डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जोरदार गोंधळानंतर शिक्षक पतसंस्थेची सभा गुंडाळली

 जोरदार गोंधळानंतर शिक्षक पतसंस्थेची आमसभा निर्णय विना गुंडाळली...


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण आमसभा रविवारी दि. १० सप्टेंबर रोजी आयोजित   करण्यात आली होती. मात्र, गोंधळामुळे एकही ठराव मंजूर न करता ही सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे अनेक सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा टीव्ही सेंटर येथील गुलाब विश्व हॉलमध्ये ठेवण्यात आली होती. सभेच्या पहिल्या सत्रात विभागीय सहायक संचालक रवींद्र वाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व सत्कार  करण्यात आला. 

दुसऱ्या सत्रात संचालक मंडळाने तीन ठराव ठेवले...

१) पतसंस्थेतील ठेव एक हजार रुपयांवरून १२०० रुपये करण्यात यावी, 

२)कल्याण निधी २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात यावा आणि

३) पतसंस्थेतील संचालक १३ वरून १७ करण्यात यावे या ठरावांचा समावेश होता.

त्याचवेळी सभासदांच्यावतीने दोन ठराव मांडले. 

 व्याजदर आठ टक्के करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, संचालक मंडळाने साळकर यांनी मांडलेल्या ठरावांना विरोध केला. त्यामुळे सभासदांनी संचालक मंडळाच्या ठरावांनाही जोरदार विरोध दर्शविला. दोन्ही बाजूंनी गोंधळ सुरू झाल्यानंतर ही सभा गुंडाळण्यात आली.

  एकही ठराव मान्य न होता आमसभा आटोपली याची खंत सर्वच सदस्य व मागणीकर्ते श्री  विजय साळकर श्री गणेश सोनवणे आर.आर.पाटील यांनी व्यक्त  केली.

मराठा योद्धा मनोज पाटील यांच्यावर लिहिलेली सुंदर कविता...

 मराठा योद्धा मनोज पाटील....

🚩🚩🚩🚩🚩

कवी: दत्ता टरले 9420219159

😊🚩🚩🚩👏🏻


करून जिवाचं रान

बसला वाघ जिद्दीने..

लोटले भले भले ते

आपुल्या हुशार बुद्धीने

😇😇🚩🚩🚩🚩🚩


मग जागली सूड बुद्धी

केला क्रूर  खाकी हल्ला

मग पेटला अजुन सूर्य

गोडीत दिला सल्ला

🚩🚩🚩🚩😊

त्या लाठ्या कट्या छेरे

त्या किंकाळ्या गाजल्या

मग जागला अजुन मराठा

गावोगावी तुताऱ्या वाजल्या

🚩🚩🚩🚩💪💪


आजी माजी दमले

जो तो येऊन झटला..

पण वाघ तो मराठा

एक कण मागे न हटला

🚩🚩🚩🚩🚩


ना द्वेष केला कुणाचा

ना मान ही तिथे कुणाला

द्या माझ्या हक्काचे मज

एका स्वरात म्हणाला

🚩🚩🚩😊😊


मरणाला सामोरे जावे

हे प्रेम किती जातीचे..

हा मावळा खरा शिवबांचा

नाते महाराष्ट्र मातीचे

🚩🚩🚩🚩😊😊


हाच सूर्य आहे मराठा

हा आरक्षणाचा दाता

उठा जागे व्हा ओळखा

हा खरा मराठा नेता

😊🚩🚩👏🏻👏🏻🤝🤝


कवी: दत्ता टरले 9420219159

🚩🚩🚩🚩🚩🚩 

कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी समिती स्थापण्याबाबत

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी,कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये 


आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत.. शासन निर्णय पहा....