येक व्यक्तीकडून दर दिवशी प्रवास असो कोणताही खर्च असो त्यामधून शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, रस्ते व सुविधेकरीता, शेती योजनांसाठी उपकर घेतला जातो. आणि हा उपकर जमा होऊन केंद्र शासनाकडे तो गोळा होतो. केंद्र सरकारने 25 दिवसांपूर्वी यामध्ये बदल करत शिक्षण उपकर हा केवळ शिक्षणाच्या कामासाठीच खर्च केला जाईल, अशी तरतूद केली.

शिक्षण उपकराद्वारे सरकारकडे अब्जावधी रुपये जमा होतात तरी नवीन शाळांना मूलभूत सुविधा व नवीन शिक्षक भरती सरकार करत नसल्याचा आरोप नेत्यांनी केलेला आहे.

शिक्षक परीक्षा बाबत...

जीएसटीमुळे शिक्षण उपकर कायदा रद्द :

महाराष्ट्र शासनाने शिक्षणाचा उपकर ज्याला सेस असे इंग्रजीमध्ये म्हणतात. तो आधी दोन टक्के व नंतर तीन टक्के असे वाढत वाढत गेल्यावर त्यानंतर 2018 ह्या वर्षी चार टक्के दराने राज्याच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी या उपकरात बदल केला गेला. मात्र जीएसटी कायदा आला आणि राज्यांना शिक्षण उपकर गोळा करणे हा नियम बंद झाला. मात्र हा शिक्षण उपकर गोळा झाल्यानंतर शासन विविध व्यावसायिक कामांसाठी खर्च करत असल्यामुळे केंद्र शासनाने 25 दिवसांपूर्वी यामध्ये बदल करत शिक्षण उपकर हा केवळ शिक्षणाच्या कामासाठीच खर्च केला जाईल, अशी तरतूद केली.

 शिक्षण उपकर रोजगार हमी उपकर कायदा राज्यामध्ये 1962 पासून लागू झालेला होता.


शिक्षकांना शिकवू द्या ....

 २१ व्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात करुन देत असतांना एकीकडे आॕनलाईन कामांचा होत असलेला भडीमार फारच चिंतनीय आहे.

 जि.प.शिक्षकांची  हीच व्यथा खूपच सुरेख  पद्धतीने शाॕर्ट फिल्म स्वरूपात मांडली  ती माझे मित्र  व राष्ट्रीय पुरस्कार तथा ICT पुरस्कार विजेते खुर्शीद शेख सरांनीसर डिजिटल स्कूल गडचिरोली समूहाचे ते कृतिशील सदस्य आहेत याचा निश्चितच अभिमान आहे.


संकलन 

प्रकाशसिंग राजपूत 

समूहनिर्माता 

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 


शाॕर्ट फिल्म पहा ....👇