महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचा निर्णय..!👈💠_
*चलो छत्रपती संभाजीनगर..👊..!*
👉3 डिसेंबर रविवार..2023..जिल्हा परिषद कार्यालय..!👈_
👉महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना आंदोलनाबाबतचे निवेदन सादर..!👈💠_*
---------------------------------------------------------------
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांबरोबर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी आंदोलन...!!!
प्रमुख मागण्या ....
*👉छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या शाळांवर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक यांच्या भेटी घेऊन संबंधित शिक्षकांची वैयक्तिक माहिती गोळा करण्याचे काम दिनांक 16 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2023 या कालावधीत करण्याचे नियोजन माननीय शिक्षणाधिकारी साहेब प्राथमिक यांच्या आदेशाने नियोजन करण्यात आले आहे. ही बाब अतिशय खेदजनक आणि गंभीर आहे.*
👉शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबतीत वारंवार वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी,काही सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते बांधव यांच्याकडून माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून शिक्षकांना वारंवार अपमानित करून समाजासमोर शिक्षकांची प्रतिष्ठा डागाळण्याचा हेतूपुरस्कर प्रयत्न केला जात आहे.काही दिवसांपूर्वी शिक्षिका भगिनीला भर चौकात ग्रामसभेत अपशब्द वापरून अपमानित केलेले आहे._
👉इतर विभागाचे कर्मचारी यांना ही अट शिथिल आहे.
_मात्र शिक्षकांना बंधनकारक का ? याच मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.👆_
शैक्षणिक वर्ष 2023 - 2024 मध्ये शासनाने गणवेश अनुदान वाटप केलेले आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावर करण्यात आली आहे. माननीय आमदार श्री.प्रशांत बंब साहेब यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील सर्व शाळांमधून माहिती मागून शिक्षकांना जाणीवपूर्वक भेटीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा प्रशासनाने पुढील वर्षी शालेय गणवेश अनुदान मुख्याध्यापकांना न देता जिल्हा प्रशासनाने एजन्सी मार्फत विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावे. जेणेकरून शिक्षकांना वेठीस धरले जाणार नाही. या मानसिक जाचातून सुटका होईल.जी माहिती माननीय आमदार श्री. प्रशांत बंब साहेब यांनी मागितली आहे.त्यांना दिल्या जाणाऱ्या माहितीचा खर्च शाळेला मिळावा. सन 2022 च्या जिल्हा अंतर्गत ऑनलाइन बदल्या मे 2023 मध्ये झालेल्या आहेत.*
*शिक्षकांच्या ऑनलाइन जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये माहे - जून 2023 ते नोव्हेंबर 2023 अखेर माननीय शिक्षणाधिकारी मॅडम प्राथमिक विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी नियमबाह्य पद्धतीने बदली प्रक्रियेत स्वतः अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य बदल्या केलेल्या आहे. याची खातेनिहाय चौकशी व्हावी. दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही नम्र विनंती.*
👆उपरोक्त मागण्यांसाठी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस माननीय श्री.राजेशजी सुर्वे सर ,यांनी निवेदनाद्वारे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद संभाजीनगर यांना आज दि.22/11/2023 रोजी पुनश्च एकदा कळविले आहे._
*🔰👉करिता छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना आवाहन करण्यात येते की , प्राथमिक शिक्षकांवर होणाऱ्या अन्याय विरोधात रविवार दिनांक 3 डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी आंदोलनामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना करण्यात येत आहे.*
*करिता आंदोलनास मोठया संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.*
🙏
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
आपला विश्वासु
_राजेश सुर्वे_
_सरचिटणीस_
*_महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य_*
🔰🌀🔰🌀🔰🌀🔰🌀🔰🌀🔰🌀🔰
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.