डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

Nps आंदोलन

 आम्ही संघर्ष पाहिला शिवरायांचा....*


*🎯आम्ही संघर्ष पाहिला बाबासाहेबांचा....*


*🎯आम्ही संघर्ष पाहिला आमच्या मायबाप शेतकर्‍यांचा...*


*🎯आम्ही संघर्ष पाहिला मृत कर्मचारी कुटुंबाचा...*


*_NPS च्या अंधकारास दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या पेन्शन जनक्रांती महामोर्चास सेवाग्राम येथून क्रांतीची मशाल पेटवून प्रारंभ झाला..._*



🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥



          आता वेळ आली आहे 2005 नंतरच्या बांधवांच्या संघर्ष इतिहासाची, या पेन्शन संघर्ष इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी व पेन्शन युद्धात आपला हक्काचा लढा अधिक बळकट करण्यासाठी या लढ्यात सहभागी व्हा._


     _आज लढलो नाही तर भविष्यात रडावे लागेल याची जाणीव ठेवा._

_आपल्या आदर्श व्यक्तीचे संघर्ष आठवा व त्यांचे स्मरण करून या लढ्यात पूर्ण ताकतीनिशी सहभागी व्हा....!_

_चला तर मग..._


_12 डिसेंबर 2023  रोजी नागपूर येथिल पेन्शन जनक्रांती महामोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा....!!!_


*_एकच मिशन....!_*

*_जुनी पेन्शन.....!!_*


        

_गोविंद उगले, राज्य सचिव_ 9730948981

*_महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना._*

केंद्रप्रमुख परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ ३/४

 नमस्कार मित्रांनो ,

     चला करूया स्पर्धा परीक्षेची तयारी अगदी शून्य अभ्यास असेल, तरीसुद्धा आपण या ठिकाणी सुरुवात करू शकता स्वतःसाठी नाही तर कमीत कमी आपल्या पाल्यासाठी किंवा आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक वेळ अवश्य अवलोकन करून संबंधित व्हिडिओ पहावयाचा आहे.जेणेकरून आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडेल आणि इतरांना देखील त्याचा फायदा होईल. इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंत सर्व सामान्य विज्ञान वर आधारित महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपणासमोर आम्ही घेऊन आलेलो आहोत.

      जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागातील भरती असेल किंवा आरोग्य विभागामधील भरती असेल तसेच मंत्रालयीन सहाय्यक व टंकलेखक या सर्व परीक्षेसाठी आपल्याला हे सामान्य ज्ञान नक्कीच कमी पडेल.यासाठी सर्वांनी खालील व्हिडिओ पहावयाचे आहेत. आपणास ते नवे असतील तर इतरांपर्यंत ते नक्कीच आपण पोहोचवतात यात शंका नाही.तसेच चॅनल आवडले तर लाईक करायचं आहे आणि नवनवीन व्हिडिओ साठी सबस्क्राईब देखील करून गरजू लोकांपर्यंत शेअर देखील करायचे आहे...

1.जीवशास्त्र यावरील सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित



2. भौतिकशास्त्र वरील सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित

https://youtu.be/Rc8QHRTrXsA

3.रसायनशास्त्र यावरील सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित

https://youtu.be/DlRyB3FHgwc

वरील सर्व व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तसेच इतरही विषयावरील असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणा करिता लवकरात लवकर उपलब्ध होतील, धन्यवाद

केंद्रप्रमुख परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ १ | rte 2009 |

केंद्रप्रमुख परीक्षा  तयारी करणाऱ्या सर्व परीक्षा त्यांनी संधी सोडू नका सर्वांनी पुढील नियोजनानुसार अभ्यास चालू ठेवा...


पुढील आठवड्या मधील आपल्या केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विस्तार अधिकारी भरती परीक्षेकरिता नियोजित तासिका*...

1. 9 डिसेंबर सकाळी सात वाजता... 1111

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 संपूर्ण स्पष्टीकरणासहित Rte 2009





केंद्रप्रमुख परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ २ रा | maharashtra rte act |kendrapramukh exam |

 

दहा डिसेंबर रोजी रविवार असल्याकारणाने दोन तास होतील.... 

