डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

१ जुलै पासून महागाई भत्ता वाढ | da hike |

 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै, २०२३ पासून सुधारणा करण्याबाबत (da hike)


राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ % वरुन ४६% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात

येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था

व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३११२३१६३३१६१७०५ असा आहे.

da hike


Sbi overdraft policy | fixed deposit |

 

मुदत ठेवी विरुद्ध ओव्हरड्राफ्ट overdraft against fixed deposit 

• OD सुविधा TDR/STDR/ eTDR/ eSTDR खाते असलेल्या व्यक्तींना त्याच्या/तिच्या नावावर उपलब्ध आहे आणि त्यांच्याकडे ऑपरेटिव्ह बचत/चालू खाते देखील आहे.

sbi overdraft


• कर्ज मर्यादा तुमच्या निवडलेल्या STDR/ eSTDR खात्याच्या दर्शनी मूल्याच्या 90% असेल.  तुमच्या निवडलेल्या TDR/ eTDR खात्याच्या दर्शनी मूल्याच्या 75% कर्ज मर्यादा असेल.

• FD विरुद्ध OD ची किमान रक्कम रु 5000/- आणि FD विरुद्ध OD ची कमाल मर्यादा रु 5.00 कोटी असेल.

• कर्जाचा कालावधी सुरक्षा म्हणून स्वीकारलेल्या संबंधित घरगुती STDR/eSTDR खात्याचा कालबाह्य कालावधी किंवा 5 वर्षे जो कमी आहे म्हणून निश्चित केला जाईल.

• कर्जाचा कालावधी सुरक्षा म्हणून स्वीकारलेल्या संबंधित घरगुती TDR/eTDR खात्याचा कालबाह्य कालावधी किंवा 3 वर्षे जो कमी आहे म्हणून निश्चित केला जाईल.

• OD खाते OD Tenor च्या समाप्तीपूर्वी किंवा त्यापूर्वी बंद केले जाणे आवश्यक आहे जे अयशस्वी झाल्यास बँक सुरक्षितता म्हणून ठेवलेले TDR/STDR/eTDR/eSTDR चे मुदतपूर्व पेमेंट करून कर्ज खाते बंद करेल.

• हे लक्षात घेण्यासारखे आहे की एनआरई/एफसीएनआर (बी) ठेवींच्या मुदतपूर्व काढण्याची सुविधा ठेवीदार/कर्जदार जेव्हा अशा ठेवींवर कर्ज घेते तेव्हा त्याला उपलब्ध होणार नाही.

ठेव खाते उघडण्याच्या वेळी दिलेला TDR/STDR/eTDR/eSTDR च्या रोलओव्हरसाठी तुमचा आदेश OD खाते कर्जाच्या कालावधीला किंवा त्यापूर्वी बंद न केल्यास रद्द मानले जाईल.

• टीडीआर/ई-टीडीआर विरुद्ध ओडीचा लाभ घेतल्यास, तुमच्या ठेव खात्यावर मासिक/त्रैमासिक/अर्धवार्षिक/वार्षिक व्याज पेआउट नव्याने उघडलेल्या ओडी खात्यात वळवले जाईल.  कोणत्याही विद्यमान कर्ज खात्यासाठी व्याज भरणे अनिवार्य असल्यास, OD सुविधा गृह शाखेद्वारे जमा खात्यात बदलल्याशिवाय उपलब्ध होणार नाही.

• या खात्यातून पैसे काढणे/हस्तांतरण करणे चेकबुकद्वारे केले जाऊ शकते (त्यासाठी विनंती तुम्हाला YONO/INB/शाखेद्वारे करणे आवश्यक आहे) किंवा YONO द्वारे व्यवहार अधिकार वापरून.

• OD a/c मध्ये क्रेडिट / ठेव कोणत्याही शाखेतून रोख ठेव किंवा कोणत्याही ठेव शाखेतून हस्तांतरित करून केली जाऊ शकते.

