उपशिक्षणाधिकारी पदोन्नती २०/१२/२०२३ GR
शालेय परिपाठ दिवस 131 वा | moral story | good thoughts|
चला सोपा करूया परिपाठ
*दिवस 131 वा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख -
२० डिसेंबर २०२३
वार:-बुधवार
तिथी:-मार्गशीर्ष शु ८ शके १९४५
शिवराज शक 350
अयन-दक्षिणायण
ऋतू - शरद ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "
Today's almanac
Date - 20 December 2023
Wednesday
Tithi-Margshirsh Shu 8 shak 1945
Ayana-Dakshinayana
Season:-Autumn season
"Jamadilakhar" month of Muslims
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
बुधवार, 20 डिसेंबर 2023
सूर्योदय 07:07,
खगोलीय दुपार: 12:36,
सूर्यास्त: 18:05,
दिवस कालावधी: 10:58,
रात्र कालावधी: 13:02.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुविचार
सहनशीलतेने क्रोधाला जिंकता येते.
Good Thought
Anger can be conquered by patience.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
दिनविशेष
१९५६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)
special day
1956: Death of Debuji Jhingraji Janorkar alias Sant Gadge Maharaj. (Born: 13 February 1876)
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
म्हणी/proverb
एका हाताने टाळी वाजत नाही.
It takes two to make quarrel.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
कोडे
मी खात पित नाही आणि पगार पण घेत नाही तरी सुद्धा तुमच्या घराला पहारा देतो, सांगा बर मी कोण?
⇒ उत्तर: कुलूप
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
गोष्ट
जेव्हा प्रतिकूल परिस्थिती दार ठोठावते
ही गोष्ट, वेगवेगळे लोक, प्रतिकूल परिस्थीशी कसा वेगवेगळ्या प्रकारे सामना करतात हे सांगते. आशाच्या वडिलांनी एक अंडे, एक बटाटा आणि काही चहाची पाने, वेगवेगळ्या भांड्यांमध्ये उकळत्या पाण्यात ठेवली. त्यांनी आशाला १० मिनिटांसाठी भांड्यांकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. १० मिनिटांनंतर त्यांनी आशाला अंडे आणि बटाट्याचे साल काढण्यास सांगितले आणि चहा गाळून घेण्यास सांगितले. आशा विचारात पडली. तिचे वडील म्हणाले," या तीनही गोष्टी एकाच परिस्थितीत होत्या, पण बघ प्रत्येकाने परिस्थितीला किती वेगवेगळा प्रतिसाद दिला! बटाटा आता मऊ आहे, अंडे टणक आहे आणि चहाने तर पाण्याचा रंगच बदलला. आपण पण ह्या तीनही गोष्टींसारखे आहोत. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते, आपण अगदी असाच प्रतिसाद देतो". आता मला सांग,"तू अंडे आहेस, बटाटा आहेस की चहाची पाने?" तात्पर्य: परिस्थितीशी कसा सामना करायचा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
सामान्य ज्ञान
०१) "जय जवान,जय किसान" ही घोषणा कोणी दिली ?
- लाल बहादूर शास्त्री.
०२) "जय जवान,जय किसान,जय विज्ञान" ही घोषणा कोणी दिली ?
- अटल बिहारी वाजपेयी.
०३) रौप्यमहोत्सव किती वर्षांनी साजरा करतात ?
- पंचवीस वर्ष.
०४) लीप वर्ष किती दिवसाचे असते ?
- ३६६ दिवस.
०५) उंटाच्या मादीला काय म्हणतात ?
- सांडणी.
General knowledge
01) Who gave the slogan "Jai Jawan, Jai Kisan"?
- Lal Bahadur Shastri.
02) Who gave the slogan "Jai Jawan, Jai Kisan, Jai Vigyan"?
- Atal Bihari Vajpayee.
03) Silver jubilee is celebrated after how many years?
- Twenty five years.
04) How many days is a leap year?
- 366 days.
