डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकडीवरून अंशतः अनुदानित किंवा १०० टक्के अनुदानित तुकडीवर बदली|teacher transfer|

 शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा...

 राज्यातील विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकडीवरून अंशतः अनुदानित किंवा १०० टक्के अनुदानित तुकडीवर बदली करता येणार आहे. यासाठी ८ जून २०२० ची नियमावलीतील सुधारणा व १ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार बदल्या होणार आहेत. न्यायालयाने १ डिसेंबर २०२२ रोजी नियमबाह्य विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तुकड्यांवरून अंशतः अनुदानित, अनुदानित तुकड्यांवर बदली करण्यास स्थगिती देणारा आदेश दिला आहे. 

Teachers transfer


महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेसह इतर शिक्षक संघटनांनी याचे स्वागत केले आहे.

 सरकारने ८ जून २०२० च्या सुधारणांच्या माहितीचा शासन निर्णय तब्बल दहा महिन्यांनी म्हणजे १ एप्रिल २०२१ रोजी काढला व अंमलबजावणी ८ जून २०२० पासून करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १ डिसेंबर २०२२ रोजी नियमावलीतील सुधारणांना व १ मार्च २०२१ च्या शासन निर्णयाला स्थगिती देणारा अध्यादेश काढला. उच्च न्यायालयाने १ डिसेंबर २०२२ चा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे विनाअनुदानवरून अनुदानितवर बदल्या करण्यास नियमाप्रमाणे मान्यता देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याने यामुळे शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.


उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये यांची संचमान्यता आॕफलाईन...

उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत

 सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता अनुदानित व अंशतः अनुदानित (२० टक्के व ४० टक्के) उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत..

 सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करण्याबाबत दि.१६.०२.२०२४ च्या बैठकीमध्ये सुचित करण्यात आलेले आहे.

त्यानुषंगाने संच मान्यतेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. आपल्या जिल्हयातील तालुक्यांच्या दिनांका दिवशी आपण सकाळी १०.३० ते ६.०० यावेळेत उपस्थित राहुन आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता करुन घ्यावी.

टप्पा क्रमांक :-१

१. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची पटपडताळणी सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक (माध्यमिक) जिल्हा परिषद पुणे/अहमदनगर/सोलापूर यांनी दिनांक ०७.०३.२०२४ पर्यंत आधार व्हॅलीड संख्येनुसार करण्यात यावी.

टप्पा क्रमांक :- २

१. संच मान्यतेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे संबधित जिल्हयाच्या सहा. शिक्षण उपनिरिक्षक

यांच्याकडुन शासन निर्णयामध्ये दिलेल्या विहित नमुन्यातील अद्ययावत केलेले जनरल रजिस्टर प्रमाणे तपासून घ्यावीत. व त्याचे प्रमाणपत्र संबधित सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांच्या स्वाक्षरीने प्रस्तावा सोवत सादर करावेत. २

. सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांनी शाखानिहाय तुकडीनिहाय तपासलेली विद्यार्थी संख्या आणि सरल प्रणालीमध्ये नमुद केलेली विद्यार्थी संख्या एकसारखी असणे आवश्यक आहे.

३. संच मान्यतेसांवत शेक्षणिक वर्ष २०१३-१४,२०२१-२२ व २०२२-२३ ची संच मान्यतेची प्रत सादर करावी.

४. कनिष्ठ महाविद्यालयाचे शाखानिहाय वेळापत्रक सादर करावे,

५. विद्यार्थी निहाय/विषय निहाय शिक्षकांना दिलेला कार्यभाराचा तक्ता शिक्षकांच्या नावांनिशी व प्रकारानिशी सादर करावा. (परिशिष्ट-अ). (सोबत विहित नमुना जोडलेला आहे).

६. माध्यमिक विभागाकडील कार्यभार देऊन उच्च माध्यमिककडील पदे पुर्णवेळ करु नयेत, त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक विभागाकडील कार्यभार माध्यमिक विभागाकडे देऊ नये.

७. प्रस्तावा सोवत विद्यार्थी संख्या (सरल प्रणाली २०२३-२४ च्या हार्ड कॉपीसह सादर करावी, त्याशिवाय संच मान्यता केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

८. सन २०२३-२४ च्या संच मान्यतेसाठी सरळ प्रणालीमधील आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्या धरुनच संचमान्यता करण्यात येणार असल्याने ऑनलाईन आधार व्हॅलिड रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे.

९. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची संच मान्यता बाबत, कॉलेज निहाय डाटा व सांख्यिकी माहिती शासनास हवी असल्यामुळे प्रत्यक्ष शिबीराच्या ठिकाणी संगणकावर ऑनलाईन माहिती भरुन त्यानंतरच संच मान्यता प्रत प्रिन्ट काढावी. त्याकरिता आवश्यक ती सर्व माहिती घेऊनच उपस्थित रहावे.

१०. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये संस्थेचे कार्यरत असलेले संचालक मंडळ त्यांचा कार्यकाल, व मा.धर्मादाया

आयुक्त, यांचे परिशिष्ट अ चो साक्षांकित प्रत / बदल अहवाल (चेंज रिपोर्ट) प्रत सादर करावी. ११. शैक्षणिक वर्ष २०२३ ३ चोच्या पूर्णवेळ/अर्थवेळ/प्र.प.ता नियुक्तीवायत कोणताही याद/न्यायालयीन प्रकरण सुरु नसल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राचार्य यांनी सादर करावे.

१२. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुर्णवेळ / अर्थवेळ/प्र.घ.ता नियुक्तीबाबत कोणताही याद/न्यायालयीन प्रकरण सुरु असल्यास प्रकरण नियुक्ती/नियुक्ती रद्द करणेबाबत / संचालक मंडळातील यादायावत आहे याची थोडक्यात माहितीची प्रत सादर करावी

१३. संस्थेत बाद असल्यास सादर केलेल्या प्रस्तावातील सर्व माहिती ही बिनचूक / बरोबर असल्याबाबत

प्राचार्य यांनी हमीपत्र सादर करावे, त्याचप्रमाणे संस्थेतील बादामुळे प्राचार्य यांनी त्यांच्या अधिकारात

केलेल्या सर्व नियुक्त्यांवावत प्राचार्य व्यक्तिशः जवाबदार असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे. १४. प्राचार्य यांनी सादर केलेल्या माहितीबाबत भविष्यात काही न्यायालयीन प्रकरण/तक्रारी उद्भवल्यास त्यार प्राचार्य व्यक्तिशः जवाबदार असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.

१५. शिवीराच्या ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने तयार केलेली संच मान्यता प्रत तपासल्यानंतरच अंतिम प्रती ०४८ काढण्यायावत आदेशित केले जाईल. (पटपडताळणी व संच मान्यतेसाठी ३० सप्टेंबर २०२३ ची विद्यार्थी संख्या ग्राहय धरावी)

१६. माहे फेब्रुवारी २०२४ पेड इन मार्च २०२४ चे वेतन देयकाची प्रत सोबत आणावी. तसेच खालील प्रपत्र अस मधील माहिती अचूक भरुन प्राचायांनी त्यांची पडताळणी करुन स्वाक्षरी व शिक्यासह सादर करावी.




१० वी नंतर डिप्लोमा प्रवेश | diploma course after 10th|

 अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदविका प्रवेशप्रक्रिया जाहीर....

अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून; अंतिम गुणवत्ता यादी २ जुलैला होणार प्रदर्शित... (diploma admission)

दहावीनंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, तसेच वास्तूकला प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना बुधवारपासून ता. २९ मे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी २७ जून रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी २ जुलै रोजी जाहीर होणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी तीन वर्षे कालावधीच्या पूर्णवेळ अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तूकला पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित आणि खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे ही प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेशासाठी ई-स्क्रूटीनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटीनी याद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे. अशा पात्र नोंदणीकृत विद्यार्थ्यांना 'कॅप' अंतर्गत गुणवत्तेनुसार प्रवेशासाठी विचारात घेण्यात येणार आहे. तसेच 'कॅप'व्यतिरिक्त जागांसाठी ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे, या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत (कट ऑफ) सुरू ठेवल्या जाणार आहेत.

diploma


प्रत्यक्ष स्क्रूटीनी पद्धतीसाठी सुविधा केंद्रांची यादी संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही केंद्रे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू राहणार आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली.


विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना 

राज्यमंडळामार्फत दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना शैक्षणिक पात्रता तपशीलात स्वतःचा परीक्षा आसन क्रमांक भरावा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण करावा, राज्य मंडळातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले गुण राज्य मंडळाकडून थेट घेण्यात येतील आणि ते संबंधित विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये दर्शविण्यात येतील.

प्रवेशाची प्रक्रिया पुढीलप्रमाणे


ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे.

कालावधी

२९ मे ते २५ जून


कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे


२९ मे ते २५ जून


विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. २७ जून


तात्पुरत्या यादीवर तक्रार व हरकती नोंदविणे  २८ ते ३० जून


अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. २ जुलै


अर्ज सादर करण्यासाठी सुविधा - 

संकेतस्थळ : 

https://poly24.dtemaharashtra.gov.in/


- मोबाइलवर 'DTE Diploma Admission' हे अॅप डाऊनलोड करून अर्ज भरता येईल











इयत्ता पहिलीत प्रवेश वय|1st standard admission age|

 

इयत्ता पहिलीत प्रवेश...वाचा नर्सरी ते इयत्ता पहिली पर्यंत प्रवेशासाठी आवश्यक वयोमर्यादा...



 शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण अनिवार्य केले गेले असून या वयोगटातील बालकांवर अभ्यासाचा किंवा इतर शैक्षणिक गोष्टींचा जास्तीचा ताण येऊ नये याकरिता 31 डिसेंबर 2024 रोजी ज्या बालकांचे वयाचे सहा वर्ष पूर्ण होणार आहेत अशा बालकांना यावर्षी पहिलीमध्ये ऍडमिशन करता येणार आहे.

१ ली प्रवेश नंतर पहिल्याच दिवशी आनंदी बालके


सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे अशा बालकांना आता दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल. विशेष म्हणजे आरटीईनुसार बघितले तर अशा बालकांना शाळेत दाखल करून घेण्याची मुख्य जबाबदारी ही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर असणार

आहे.कारण जर आपण पाहिले तर कमी वयामध्ये जर विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेश केला गेला तर त्यावर शैक्षणिक गोष्टींचा अभ्यासाचा जास्त ताण येतो

व त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासूनच ते वंचित राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे केंद्र सरकारने शैक्षणिक सत्र 2024-25 करिता इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय सहा वर्ष कधीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे हे निश्चित केले आहे. त्यामुळे आता त्या कालावधीत जन्मलेल्या बालकांना खाजगी असो किंवा शासकीय शाळा असो त्यामध्ये प्रवेश देता येणार आहे.

कोणत्या कालावधीत जन्मलेल्या बालकांना यावर्षी 

मिळेल   पहिलीत प्रवेश?

या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देताना सर्व शाळांना एक जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत ज्या बालकांचा किंवा ज्या मुलांचा जन्म झालेला आहे त्यांनाच यावर्षी पहिलीत प्रवेश देता येणार आहे. कारण या कालावधीप्रमाणे 31 डिसेंबर 2024 पूर्वी संबंधित विद्यार्थी हे सहा वर्षाचे होतील व त्यांना पहिलीत प्रवेश देता येणे शक्य आहे.

नर्सरी ते इयत्ता पहिलीसाठी प्रवेश मिळण्याचे वय -

1- नर्सरीकरिता वयाची तीन वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.

2- जूनियरकेजीकरिता वयाचे चार वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.

3- सिनियरकेजीकरिता वयाची पाच वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.

4- इयत्तापहिलीकरिता 31 डिसेंबर २०२४ पर्यंत वयाचे सहा वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.

शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....

10 वी निकाल ssc result | sscresult 10th result|

आता दहावीच्या निकालाची (10th result) तारीखही जाहीर करण्यात आली आहे. उद्या दि. २७ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे घोषणा केली. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

10 th result


विद्यार्थ्यांना पुढील वेबसाईटवर निकाल पाहता येणार :

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.or


शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....

जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....

अतिशय प्रेरणादायी  नक्कीच वाचा...

इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवत गीता (bhagavad gita) आणि मनाचे श्लोक (manache shlok) यांचा समावेश |Maharashtra Education News|

 

Maharashtra Education News: राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमाबाबत (School Syllabus) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवत गीता (bhagavad gita) आणि मनाचे श्लोक (manache shlok) यांचा समावेश करण्यात येणार आहे. भाषा विषयात यांचा समावेश करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात अनेक माध्यमांच्या शाळा आहेत. आपल्या मुलांना परंपरेची ओळख करुन त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सरकारने आक्षेप आणि सूचना मागविल्या आहेत. SCERT ने (State Council of Educational Research & Training) विद्यार्थ्यांना भगवत गीता आणि मनाचे श्लोक यांचा पाठ करायला लावावे असे सूचवले आहे.



SCERT ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला होता. या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांना (Student) देशाची परंपरा आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी मनाचे श्लोक आणि

भगवत गीतेचा बारावा अध्याय पाठ करायला लावावा असे एससीईआरटीने सुचविले होते. त्यानुसार आता इयत्ता 3 री ते 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 1 ते 25 मनाचे श्लोक, 6 वी ते 8 वी साठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि 9 वी ते 12 वीसाठी भगवत गीता पाठांतराची स्पर्धा आयोजित करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. भगवत गीतेमधील बारावा अध्याय विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी द्यावा असे सांगितले आहे.

भगवत गीता हा धार्मिक ग्रंथ आहे. तो शाळांमध्ये शिकविण्यावरुन आता विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेकांचा विरोध होऊ शकतो.

आराखड्या नमूद केले आहे की...

भारतीय ऋषींची दिनचर्या, भगवतगीतेतील ज्ञानयोग, आत्मयोग, गुरुशिष्य परंपरा, ऋषींचा आहार कसा होता याची ओळख विद्यार्थ्यांना करुन द्यावी. तसेच भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश गणित व विज्ञान विषयात करावा असे एससीईआरटीने जाहीर केलेल्या आराखड्यात म्हटले आहे.

अतिशय प्रेरणादायी नक्कीच वाचा...

जिद्द अशी की नशीबी आलेल्या परिस्थितीवर मात|motivational|

 जळगाव रेल्वेस्थानकाच्या कचरापेटीत सापडलेल्या अनाथ मुलीची MPSC परीक्षेत बाजी...


जन्मतः अंध असल्याने आई- वडिलांनी जळगाव रेल्वे स्थानकावर कचरा पेटीत टाकून दिले होते. मात्र आता त्याच मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. विषम परिस्थितीला तोंड देत जिद्दीने अभ्यास करीत माला ही एमपीएससीच्या 'लिपिक 'गट क' मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

साधारण २० वर्षांपूर्वी दोन्ही डोळ्यांनी दृष्टी नसलेली माला ही जळगाव येथील रेल्वेस्थानकाच्या कचरा पेटीत आढळून आली होती. पोलिसांनी आई-वडिलांचा, नातेवाईकांचा शोध घेतला. परंतु शोध न लागल्याने तिला जळगाव येथील रिमांडहोम मध्ये दाखल करण्यात आले. तेथे दिव्यांगाच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने बालकल्याण समितीच्या आदेशान्वये पोलीसांनी तिला वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात दिले. शंकरबाबांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारुन माला हिला वडील म्हणून स्वतःचे नाव दिले. त्या आधारे तिचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रहिवासी दाखला, इत्यादी कागदपत्राची पुर्तता करुन तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. अनाथ, बेवारस, दिव्यांग १२५ मुला-मुलींसोबत बालगृहात मालाचा जीवनप्रवास सुरू झाला. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मालाने शिक्षणही सुरू ठेवले.




येथील विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतून (व्हीएमव्ही) तिने कला शाखेची पदवी परीक्षा २०१८ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षणासाठी दर्यापूर येथील प्रा. प्रकाश टोपले यांनी तिचे पालकत्व स्वीकारले आणि शिक्षणाची व्यवस्था केली. २०१९ पासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मालाची धडपड सुरू झाली. येथील युनिक अकेडमीचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनात मालाने एमपीएससी परीक्षेची तयार केली.

तिला या प्रवासात देखील विशेष मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच ती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपिक (टंकलेखक) परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिला एवढ्यावरच थांबायचे नाहीतर युपीएससी परीक्षा देखील यशस्वीपणे उत्तीर्ण करण्याचे तिचे स्वप्न आहे.



निवृत्त शिक्षकांना का? करावे लागले आंदोलन....