• मॅच्युरिटीवर किंवा टीडीआर/एसटीडीआर/ई-टीडीआर/ई-एसटीडीआरची मुदत संपल्यावर ओडी खाते बंद करणे गृह शाखेद्वारे केले जाईल.  OD खाते बंद करण्यासाठी कृपया तुमच्या गृह शाखेशी संपर्क साधा

• मॅच्युरिटीपूर्वी OD खाते बंद करणे: खाते बंद करणे तुमच्या विनंतीनुसार गृह शाखेद्वारे केले जाईल.

• फिक्स्ड डिपॉझिटवर ऑनलाइन ओव्हरड्राफ्ट सकाळी 8:00 AM IST ते 8:00 PM IST पर्यंत ऑनलाइन तयार केला जाऊ शकतो.  या कालावधीनंतर सुरू केलेल्या विनंत्या असतील

एकतर चेक बुकद्वारे (त्यासाठी विनंती YONO/INB/शाखेद्वारे करणे आवश्यक आहे) किंवा YONO द्वारे व्यवहार अधिकार वापरून केले जाऊ शकते.

• OD a/c मध्ये क्रेडिट / ठेव कोणत्याही शाखेतून रोख ठेव किंवा कोणत्याही ठेव शाखेतून हस्तांतरित करून केली जाऊ शकते.

• मॅच्युरिटीवर किंवा टीडीआर/एसटीडीआर/ई-टीडीआर/ई-एसटीडीआरची मुदत संपल्यावर ओडी खाते बंद करणे गृह शाखेद्वारे केले जाईल.  OD खाते बंद करण्यासाठी कृपया तुमच्या गृह शाखेशी संपर्क साधा

• मॅच्युरिटीपूर्वी OD खाते बंद करणे: खाते बंद करणे तुमच्या विनंतीनुसार गृह शाखेद्वारे केले जाईल.

• फिक्स्ड डिपॉझिटवर ऑनलाइन ओव्हरड्राफ्ट सकाळी 8:00 AM IST ते 8:00 PM IST पर्यंत ऑनलाइन तयार केला जाऊ शकतो.  या कालावधीनंतर सुरू केलेल्या विनंत्या पुढील उघडण्याच्या तासांसाठी शेड्यूल केल्या जातील.

• कर्ज हे बँकेने वेळोवेळी विहित केलेल्या इतर अटी व शर्तींच्या अधीन आहे.


नेता की एजन्ट यावरील व्यंगात्मक काव्य

आज जागोजागी या प्रवृत्तीचे दर्शन होते. नेतृत्व न करता स्वार्थापायी दलाली करण्यात मगन असतात. 



नेता की एजन्ट....



धगधगता ज्वाला असतो तोच खरा नेता,
एजन्ट तर ताटाखालचा मांजर , बनतो,


भीती न कुणाची न परवा परिणामाची,
धगधगता ज्वाला असतो तोच खरा नेता,
येथे तर चिंता पडते दुकानदारीची,
एजन्ट तर ताटाखालचा मांजर बनतो,


लढाऊबाणा शब्दात धार मोठी असते,
धगधगता ज्वाला असतो तोच खरा नेता,
चमचेगीरीची रोज शाईंनींग दिसते,
एजन्ट तर ताटाखालचा मांजर बनतो,


हुजुरगिरीस थारा नसतो शब्द न शब्द अंगार होतो,
धगधगता ज्वाला असतो तोच खरा नेता,
अपशब्द ही अमृताचा प्याला वाटतो....
एजन्ट तर ताटाखालचा मांजर बनतो,


अंततः सत्य कटु असते 🙏🏼


✒प्रकाशसिंग राजपूत✒
     छ. संभाजीनगर


 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन


 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचा निर्णय..!👈💠_ 

*चलो छत्रपती संभाजीनगर..👊..!*

👉3 डिसेंबर रविवार..2023..जिल्हा परिषद कार्यालय..!👈_

Dharne andolan



👉महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना आंदोलनाबाबतचे निवेदन सादर..!👈💠
_*

---------------------------------------------------------------

     छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांबरोबर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी आंदोलन...!!!

प्रमुख मागण्या ....