05) What is a female camel called?
- A female camel is called a cow.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्लोक
क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् ।
क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम् ॥
:-प्रत्येक क्षण वाया न घालवता ज्ञान संपादन केले पाहिजे आणि त्यातील प्रत्येक क्षण वाचवून संपत्ती जमा करावी. क्षण वाया घालवणाऱ्याला ज्ञान कुठे आणि प्रत्येक कणाला वाया घालवणाऱ्याला संपत्ती कुठे?
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
प्रकाशन
प्रकाशसिंग राजपूत
छ. संभाजीनगर
शालेय परिपाठ दिवस 129 वा
चला सोपा करूया परिपाठ
*दिवस 129 वा*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख -
१८ डिसेंबर २०२३
वार:-सोमवार
तिथी:-मार्गशीर्ष शु ६ शके १९४५
शिवराज शक 350
अयन-दक्षिणायण
ऋतू - शरद ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "
Today's almanac
Date - 16 December 2023
Saturday
Tithi-Margshirsh Shu 4 shak 1945
Ayana-Dakshinayana
Season:-Autumn season
"Jamadilakhar" month of Muslims
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
सोमवार, 18 डिसेंबर 2023
सूर्योदय 07:06,
खगोलीय दुपार: 12:35,
सूर्यास्त: 18:04,
दिवस कालावधी: 10:58,
रात्र कालावधी: 13:02.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुविचार
"पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं, कानात गेलेलं विष शेकडो नाती बरबाद करतं."
Good Thought
Action is the foundational key to all success.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
दिनविशेष
१८५६: इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४०)
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
special day
1856: English physicist Sir J., winner of the 1907 Nobel Prize for the discovery of the electron. J. Birth of Thomson. (Died: 30 August 1940)
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
आजची म्हण
ज्याचे जळते त्यालाच कळते/जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे
:-The wearer best knows where the shoe pinches.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
कोडे
इंग्लिश मध्ये one पासून hundred पर्यंत A किती वेळा येतो?
=> उत्तर – एकदाही नाही
Riddle
How many times does A occur from one to hundred in English?
=> Answer – Not even once
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
बोधकथा
सुयांचे झाड
एकदा दोन भाऊ जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू, कपडे घेत असे. एकदा मोठा भाऊ जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत असताना तो एका जादुई झाडाजवळ पोहोचला. झाड त्याला म्हणाले,"महोदय, कृपा करून माझ्या फांद्या तोडू नका, जर तुम्ही मला सोडून दिले तर मी तुम्हाला सोन्याची सफरचंदे देईन" मोठा भाऊ तयार झाला, पण सफरचंदाची संख्या पाहून निराश झाला. लोभाने त्याचा ताबा घेतला आणि त्याने झाडाला धमकी दिली की, "जर मला जास्त सफरचंद मिळाली नाहीत तर खोड कापून टाकीन.” झाडाने सफरचंदे तर दिली नाहीतच पण त्याच्यावर शेकडो सुयांचा वर्षाव केला. मोठा भाऊ वेदनेने विव्हळत होता. सूर्य अस्तास निघाला होता. लहान भावाला काळजी वाटली, तो मोठ्या भावाच्या शोधात निघाला. शेकडो सुया शरीरात घुसलेल्या तो अवस्थेत सापडला. लहान भाऊ त्याच्या मोठया भावाकडे धावत गेला, आणि दुःखद अंतःकरणाने त्याने प्रत्येक सुई काढली. सुया काढून झाल्यावर मोठ्या भावाने वाईट वर्तणुकीबद्दल बद्दल त्याची माफी मागितली. आणि इथून पुढे चांगला वागीन असे वचनही दिले. झाडाने मोठ्या भावात झालेला बदल पाहून त्यांना भरपूर सोनेरी सफरचंदे दिली.
तात्पर्य : दयाळू आणि कृपाळू असणे महत्वाचे आहे कारण ते नेहमीच बक्षिसपात्र ठरते.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
सामान्य ज्ञान/General knowledge
1 गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?
