डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

नेता की एजन्ट यावरील व्यंगात्मक काव्य

आज जागोजागी या प्रवृत्तीचे दर्शन होते. नेतृत्व न करता स्वार्थापायी दलाली करण्यात मगन असतात. नेता की एजन्ट....धगधगता ज्वाला असतो तोच खरा नेता,
एजन्ट तर ताटाखालचा मांजर , बनतो,


भीती न कुणाची न परवा परिणामाची,
धगधगता ज्वाला असतो तोच खरा नेता,
येथे तर चिंता पडते दुकानदारीची,
एजन्ट तर ताटाखालचा मांजर बनतो,


लढाऊबाणा शब्दात धार मोठी असते,
धगधगता ज्वाला असतो तोच खरा नेता,
चमचेगीरीची रोज शाईंनींग दिसते,
एजन्ट तर ताटाखालचा मांजर बनतो,


हुजुरगिरीस थारा नसतो शब्द न शब्द अंगार होतो,
धगधगता ज्वाला असतो तोच खरा नेता,
अपशब्द ही अमृताचा प्याला वाटतो....
एजन्ट तर ताटाखालचा मांजर बनतो,


अंततः सत्य कटु असते 🙏🏼


✒प्रकाशसिंग राजपूत✒
     छ. संभाजीनगर