   *👉छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या शाळांवर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक यांच्या भेटी घेऊन संबंधित शिक्षकांची वैयक्तिक माहिती गोळा करण्याचे काम दिनांक 16 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2023 या कालावधीत करण्याचे नियोजन माननीय शिक्षणाधिकारी साहेब प्राथमिक यांच्या आदेशाने नियोजन करण्यात आले आहे. ही बाब अतिशय खेदजनक आणि गंभीर आहे.*

   👉शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबतीत वारंवार वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी,काही सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते बांधव यांच्याकडून माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून शिक्षकांना वारंवार अपमानित करून समाजासमोर शिक्षकांची प्रतिष्ठा डागाळण्याचा हेतूपुरस्कर प्रयत्न केला जात आहे.काही दिवसांपूर्वी शिक्षिका भगिनीला भर चौकात ग्रामसभेत अपशब्द वापरून अपमानित केलेले आहे._

 👉इतर विभागाचे कर्मचारी यांना ही अट शिथिल आहे.

_मात्र शिक्षकांना बंधनकारक का ? याच मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.👆_

    शैक्षणिक वर्ष 2023 - 2024 मध्ये शासनाने गणवेश अनुदान वाटप केलेले आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावर करण्यात आली आहे. माननीय आमदार श्री.प्रशांत बंब साहेब यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील सर्व शाळांमधून माहिती मागून शिक्षकांना जाणीवपूर्वक भेटीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा प्रशासनाने पुढील वर्षी शालेय गणवेश अनुदान मुख्याध्यापकांना न देता जिल्हा प्रशासनाने एजन्सी मार्फत विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावे. जेणेकरून शिक्षकांना वेठीस धरले जाणार नाही. या मानसिक जाचातून सुटका होईल.जी माहिती माननीय आमदार श्री. प्रशांत बंब साहेब यांनी मागितली आहे.त्यांना दिल्या जाणाऱ्या माहितीचा खर्च शाळेला मिळावा. सन 2022 च्या जिल्हा अंतर्गत ऑनलाइन बदल्या मे 2023 मध्ये झालेल्या आहेत.*

  *शिक्षकांच्या ऑनलाइन जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये माहे - जून 2023 ते नोव्हेंबर 2023 अखेर माननीय शिक्षणाधिकारी मॅडम   प्राथमिक विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी नियमबाह्य पद्धतीने बदली प्रक्रियेत स्वतः अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य बदल्या केलेल्या आहे. याची खातेनिहाय चौकशी व्हावी. दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही नम्र विनंती.*

   👆उपरोक्त मागण्यांसाठी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस माननीय श्री.राजेशजी सुर्वे सर ,यांनी निवेदनाद्वारे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद संभाजीनगर यांना आज दि.22/11/2023 रोजी पुनश्च एकदा कळविले आहे._


   *🔰👉करिता छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना आवाहन करण्यात येते की , प्राथमिक शिक्षकांवर होणाऱ्या अन्याय विरोधात रविवार दिनांक 3 डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी आंदोलनामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना करण्यात येत आहे.*

*करिता आंदोलनास मोठया संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.*

🙏

✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

आपला विश्वासु

 _राजेश सुर्वे_ 

 _सरचिटणीस_ 

 *_महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य_*

🔰🌀🔰🌀🔰🌀🔰🌀🔰🌀🔰🌀🔰

आंतरजिल्हा बदलीबाबत बिंदु नामावली अपलोड करण्याबाबत | inter district transfer

सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत

.


बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते मात्र रिक्त जागा
अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती, फक्त अशाच सन २०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक
शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्याच्या अनुषंगाने बिंदुनामावली बदली पोर्टल वर
अपलोड करण्यासाठी आज दुपारी १२.०० वा. पासून Vinsys IT Services (1) Pvt. Ltd, व्दारे पोर्टल उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. 

तरी सर्व जिल्हा परिषदांनी आपआपल्या जिल्ह्यातील बिंदुनामावली अपलोड करण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरु करावी. तसेच ज्या जिल्हा परिषदांनी बिंदुनामावली यापुर्वी अपलोड केली असेल त्यांनी पुन्हा अद्ययावत बिंदुनामावली अपलोड करण्याची कार्यवाही करावी.असे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना  आदेशीत करण्यात आलेले आहे.