दहा डिसेंबर संध्याकाळी सहा वाजता....

महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम





पुढील व्हिडीओ 👇

4. 11 डिसेंबर सकाळी सात वाजता

राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी

चॕनलला सब्सक्राईब अवश्य करा... 👇

https://bit.ly/4arBrVl

 

conclusion

१२ डिसेंबर सकाळी सात वाजता

*राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग तसेच राज्य बालहक्क संरक्षण आयोग 2005*

6. 13 डिसेंबर सकाळी सात वाजता

*विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना*

शिष्यवृत्ती परीक्षेला अंतिम मुदतवाढ

 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) फेब्रुवारी - 2024 आवेदन भरण्यास  मुदतवाढ....


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना दि. 01/09/2023 रोजी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 
सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०१ सप्टेंबर ते ०७
डिसेंबर, २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व नियमिती शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १५ डिसेंबर, २०२३ पर्यंत व्दितीय व अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.

आदेश पहा...👇

Scholarship


डिजिटल परिपाठ दिवस १२१ वा

 चला सोपा करूया परिपाठ

परिपाठ

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -

८ डिसेंबर २०२३

वार:शुक्रवार

तिथी:-कार्तिक कृ ११ शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-दक्षिणायण

ऋतू - शरद ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "



Today's almanac

 Date - 8 December 2023

          Friday

 Tithi-kartik kru 11 shak 1945

 Ayana-Dakshinayana

 Season:-Autumn season


"Jamadilawal"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

शुक्रवार, 08 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:00, 

खगोलीय दुपार: 12:30, 

सूर्यास्त: 18:01, 

दिवस कालावधी: 11:01, 

रात्र कालावधी: 12:59.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,

तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.


Good Thought

“Every journey begins with a single step.”

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

१९८५: सार्क परिषदेची स्थापना.


आजची म्हण

म्हणी व अर्थ

आधी शिदोरी मग जेजुरी – आधी जेवण केले कि मग देवाचे दर्शन घेणे.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

दोन अक्षरांचे माझे नाव

 डोके झाकणे माझे काम

:-टोपी

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

वडिलांना मदत

भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.


ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.


तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.

आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।

विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥प

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।

तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत.

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत.


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत मा. प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.०४.१२.२०२३ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषद यांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहे.

१. प्रत्येक जिल्ह्याला २ फाइल्स अद्ययावत करून पाठवायच्या आहेत. सदर फाईल्स व्हिन्सीस कंपनीकडून आपणास ईमेल वर पाठवलेल्या असून त्या अद्ययावत करून पाठवाव्या.

२. पहिल्या फाइल मध्ये जे शिक्षक २०१९ मध्ये रुजू झाले आहेत, अशा शिक्षकांची माहिती अद्ययावत करायची आहे.

३. दुसऱ्या फाइल मध्ये २०२२ मध्ये बदली झालेल्या सर्व शिक्षकांची माहिती असेल. त्या फाइलमध्ये २ कॉलम अद्ययावत करायचे आहेत.

(अ) Is Relieved - येथे yes किंवा no हे पर्याय भरायचे आहे. जर बदली शिक्षकाला त्या जिल्ह्यातून मुक्त केले असेल तर yes निवडा नाहीतर no निवडा.

(आ) Status - येथे ड्रॉपडाउन मध्ये ४ पर्याय दिले आहेत.

१. Relieved -जिल्ह्यातून मुक्त केले असेल तर निवडा.

२. Non relieved - जिल्ह्यातून मुक्त केले नसेल. संकलन-सतीश कोळी, शिक्षक समिती MSP

३. Rejected - शिक्षकाने बदली नाकारली असेल तर.

४. Court case - एखाद्या शिक्षकावर court case चालू असेल.

४. ईमेल मध्ये एक टेबल दिले आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्याने बिंदुनामावली मध्ये खुल्या वर्गातील (एकूण) रिक्त पदांची जी संख्या भरली आहे ती टेबल मध्ये नमूद करावी त्यातील खुल्या वर्गातील संख्या व EWS संवर्गातील संख्या वेगवेगळ्या नमूद कराव्यात.

वरीलप्रमाणे माहिती व्हिन्सीस कंपनीस तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

याबाबतचा आदेश पहा...


Inter district