चला सोपा करूया परिपाठ
*दिवस 131 वा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख -
२० डिसेंबर २०२३
वार:-बुधवार
तिथी:-मार्गशीर्ष शु ८ शके १९४५
शिवराज शक 350
अयन-दक्षिणायण
ऋतू - शरद ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "
Today's almanac
Date - 20 December 2023
Wednesday
Tithi-Margshirsh Shu 8 shak 1945
Ayana-Dakshinayana
Season:-Autumn season
"Jamadilakhar" month of Muslims
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
बुधवार, 20 डिसेंबर 2023
सूर्योदय 07:07,
खगोलीय दुपार: 12:36,
सूर्यास्त: 18:05,
दिवस कालावधी: 10:58,
रात्र कालावधी: 13:02.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुविचार
सहनशीलतेने क्रोधाला जिंकता येते.
Good Thought
Anger can be conquered by patience.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
दिनविशेष
१९५६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)
special day
1956: Death of Debuji Jhingraji Janorkar alias Sant Gadge Maharaj. (Born: 13 February 1876)
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
म्हणी/proverb
एका हाताने टाळी वाजत नाही.
It takes two to make quarrel.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
कोडे
मी खात पित नाही आणि पगार पण घेत नाही तरी सुद्धा तुमच्या घराला पहारा देतो, सांगा बर मी कोण?
⇒ उत्तर: कुलूप
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
गोष्ट
जेव्हा प्रतिकूल परिस्थिती दार ठोठावते
ही गोष्ट, वेगवेगळे लोक, प्रतिकूल परिस्थीशी कसा वेगवेगळ्या प्रकारे सामना करतात हे सांगते. आशाच्या वडिलांनी एक अंडे, एक बटाटा आणि काही चहाची पाने, वेगवेगळ्या भांड्यांमध्ये उकळत्या पाण्यात ठेवली. त्यांनी आशाला १० मिनिटांसाठी भांड्यांकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. १० मिनिटांनंतर त्यांनी आशाला अंडे आणि बटाट्याचे साल काढण्यास सांगितले आणि चहा गाळून घेण्यास सांगितले. आशा विचारात पडली. तिचे वडील म्हणाले," या तीनही गोष्टी एकाच परिस्थितीत होत्या, पण बघ प्रत्येकाने परिस्थितीला किती वेगवेगळा प्रतिसाद दिला! बटाटा आता मऊ आहे, अंडे टणक आहे आणि चहाने तर पाण्याचा रंगच बदलला. आपण पण ह्या तीनही गोष्टींसारखे आहोत. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते, आपण अगदी असाच प्रतिसाद देतो". आता मला सांग,"तू अंडे आहेस, बटाटा आहेस की चहाची पाने?" तात्पर्य: परिस्थितीशी कसा सामना करायचा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
सामान्य ज्ञान
०१) "जय जवान,जय किसान" ही घोषणा कोणी दिली ?
- लाल बहादूर शास्त्री.
०२) "जय जवान,जय किसान,जय विज्ञान" ही घोषणा कोणी दिली ?
- अटल बिहारी वाजपेयी.
०३) रौप्यमहोत्सव किती वर्षांनी साजरा करतात ?
- पंचवीस वर्ष.
०४) लीप वर्ष किती दिवसाचे असते ?
- ३६६ दिवस.
०५) उंटाच्या मादीला काय म्हणतात ?
- सांडणी.
General knowledge
01) Who gave the slogan "Jai Jawan, Jai Kisan"?
- Lal Bahadur Shastri.
02) Who gave the slogan "Jai Jawan, Jai Kisan, Jai Vigyan"?
- Atal Bihari Vajpayee.
03) Silver jubilee is celebrated after how many years?
- Twenty five years.
04) How many days is a leap year?
- 366 days.
05) What is a female camel called?
- A female camel is called a cow.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्लोक
क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् ।
क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम् ॥
:-प्रत्येक क्षण वाया न घालवता ज्ञान संपादन केले पाहिजे आणि त्यातील प्रत्येक क्षण वाचवून संपत्ती जमा करावी. क्षण वाया घालवणाऱ्याला ज्ञान कुठे आणि प्रत्येक कणाला वाया घालवणाऱ्याला संपत्ती कुठे?
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
प्रकाशन
प्रकाशसिंग राजपूत
छ. संभाजीनगर
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.