मुळ आदेश पहा.... 


आंतरजिल्हा बदली





शाळांच्या वीज देयकाचा खर्च भागविण्यासाठी सादिल अनुदान मंजूर | GR |

 आर्थिक वर्ष २०२३२-४ करीता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या वीज देयकाचा खर्च भागविण्यासाठी सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

gr


प्रस्तावना:-

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळासाठी भौतिक, शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षाच्या वेतन खर्चाच्या ४ टक्केपर्यंत सादिलवार खर्च करण्यास संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच, सादिलवार खर्च करावयाच्या अनुज्ञेय बाबींच्या यादीमध्ये संदर्भ क्र. (२) व (३) येथील शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे.

२. संदर्भ क्र. (४) येथील परिपत्रकास अनुसरुन, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांच्या माहे मार्च २०२३ ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीतील थकीत वीज देयकाची रक्कम भागविण्यासाठी आर्थिक वर्ष २०२३-२४ करीता सादिल अनुदान वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय -:


सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांच्या माहे मार्च-२०२३ ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीतील थकीत वीज देयकाची रक्कम भागविण्यासाठी रु.६,७८,७३,३३३/- (रुपये सहा कोटी अठ्ठयाहत्तर लक्ष त्र्याहत्तर हजार तीनशे तेहतीस फक्त) इतका निधी "महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड" यांना मंजूर व अदा करण्यासाठी आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सुपूर्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच, याबाबतचे देयक कोषागारात सादर करण्यास "शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे" यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

२. सदर निधी ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आला आहे, त्याच प्रयोजनासाठी खर्ची टाकण्यात यावा. तसेच, सदर निधी वितरीत करण्यापूर्वी संबंधितांकडून वितरीत केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करावीत. शक्यतो यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरीत करण्यात येऊ नये.

३. उपरोक्त बाबीवर होणारा खर्च आर्थिक वर्ष २०२३-२४ करीता "मागणी क्र. ई-२, २२०२- सर्वसाधारण शिक्षण-०१-प्राथमिक शिक्षण १९६, जिल्हा परिषदांना सहाय्य (०१) प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांना सहाय्य (०१) (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८२ अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने (२२०२-०१७३) ३१, सहायक अनुदान (वेतनेतर)" या लेखाशिर्षाखाली मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

.४ सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भ क्र. (४) येथील दिनांक १२ एप्रिल, २०२३ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार व अटी शर्तीच्या पूर्ततेच्या अधीन निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२३११२२११५१००५३२१ असा आहे.






India vs Australia | live match on disney plus hotstar |

India  Vs Australia  आज रंगणार वर्ल्डकपचा महाअंतिम सामना; जाणून घ्या हायव्होल्टेज सामन्याची A टू Z माहिती live match on disney plus hotstar


🏏 एकदिवसीय विश्वचषक 2023 आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यात चुरशीची स्पर्धा होणार हे निश्चित आहे. त्यामुळे या सामन्याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात...

ind vs aus


🏟️ *कुठे रंगणार अंतिम सामना :* अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 


⏱️ *किती वाजता सामना रंगणार :* दुपारी 2 वाजता


📺 *कुठे पाहता येणार :* Star Sports Network


🤳 *मोबाईलवर कुठं पाहता येणार :* Disney+Hotstar


🎇 *1 वाजून 35 मिनिटांनी :* 10 मिनिटांचा एअर शो 


🎖️ *5 वाजून 30 मिनिटांनी :* वर्ल्ड कप जिंकणाऱ्या माजी कर्णधारांचा गौरव 


🎆 *8 वाजून 30 मिनिटांनी :* लाइट आणि लेझर शो होईल.


🏆 *सामना संपल्यानंतर :* जिंकणाऱ्या संघाला वर्ल्ड कप ट्रॉफी दिली जाईल. तसेच आकाशात 1200 ड्रोन स्टंट करणार आह. 

 Live match on disney plus hotstar 👇