शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा...
राज्यातील विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकडीवरून अंशतः अनुदानित किंवा १०० टक्के अनुदानित तुकडीवर बदली करता येणार आहे. यासाठी ८ जून २०२० ची नियमावलीतील सुधारणा व १ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार बदल्या होणार आहेत. न्यायालयाने १ डिसेंबर २०२२ रोजी नियमबाह्य विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तुकड्यांवरून अंशतः अनुदानित, अनुदानित तुकड्यांवर बदली करण्यास स्थगिती देणारा आदेश दिला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेसह इतर शिक्षक संघटनांनी याचे स्वागत केले आहे.
सरकारने ८ जून २०२० च्या सुधारणांच्या माहितीचा शासन निर्णय तब्बल दहा महिन्यांनी म्हणजे १ एप्रिल २०२१ रोजी काढला व अंमलबजावणी ८ जून २०२० पासून करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १ डिसेंबर २०२२ रोजी नियमावलीतील सुधारणांना व १ मार्च २०२१ च्या शासन निर्णयाला स्थगिती देणारा अध्यादेश काढला. उच्च न्यायालयाने १ डिसेंबर २०२२ चा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे विनाअनुदानवरून अनुदानितवर बदल्या करण्यास नियमाप्रमाणे मान्यता देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याने यामुळे शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.