:-सर आयझॅक न्यूटन
1 Who discovered gravity?
:-Sir Isaac Newton
2 घड्याळाचा मिनिट काटा किती मिनिटात एक फेरी पूर्ण करतो?
:-60 मिनिटात
2 In how many minutes does the minute hand of a clock complete one revolution?
:-In 60 minutes
3 पदार्थाच्या अवस्था किती आहेत व त्या कोणत्या?
:- पदार्थाच्या अवस्था तीन असतात:-स्थायू, द्रव आणि वायू.
3 How many states of matter are there and what are they?
:- There are three states of matter:-solid, liquid and gas.
4 ओझोन संरक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
:- 16 सप्टेंबर
4 Ozone Conservation Day is celebrated on which day?
:-16 September
5 सर्वात प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण करणारा शास्त्रज्ञ कोण?
:-कॅरोलस लिनीयस
5 Who was the first scientist to scientifically classify plants?
:-Carollus Linnaeus
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्लोक
उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा:।।
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Download navoday hall ticket | navoday exam |
नवोदय परीक्षा हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील टॅब वर क्लिक करायचे आहे.
रजिस्ट्रेशन नंबर व जन्मतारीख टाकून हॉल तिकीट डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे download navoday hall ticket
![]() |
नवोदय परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड... |
रजिस्ट्रेशन नंबर उपलब्ध नसल्यास खालील लिंक वर जाऊन तो नंबर आपणास उपलब्ध होऊ शकतो.
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ChildernPrint/findRegistrationno
शालेय परिपाठ दिवस 127 वा
चला सोपा करूया परिपाठ
*दिवस 127 वा*
![]() |
दि 16/12/2023 ला 11.00 वाजता |
*संकल्पना व लेखिका*
*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*
मोबाईल नंबर 9130958046
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख -
१५ डिसेंबर २०२३
वार:शुक्रवार
तिथी:-मार्गशीर्ष शु ३ शके १९४५
शिवराज शक 350
अयन-दक्षिणायण
ऋतू - शरद ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "
Today's almanac
Date - 15 December 2023
Friday
Tithi-Margshirsh Shu 3 shak 1945
Ayana-Dakshinayana
Season:-Autumn season
"Jamadilawal" month of Muslims
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
शुक्रवार, 15 डिसेंबर 2023
सूर्योदय 07:04, खगोलीय दुपार: 12:33, सूर्यास्त: 18:03, दिवस कालावधी: 10:59, रात्र कालावधी: 13:01.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुविचार
यशाचे शिखर गाठण्यासाठी वेळेचे नियोजन हवेच.
Good Thought
Try to be a rainbow in someone else’s cloud.” ~ Maya Angelou
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
दिनविशेष
१९९८: बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
आजची म्हण
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक फायदा होणे.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Today's idiom
Better late than never To do something rather than not doing Well, we thought it was better late than never, but where are the others?
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
आजचे कोडे
*कोडे*
असे काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलका आहे,
परंतु जगातील सर्वात बलवान माणूस देखील
त्याला जास्त काळ धरून शकत नाही?
=> उत्तर – श्वास
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*बोधकथा*
कासव आणि बेडूक
नदीकाठी गवतात काही बेडूक खेळून उड्या मारून स्वतःची करमणूक करत होते. ते पाहून तेथील कासवाला आपल्याला उड्या मारता येत नाहीत म्हणून वाईट वाटले. इतक्यात त्या बेडकांना नाचताना पाहून एक घार आकाशातून उतरली व तिने सर्व बेडकांना खाऊन टाकले. ते पाहून एक कासव इतर कासवांना म्हणाले, 'अंगात उडी मारण्याची शक्ती असल्याने मरण येण्यापेक्षा ती शक्ती नसलेली बरी.'
तात्पर्य
- देवाने जे गुण जन्मतःच दिलेले असतात तेच हितकारक असतात.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
सामान्य ज्ञान प्रश्न
1)इंग्रजी वर्णमालेतील 15 वे अक्षर कोणते?
उत्तर:-O
2)इंद्रधनुष्यातील सर्वात वरचा रंग कोणता आहे?
उत्तर :- लाल
3)टेलिफोनचा शोध कोणी लावला?
उत्तर: अलेक्झांडर ग्रॅहम बेल
4)सिम कार्डमधील “सिम” म्हणजे काय?
उत्तर: सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल
5)जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे?
उत्तरः एंजल फॉल्स
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्लोक
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
शालेय परिपाठ दिवस १२६ | school assembly |
चला सोपा करूया परिपाठ
दिवस 126 वा*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख -
१४ डिसेंबर २०२३
वार:गुरूवार
तिथी:-मार्गशीर्ष शु २ शके १९४५
शिवराज शक 350
अयन-दक्षिणायण
ऋतू - शरद ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "
Today's almanac
Date - 14 December 2023
Thursday
Tithi-Margshirsh Shu 2 shak 1945
Ayana-Dakshinayana
Season:-Autumn season
"Jamadilawal" month of Muslims
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
गुरुवार, 14 डिसेंबर 2023
सूर्योदय 07:03,
खगोलीय दुपार: 12:33,
सूर्यास्त: 18:03,
दिवस कालावधी: 11:00,
रात्र कालावधी: 13:00.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुविचार
कामात आनंद निर्माण केला की
त्याचं ओझं वाटत नाही.
Good thought
Do it now sometimes later becomes never.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
दिनविशेष
१९५३: भारतीय लॉनटेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*आजची म्हण व अर्थ*
"अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे!"
अर्थ:काम एकाचे आणि त्रास, दंड मात्र दुसऱ्याला.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Idiom
To break someone’s bubble
:-To do or say something that proves someone else’s beliefs are not true
:-He just broke my bubble when he said that he was a part of it.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*आजचे कोडे*
12 जण जेवायला आणि 3 जण वाढायला.
एक पळू पळू वाढतो.
दुसरा हळू हळू वाढतो.
तिसरा घंटा झाल्या शिवाय हालतच नाही!
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर:-घड्याळातळे 12 अंक आणि सेकंद काटा,मिनिट काटा आणि तास काटा.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*सामान्य ज्ञान प्रश्न*
1)भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर: इंदिरा गांधी
2)भारतात किती राज्ये आहेत?
उत्तर: 28 राज्ये
3)भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर: 8 केंद्रशासित प्रदेश
4)भारताचा पहिला नागरिक कोण आहे?
उत्तर: भारताचे राष्ट्रपती
5.गावाचा प्रथम नागरिक कोण असतो?
उत्तर: गावाचे सरपंच
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*बोधकथा*
एकदा एक लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय हवं आहे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुर्हाडीला दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल.’ ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, ‘मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तेथे दुसर्याला नावं ठेवायला जागा नाही.’
तात्पर्य
– एखाद्याला मदत केल्याने स्वतःचाच विनाश होत असेल तर अशी मदत न करणे हेच शहाणपणाचे आहे.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्लोक
श्लोक
सदा सर्वदा योग तुझा घडावा।
तुझे कारणी देह माझा पडावा।।
उपेक्षु नको गुणवंता अनंता।
रघु नायका मागणे हेची आता।।
केंद्रप्रमुख परीक्षा व्हिडीओ ३ व ४
केंद्रप्रमुख परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ
आपल्या YouTube चॕनल @prayagainstitute ( www.youtube.com/c/Prayagainstitute )
पेपर एक आणि पेपर दोन बद्दल सविस्तर माहिती दररोज अगदी मोफत 👍👍
ही संधी दिल्या बद्दल समूहनिर्माता प्रकाशसिंग राजपूत व मुख्यप्रशासक श्रीमती लीना वैदयमॕडम यांचे आभार...
आजचे व्हिडिओ👍👍